दत्त दर्शनला जायाच (आनंद पोटात माझ्या माईना)

हे पत्र त्या धन्याला
वैकुंठवासी रहातो जयाला
नि पत्राचा मजकुर वाचुनी पाहिला
भक्त संकटी धावुनी आला
ये वेडीवाकुडी सेवा माझी
मान्य करुनी प्रभु घेशिल काय?
आनि अज्ञान मुढ बालक म्हणुनी
हात मस्तकी धरशील काय?
हे तुझे भजन कसे करावे ठाऊक मजला नाही [वा वा]
तुझे भजन तुच करुन घे कलावान मी नाही
कुनी माना कुनी मानु नका यात आमुचे काय
आनि भगवंताची सर्व लेकरे, एक पिता एक माय

दत्त दर्शनला आमी जायाच नि जायच
[आता लगीच काय? ... हां लगीच लगीच]
अरे, दत्त दर्शनला आमी जायाच नि जायच
[आमी येनार]
अरे आनंद पोटात माज्या [अरे वाडीला... हां हां]
अरे आनंद पोटात माज्या [औदुंबर्... नरसोबाची वाडी राहिली]
अरे आनंद पोटात माज्या [अरे बाबा गाणगापुर.... हां तिकडेच जाऊ या आपल]
अरे आनंद पोटात माज्या माईना रे माईना
अरे आनंद पोटात माज्या माईना रे माईना
(दत्त दर्शनला जायाच, जायाच नि जायच
अरे आनंद पोटात माज्या माईना रे माईना)

गेलो रंभापुरी थेट घेतली दत्तंची भेट
(हो, घेतली दत्तांची भेट)
या या डोळ्यांची भुक काही जाईना .१

रुप सावळे सुंदर गोजिरवाने मनोहर
(हो, गोजिरवाने मनोहर)
नजरेत (हां हां)
नजरेत आणिक काही येईना ..२

नजरबंदीचा हा खेळ, खेळे सदगुरु प्रेमळ
(नजरबंदीचा हा खेळ, खेळे सदगुरु प्रेमळ)
खेळ खेळिता खेळ पुरा होईना ...३

हंडीबाज पांडुरंग दत्त गाढुनी अभंग(?)
या या भजनाची हौस पुरी होईना ....४

आनंद पोटात माज्या माईना रे माईना
आनंद पोटात माज्या माईना रे माईना

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: