तुझ्या पायरीसी कुनी सानं थोर न्हाई, साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
हे तरि द्येवा सरंना ह्यो भोग कश्यापाई, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई
ववाळुनी उधळीतो जिव मायबापा, वनवा ह्यो उरी प्येटला
खेळ मांडला मांडला मांडला
हे खेळ मांडला मांडला मांडला
सांडली गा रितभात, घेतला वसा तुझा
तुच वाट दाखवी गा खेळ मांडला
दावी द्येवा पैलपार पाठीशी तु र्हा उभा, ह्यो तुझ्याच उंबर्यात खेळ मांडला
खेळ मांडला मांडला मांडला
हे.............
उसवलं गणगोत सारं आधार कुनाचा न्हाई,
भेगाळल्या भुईपरी जीनं अंगार जीवाला जाळी
बळं दे झुंजायाला, किरपेची ढाल दे, इनवती पंचप्रान जिव्हारात ताल दे ???
करपलं रान द्येवा जळलं शिवार
तरी न्हाई धीर सांडला
खेळ मांडला मांडला मांडला
गाण्याचे आद्याक्षर:
गाण्याचा प्रकार:
प्रतिसाद
नाद खुळा गान आहे.
नाद खुळा गान आहे.