आला गं चावट भुंगा

लई तुडुंब भरलय आज इश्काच तळं
नाचती मधोमध दोन कमळाची फुलं
अहो मधाला भुलतोय
मागम्होर झुलतोय
भवतीन घालतोय पिंगा
आला आला गं
कोण
आला आला गं
कोण
आला आला गं
कोण
तो
(आला आला, आला गं आला आला
आला गं ऽ चावट भुंगा)
आला गं ऽऽ चावट भुंगा
भवतीनंऽ गं बाई बाई घालतोय पिंगा
भवतीनं ग बाई बाई
भवतीनं ग बाई बाई
घालतोय पिंगा

लई दिसानं नजरही फिरली
एव्हढ्या गर्दीत मलाच हेरली
छेडाछेडी करतोय
पदराला धरतोय
झोंबतोय गोर्‍या अंगा .१

थरथरुन काया ही भिजली
कोवळ्या ज्वानीनं पिरती सजली
उसासे भरते
आर्जव करते
मदनाचा चाललाय पिंगा ..२

पापण्या मिटुन घेते गुलाबी
रात जत्रेची होईल शराबी...आऽ
पहाटेचा फटका
कैद्याची सुटका
भेटीचा कळला इंगा ...३

(आला आला गं
कोण
आला आला गं
कोण
आला आला गं
कोण
तो
आला आला, आला गं आला आला
आला गं ऽ चावट भुंगा)

भवतीनंऽ गं बाई बाई घालतोय पिंगा

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: