या कातरवेळी

या कातरवेळी, पाहिजेस तू जवळी ||धॄ||

दिवस जाय बुडून पार, ललितनभी मेघ चार
पुसट त्यास जरी किनार, उसवी तीच सांज खुळी ||१||

शेष तेज वलय वलय, पावे तमी सहज विलय
कसले तरी दाटे भय, येई तूच तम उजळी ||२||

येई बैस ये समीप, अधरे हे नयन टीप
दोन ज्योती एक दीप, मंदप्रभा मग पिवळी ||३||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: