आई आणखी बाबा यांतुन कोण आवडे अधिक तुला?

आशा : सांग मला रे सांग मला
आई आणखी बाबा यांतुन, कोण आवडे अधिक तुला ?

उषा : आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी
तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती, बनवायाला सहज तिला
आई आवडे अधिक मला

आशा : गोजिरवाणी दिसते आई, परंतु भित्री भागुबाई
शक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला
आवडती रे वडिल मला

आशा : घरात करते खाऊ आई, घरातल्याला गंमत नाही
चिंगम अन् चॉकलेट तर, बाबा घेती रस्त्याला
आवडती रे वडिल मला

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

आला गं चावट भुंगा

लई तुडुंब भरलय आज इश्काच तळं
नाचती मधोमध दोन कमळाची फुलं
अहो मधाला भुलतोय
मागम्होर झुलतोय
भवतीन घालतोय पिंगा
आला आला गं
कोण
आला आला गं
कोण
आला आला गं
कोण
तो
(आला आला, आला गं आला आला
आला गं ऽ चावट भुंगा)
आला गं ऽऽ चावट भुंगा
भवतीनंऽ गं बाई बाई घालतोय पिंगा
भवतीनं ग बाई बाई
भवतीनं ग बाई बाई
घालतोय पिंगा

लई दिसानं नजरही फिरली
एव्हढ्या गर्दीत मलाच हेरली
छेडाछेडी करतोय
पदराला धरतोय
झोंबतोय गोर्‍या अंगा .१

थरथरुन काया ही भिजली
कोवळ्या ज्वानीनं पिरती सजली
उसासे भरते
आर्जव करते
मदनाचा चाललाय पिंगा ..२

पापण्या मिटुन घेते गुलाबी
रात जत्रेची होईल शराबी...आऽ

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

आकाशी झेप घे रे पाखरा

आकाशी झेप घे रे पाखरा (२)
सोडी सोन्याचा पिंजरा (२) ||धृ.||

तुज भवती वैभवमाया,
फळ रसाळ मिळते खाया,
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेशी आसरा ||१||

घर कसले ही तर कारा,
विषसमान मोतीचारा,
मोहाचे बंधन द्वारा,
तुज आडवितो हा कैसा उंबरा ||२||

तुज पंख दिले देवाने,
कर विहार सामर्थ्याने,
दरी डोंगर हिरवी राने,
जा ओलांडुनी या सरिता सागरा ||३||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

आकाश देऊळवाडा

आकाश देऊळवाडा तिथे वाजतो चौघडा
काठोकाठ भरे घडा मेघ शिंपतात सडा॥धृ॥
ध्वज आकाश गंगेचा झगमगते शिखर
लखलखते सौदामिनी तळपते गर्भागार॥१॥
दिसे निळाई माऊली झाला जीव माझा तान्हा
तिच्या कुशीत शिरूनी पिते अमृताचा पान्हा॥२॥
माझी निळाई हासली ऊन पडले पिवळे
दोन रंग एक जीव जन्मा मातीतून आले॥३॥
माता निळाई भेटली द्वैत सरले सरले
धरतीच्या देव्हार्‍यात अद्वैताचे पीक आले॥४॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

आता तरी पुढे हाच उपदेश

आता तरी पुढे हाच उपदेश
नका करू नाश आयुष्याचा ॥धृ॥
सकळाच्या पाया माझे दंडवत
आपुलाले चित्त शुद्ध करा ॥१॥
हित ते करावे देवाचे चिंतन
करुनिया मन शुद्ध भावे ॥२॥
तुका म्हणे हित होय ती व्यापार
करा काय फार शिकवावे॥३॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

आली दिवाळी आली

आली दिवाळी आली सांगे फुलास वारा
येती अधीर ओठी आनंद गीत धारा ॥धृ॥
आले चराचराला नवरुप यौवनाचे
बरसे धरेवरी हे बघ चांदणे सुखाचे
उजळोनी दीप टाकी हा आसमंत सारा ॥१॥
झाडे भुईनळ्याची येथे फुलून आली
नक्षत्र चांदण्याची पुष्पे तयास आली
आनंद आसमंती दु:खास नाही थारा ॥२॥
दाही दिशास आता सज्ञान दीप लावा
समतानी बंधूभावा येथे मिलाप व्हावा
दीपावलीस मग तो येईल रंग न्यारा ॥३॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या

आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या
एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या

काही केल्या करमनां, कसा जीवच लागंना
बोलघेवडी साळुंकी, कसा शब्द ही बोलंना
असा रुतला पुढ्यात भाव मुका जीवघेणा

चांदण्याची ही रात, रात जळे सुनी सुनी
निळ्या आसमानी तळ्यांत लाख रूसल्या ग गवळणी
दूर लांबल्या वाटेला रूखी रूखी टेहाळणी
दूर गेले घरधनी बाई, दूर गेले धनी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

आला खुशीत समिंदर

आला खुशीत समिंदर, त्याला नाही धीर
होडीला देइ ना गे ठरु, सजणे होडीला बघतो धरु ॥ ध्रु ॥

हिरवं हिरवं पाचूवाणी जळ, सफेत फेसाची वर खळबळ
माशावाणी काळजाची तळमळ, माझी होडी समिंदर
ओढी खालीवर, पाण्यावर देइ ना गे ठरु ॥ १ ॥

ताबंडं फुटे आभाळांतरी, रक्तावाणी चमक पाण्यावरी
तुझ्या गालावर तसं काहीतरी, झाला खुळा समिंदर
नाजुक होडीवर, लाटांचा धिंगा सुरु ॥ २ ॥

सुर्यनारायण हसतो वरी, सोनं पिकलं दाहिदिशांतरी
आणि माझ्याहि नवख्या उरी, आला हसत समिंदर
डुलत फेसावर, होडीशी गोष्टी करु ॥ ३ ॥

गोर्‍या भाळी तुझ्या लाल चिरी, हिरव्या साडिला लालभडक धारी
उरी कसली गं गोड शिरशिरी, खुशी झाला समिंदर
त्याच्या उरावर, चाले होडी भुरुभुरु ॥ ४ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

आई तुझी आठवण येते

आई तुझी आठवण येते
सुखद स्मृतीच्या कल्लॊळांनी काळिज काजळते ॥ ध्रु ॥

वात्सल्याचा कुठे उमाळा, तव हातांचा नसे जिव्हाळा
हृदयाचे मम होउन पाणी, नयनी दाटुन येते ॥ १ ॥

तुजविण आई जगी एकटा, पोरकाच मज म्हणति करंटा
व्यथा मनीची कुणास सांगू, कळिज तिळतिळ तुटते ॥ २ ॥

हाक मारतो आई आई, चुके लेकरु, सुन्या दिशाही
तव बाळाची हाक माउली, का नच कानी येते ॥ ३ ॥

सुजल्या नयनी नुरले पाणी, सुकल्या कंठी उमटे वाणी
मुके पाखरु पहा मनाचे, जागी तडफड करते ॥ ४ ॥

नको जीव हा नकोच जगणे, आईवाचुन जीवन मरणे
एकदाच मज घेई जवळी, पुसुनी लोचने माते ॥ ५ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

आज गोकुळात रंग खेळतो हरी

आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी

तो चटोर चित्तचोर वाट रोखतो
हात ओढूनी खुशाल रंग टाकतो
रंगवून, रंगूनी गुलाल टाकतो
सांगते अजूनही तुला परोपरी

सांग श्याम सुंदरास काय जाहले
रंग टाकल्याविना कुणा न सोडले
ज्यास त्यास रंग रंग रंग लागले
एकटीच वाचशील काय तू तरी

त्या तिथे अनंगरंग रास रंगला
गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला
तो पहा मृदुंग मंजिर्‍यात वाजला
हाय वाजली फिरुन तीच बासरी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: