स्मृतिगंध

शैले शैले न माणिक्यं मौक्तिकं न गजे गजे |
साधवो न हि सर्वत्र चन्दनं न वने वने ||

न्माला येतो त्या प्रत्येकाला आज ना उद्या हे जग सोडून जायचेच आहे; पण जाण्यापूर्वी समर्थ रामदासांच्या उक्तीप्रमाणे 'मरावे परि कीर्तीरूपे उरावे' हे बोधवचन प्रत्यक्षात जगून आपले व इतरांचे आयुष्य समृद्ध व आनंददायी करणार्‍या व्यक्ती समाजात विरळाच! आपल्या पश्चात कर्तृत्त्वाची, व्यक्तिमत्वाची चिरंतन व अविस्मरणीय छाप सोडून जाणारी अशी माणसं अभावानंच आढळतात!

यंदाच्या वर्षीही अशा काही कर्तृत्त्ववान विभूतिंनी आपला अखेरचा निरोप घेतला आहे. स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, संगीतकार श्रीनिवास खळे, गजलसम्राट जगजित सिंग, अनेक चित्रपट तारे व तारकांना चित्रपट जगतातील प्रवेशाला मोलाची मदत करणारे प्रकाशचित्रकार गौतम राजाध्यक्ष, जगभरातल्या तरूण-तरूणींचा आयकॉन स्टिव्ह जॉब्ज, टायगर पतौडी, सतपालला चारी मुंड्या चीत करणारा रूस्तुम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार, बॉलिवूडचा बादशहा शम्मी कपूर, ज्येष्ठ संगीतज्ञ व समीक्षक डॉ. अशोक रानडे, कुष्ठरोग्यांची आई साधनाताई आमटे, गजलेचे अभ्यासक डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी, वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी गेलेली रसिका जोशी, बालरंगभूमीचे प्रा. जयंत तारे, ग्रामीण आरोग्य क्षेत्रात आपल्या पायाभूत कामगिरीने समाजसेवेचा अमीट ठसा उमटवलले डॉ. रजनीकांत आरोळे, लेखिका कमल देसाई, लेखक चारूता सागर, अभिनेत्री नीलम प्रभू, गीतकार जगदिश खेबुडकर, अभिनेत्री लिझ टेलर, लेखक वि. आ. बुवा, पं. माधव गुडी, साहित्यिक सुभाष भेंडे, 'तो मी नव्हेच' मुळे अजरामर झालेले ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर, शाहीर विठ्ठल उमप . . . या व अशा अनेक जणांनी सर्वांना चटका लावून यावर्षी या जगताचा निरोप घेतला.

आपले व समाजाचे आयुष्य उजळणार्‍या या सर्व निखळलेल्या ता-यांना मायबोली परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!

ही आहेत मायबोली परिवाराने अर्पण केलेली काही श्रद्धासुमने . . .

महा’गीतकार’ जगदीश खेबूडकर! प्रमोद देव
चैतन्यमूर्ती शम्मी कपूर मंदार_जोशी
सूनी हर महफ़िल गिरीराज

.

*************
- बित्तुबंगा, मास्तुरे