दत्त दर्शनला जायाच (आनंद पोटात माझ्या माईना)

हे पत्र त्या धन्याला
वैकुंठवासी रहातो जयाला
नि पत्राचा मजकुर वाचुनी पाहिला
भक्त संकटी धावुनी आला
ये वेडीवाकुडी सेवा माझी
मान्य करुनी प्रभु घेशिल काय?
आनि अज्ञान मुढ बालक म्हणुनी
हात मस्तकी धरशील काय?
हे तुझे भजन कसे करावे ठाऊक मजला नाही [वा वा]
तुझे भजन तुच करुन घे कलावान मी नाही
कुनी माना कुनी मानु नका यात आमुचे काय
आनि भगवंताची सर्व लेकरे, एक पिता एक माय

दत्त दर्शनला आमी जायाच नि जायच
[आता लगीच काय? ... हां लगीच लगीच]
अरे, दत्त दर्शनला आमी जायाच नि जायच
[आमी येनार]
अरे आनंद पोटात माज्या [अरे वाडीला... हां हां]
अरे आनंद पोटात माज्या [औदुंबर्... नरसोबाची वाडी राहिली]

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

देवावानी शेत माझं नवसाला पावलं

तो: देवावानी शेत माझं नवसाला पावलं
कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं

(सह: देवावानी शेत माझं नवसाला पावलं
कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं)

तो: झाकली मूठ ही मिरगानं फेकली
निढळाची धार ती सर्गानं शिपली
ती: हो ऽऽ ओ ऽ ऽ
बाळरूप कोवळं शिवारात हासलं (२)
धरतीच्या माऊलीनं दिनरात पोसलं
(सह: कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं
भलरी दादा भलगडी दादा भलरी दादा भलं)

तो: तरारून आला भरा गहू हरभरा
शाळूराजा डुलतोय झुलवीत तुरा
ती: तरुणपण जवारीनं पानाआड झाकलं (२)
(सह: चोच मारून पाखरू पिकामधी लपलं)
ती: चोच मारून पाखरू पिकामधी लपलं
(सह: कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

दर्शन दे रे, दे रे भगवंता

दर्शन दे रे, दे रे भगवंता
किती अंत आता पाहसी अनंता ||धृ.||

माय पित्याची सेवा पुंडलिकाची
भक्ती पाहिली तू गोर्‍या कुंभाराची
तैसे येणे व्हावे तुझे कृपावंता ||१||

ऐकताच वाणी संत चोखोबाची
साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची
ऐसे ध्यान देसी तुझ्या प्रिय संता ||२||

तूच जन्मदाता तूचि विश्वकर्ता
मन शांत होई तुझे गुण गाता
हीच एक आशा पुरवी तू आता ||३||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

देवाघरचे ज्ञात कुणाला

देवाघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम
कुणी रखडती धुळीत आणिक कुणास लाभे हेम

मी निष्कांचन निर्धन साधक
वैराग्याचा एक उपासक
हिमालयाचा मी तो यात्रिक
मनात माझ्या का उपजावे संसाराचे प्रेम

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

देवा दया तुझी की...

देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला
लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला

भाळावरी वसे या निष्ठूर जी कुठार
घावांतुनी उडावे कैसे सुधा तुषार
निर्जीव जन्म माझा त्या अमृतात न्हाला

माझ्या मुलास लाभे सुखछत्र रे पित्याचे
ही प्रीतीची कमाई की भाग्य नेणत्याचे
उध्वस्त मांडवाच्या दारी वसंत आला

सौख्यात नांदताना का दुःख आठवावे?
जे नामशेष झाले ते काय साठवावे?
हास्यात आजच्या या कळ कालची कशाला?

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

गौळणिंनो, जाउ नका बाजारी

दह्यादुधाचि करतो चोरी, नंदाचा हरी
गौळणिंनो, जाउ नका बाजारी ॥ ध्रु ॥

नंदाघरचा कृष्ण सावळा, वाट अडवुनि उभा राहिला
गौळणिंना ग छळतो भारी, खट्याळ गिरीधारी ॥ १ ॥

पदराशी तो लगटहि करितो, दह्यादुधाचे घडे मागतो
खडे मारतो, पळुनी जातो, कॄष्ण करी मस्करी ॥ २ ॥

रोज त्याजला हवेच लोणी, करी मागणी हात पकडुनी
नकार देता शारंगपाणि, करितो शिरजोरी ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

शुभंकरोती म्हणा

दिवा पाहुनी लक्ष्मी येते, करु तिची प्रार्थना
शुभंकरोती म्हणा मुलानो, शुभंकरोती म्हणा ॥ ध्रु ॥

जेथे ज्योति, तेथे लक्ष्मी, उभी जगाच्या सेवाधर्मी
दिशादिशांतुन या लक्ष्मीच्या, दिसती पाउलखुणा ॥ १ ॥

या ज्योतिने सरे आपदा, आरोग्यासह मिळे संपदा
शत्रुबुद्धिचा विनाश होता, सौख्य मिळे जीवना ॥ २ ॥

दिव्या दिव्या रे दिपत्कार, कानी कुंडल मोतीहार
दिव्यास पाहुन नमस्कार हा, रिवाज आहे जुना ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

दिन मावळता

दिन मावळता असा लागते मला कळू
न कळताच रंगतोच हृदयी राग पिलू॥धृ॥
धीर कसा सोडू मी झाले तव प्रेमिका
होई पाठमोरी का मैफलीत गायिका
गगन शांत चंद्रमा लागला जरी ढळू॥१॥
भेटीचा क्षण अजून आठवतो राजसा
विरहवनी भीती नसे प्रितीच्या पाडसा
सावरते मीच मला सुरासुरातुनी हळू॥२॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

दिव्यत्वाचे जेथ प्रचिती

तेथे कर माझे जुळती दिव्यत्वाचे जेथ प्रचिती॥धृ॥
ज्या प्रबला नेज भावबलाने
करित सदने हरिहर भुवने
देव पतींना वाहुनी सुमने
पाहुनी केशव वाडविता तेथे कर माझे जुळती॥१॥
गाळुनिया भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगवती
जलदापरी येऊनिया जाती
जग ज्याची न करी गणती तेथे कर माझे जुळती॥२॥
यज्ञी ज्यानी देऊनि निजशीर
घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहन भूमिवर
नाही चिरा नाही पणती तेथे कर माझे जुळती॥३॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

दुभंगून जाता जाता मी अभंग झालो

दुभंगून जाता जाता मी अभंग झालो
चिरा चिरा जळला माझा आत दंग झालो ॥धृ॥
सल जुनेच सलता सलता सुखावून गेले
अन्‌ हळूच गुणगुणती हे वळ न मोजलेले
कशी कथा सरता सरता पूर्वरंग झालो॥१॥
किरण एक धरूनी हाती मी पुढे निघालो
अन्‌ असाच वणवणताना मी मलाच मिळालो
सर्व संग सुटले, माझा मीच संग झालो॥२॥
ज्ञानदेव लिहुनी गेले ओळ ओळ भाळी
निमित्तास माझे गाणे निमित्तास टाळी
तरू काय? इंद्रायणिचा मी तरंग झालो॥३॥
कुठे दिंड गेली त्यांची कळेना बिचारी
मी इथेच केली माझी सोसण्यात बारी
पांडुरंग म्हणता म्हणता पांडुरंग झालो ॥४॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: