छुन्नु छुन्नु पदी घुमवी पैंजणा

छुन्नु छुन्नु पदी घुमवी पैंजणा
शुशूपणी ये विठुरायाऽ
नेत्र दोन्ही नितांत उन्मिलीत
कुंडलमंडित देव यावा

कृष्णाऽऽ नंदगोपाल हरी केशवा
मज दासीस दे दर्शना
दिव्य आकार धरी मोहना

बाल स्वरुप भक्तास घ्यावे
गोपनायका हृदयात यावे
दावी सदया अदभुत भावा
टम्म पोट हे हरीचे हलते
शुशूपण घे यदुरायाऽ
मृत्युलोकी अप्राप्य अमृत
मुरली गान मजेत गा गाऽ .१

गोष्ट ऐकुन गोप गड्यांची
पापी कालीया फणीवर मंथी
तांडव करी बा देवकीतनया ..२

छुन्नु छुन्नु पदी घुमवी पैंजणा
शुशूपणी ये विठुरायाऽ
नेत्र दोन्ही नितांत उन्मिलीत
कुंडलमंडित देव यावा

कृष्णाऽऽ नंदगोपाल हरी केशवा
मज दासीस दे दर्शना
दिव्य आकार धरी मोहना
कृष्णा कृष्णाऽ कृष्णाऽऽ

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: