कोरसः धिपाडि धिपांग डिचिपाडी धिपांग डिडिपाडी डिचिपाडी धिपांग (२)
तो: काळी माती निळं पानी हिरवं शिवार
     ताज्या ताज्या माळव्याचा भुइला या भार
कोरसः धिपाडि धिपांग डिचिपाडी धिपांग डिडिपाडी डिचिपाडी धिपांग (२)
तो: काळी माती निळं पानी हिरवं शिवार
     ताज्या ताज्या माळव्याचा भुइला या भार
     ज्वानिच्या या मळ्यामंदी पिरतीचं पानी
     बघायाला कवतीक आलं नाही कोनी
     मळ्याला या मळेवाली भेटलीच नाय
     अगं रानी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय
कोरसः धिपाडि धिपांग डिचिपाडी धिपांग डिडिपाडी डिचिपाडी धिपांग (२)
तो: काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा
     मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा
कोरसः तुझा मिरचीचा तोरा तुझा रंग गोरा गोरा (२)
तो: काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा
     मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा
     लिंबावानी कांती तुझी बीटावानी होटं
     टंबट्याचे गाल तुझे भेंडीवानी बोटं
     काळजात मंडई तु मांडशील काय
    अगं रानी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय
कोरसः धिपाडि धिपांग डिचिपाडी धिपांग डिडिपाडी डिचिपाडी धिपांग (२)
ती: नको दावू भाजीवाल्या फुकाचा रुबाब
    भाजी तुझी वर ताजी आतुन खराब
कोरसः नको दावू फुकाचा रुबाब तुझी भाजी आतुन खराब (२)
ती: नको दावू भाजीवाल्या फुकाचा रुबाब
    भाजी तुझी वर ताजी आतुन खराब
    गोड गोड बोलशील पाडशील फशी
    भाजी तुझी पाटीमंदी घेऊ तरी कशी
   आजकाल कुनाचा बी भरवसा नाय
तो: अगं रानी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय
कोरसः धिपाडि धिपांग डिचिपाडी धिपांग डिडिपाडी डिचिपाडी धिपांग (२)
तो: तुझ्यासाठी शिवाराची केली मशागत
    खुरपला जीव दिलं काळजाचं खत
    राखायाला मळा केली डोळ्याचिया वात
    बुजगावन्याच्या परी उभा दिनरात
ती: नको जळू दिनरात नको जीव टांगू
    ठावं हाय मला सारं नको काही सांगू
    पिरतीत राजा तुझ्या नाही काही खोड
    तुझ्या हाती मिरची बी लागतीया गोड
    माझ्यासंग मळा तुझा कसशील काय
तो: रानी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय
कोरसः धिपाडि धिपांग डिचिपाडी धिपांग डिडिपाडी डिचिपाडी धिपांग (६)
