देवावानी शेत माझं नवसाला पावलं

तो: देवावानी शेत माझं नवसाला पावलं
कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं

(सह: देवावानी शेत माझं नवसाला पावलं
कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं)

तो: झाकली मूठ ही मिरगानं फेकली
निढळाची धार ती सर्गानं शिपली
ती: हो ऽऽ ओ ऽ ऽ
बाळरूप कोवळं शिवारात हासलं (२)
धरतीच्या माऊलीनं दिनरात पोसलं
(सह: कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं
भलरी दादा भलगडी दादा भलरी दादा भलं)

तो: तरारून आला भरा गहू हरभरा
शाळूराजा डुलतोय झुलवीत तुरा
ती: तरुणपण जवारीनं पानाआड झाकलं (२)
(सह: चोच मारून पाखरू पिकामधी लपलं)
ती: चोच मारून पाखरू पिकामधी लपलं
(सह: कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं
भलरी दादा भलगडी दादा भलरी दादा भलं)

तो: हे हे हे हे हे हे हे हे
मोटंवरी रंगली ढंगदार लावणी
ती: कुर्रर्रर्रर्रर्रर्र हा!
हा हा घुमवीत गोफणी सुरू झाली राखणी
(सह: हा घुमवीत गोफणी सुरू झाली राखणी
लक्षुमी ही देखणी रूप तिनं दावलं)
ती: दिवसाच्या डोळियात नाही बघा मावलं
(सह: हा नाही बघा मावलं)
ती: हा नाही बघा मावलं
(सह: कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं
देवावानी शेत माझं नवसाला पावलं
कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं
भलरी दादा भलगडी दादा भलरी दादा भलं)

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: