खेळ मांडला

तुझ्या पायरीसी कुनी सानं थोर न्हाई, साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
हे तरि द्येवा सरंना ह्यो भोग कश्यापाई, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई
ववाळुनी उधळीतो जिव मायबापा, वनवा ह्यो उरी प्येटला
खेळ मांडला मांडला मांडला
हे खेळ मांडला मांडला मांडला
सांडली गा रितभात, घेतला वसा तुझा
तुच वाट दाखवी गा खेळ मांडला
दावी द्येवा पैलपार पाठीशी तु र्‍हा उभा, ह्यो तुझ्याच उंबर्‍यात खेळ मांडला
खेळ मांडला मांडला मांडला
हे.............
उसवलं गणगोत सारं आधार कुनाचा न्हाई,
भेगाळल्या भुईपरी जीनं अंगार जीवाला जाळी
बळं दे झुंजायाला, किरपेची ढाल दे, इनवती पंचप्रान जिव्हारात ताल दे ???

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

खरा तो एकची धर्म

खरा तो एकची धर्म
जगाला प्रेम अर्पावे............. IIधृII

जगी जे हिन अतिपतित
जगी जे दिन पददलित
तया जाऊन उठवावे
जगाला प्रेम अर्पावे.............II१II

सदा जे आर्त अतिविकल
जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे
जगाला प्रेम अर्पावे............II२II

कुणा ना व्यर्थ शिणवावे
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे
जगाला प्रेम अर्पावे...........II३II

प्रभुची लेकरे सारी
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे
जगाला प्रेम अर्पावे..........II४II

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

मराठी पाउल पडते पुढे

(हेमंतकुमार)
(खरा स्वधर्म हा आपुला
जरी का कठीणु जाहला
तरी हाची अनुष्ठीला, भला देखे)

(हृदयनाथ)
स्वराज्य तोरण चढे
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाउल पडते पुढे

(लता)
माय भवानी प्रसन्न झाली
सोनपावली घरास आली
आजच दसरा, आज दिवाळी
चला सयांनो अंगणी घालू
कुंकुमकेशर सडे
मराठी पाउल पडते पुढे

(उषा व मीना)
बच्चे आम्ही वीर उद्याचे
बाळमुठीला बळ वज्राचे
वारस होऊ अभिमन्यूचे
दूध आईचे तेज प्रवाहे
नसांतुनी सळसळे
मराठी पाउल पडते पुढे

(हृदयनाथ)
स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई
तदा संकटी देव धावून येई

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

खेळ मांडीयेला

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे ।
क्रोध अभिमान गेला पावटणी, एकएका लागतील पायी रे ॥१॥

नाचती आनंद कल्लोळा पवित्र गाणे वनमाळी रे ।
कळी कामावरी घातली काम एक एकाहुनी बळी रे ॥२॥

गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा रे ।
टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव, अनुपम्य सुखसोहळा रे ॥३॥

लुब्धली नादी लागली समाधी मुढजन नारी लोका रे ।
पंडीत ज्ञानी योगी महनुभव एकची सिद्ध साधका रे ॥४॥

वर्ण अभिमान विसरली याती, एकेका लोटांगणी जाती रे ।
निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे ॥५॥

होतो जयजयकार गर्जत अंबर, मातले हे वैष्णव वीर रे ।
तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे ॥६॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: