मेंदी सजते ... लाकडावरही !

हि

तगुज दिवाळी अंकाच्या 'वेगळ्या वाटा, नवी क्षितिजे' या संकल्पनेअंतर्गत मी दाखवत आहे मेंदीच्या कलाकुसरीचा एक आगळावेगळा वापर!

आपल्या भारतीय परंपरेमध्ये 'मेंदी' ही प्रामुख्याने त्वचेवर, केसांवर आणि नखांवर वापरली जाते. पण मोरोक्को, तुर्कस्तान व आखाती देशांमध्ये मेंदी ही निर्जीव कलाकृतींवर कलाकुसर करण्यासाठीही वापरली जाते.

डफली, ड्रम्स, लेदर टॉप्स तसंच लँपशेड, अश्या प्राण्यांच्या कातड्यापासून बनवलेल्या वस्तूंना सजवण्यासाठी मेंदीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. मेंदीच्या लालसर मरुन रंगाचा जसा वापर होतो, तसाच तिथे ओल्या मेंदीचाही एक स्वतंत्र रंग म्हणून वापर होतो. भारतातही रंगलेली मेंदी सर्वांना जितकी प्रिय आहे, तितकीच किंवा त्याहीपेक्षा जास्त ओली मेंदी अतिशय प्रिय आहे. पण निर्जीव वस्तूंवर कलाकुसर करण्यासाठी ओल्या मेंदीचा उपयोग मात्र सहसा केला जात नाही.

आज 'वेगळ्या वाटा, नवी क्षितिजे' या संकल्पनेच्या निमित्ताने आपण खास भारतीय नक्षीकाम वापरून केलेलं मेंदी रेखाटन ठराविक चौकटीपुरते मर्यादित न ठेवता, त्याचा एक नवीन प्रयोग बघूया.

आज मी इथे दाखवतेय, लाकडाच्या छोट्या बॉक्सला सजवण्यासाठी केलेला मेंदीचा वापर.

साहित्य :

  • फिकट रंगाचा पॉलिश न केलेला लाकडी बॉक्स .
  • मेंदी ऑइल किंवा essential oil न घातलेले मेंदीचे कोन्स (ऑइल घातलेली मेंदी लाकडावर पसरेल.)
  • अ‍ॅक्रिलिक कलर्स (कोन मधे भरलेले)
  • लाकडावर वापरायचे कुठल्याही ब्रॅन्डचे सीलर (स्प्रे किंवा स्पंजने लावायचे सीलर)

सीलर वापरताना घ्यावयाची विशेष दक्षता:
लाकडावर लावायचे, व्हिडिओमध्ये दाखवलेले सीलर हे फक्त लाकडाच्या वस्तूंसाठीच वापरावे. इतर कुठल्याही वस्तूंवर त्याचा प्रयोग करु नये.
व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कागद, सिल्क किंवा मेणबत्त्यांवर हे सीलर वापरलेले नाही.
स्प्रे सीलर हे अतिशय पटकन पेटू शकते(फ्लेमेबल असते), त्यामुळे वापरताना दक्षता घ्यावी.
दम्यासारखे श्वासाचे विकार, खोकला किंवा वासांच्या अ‍ॅलर्जी असतील, तर स्प्रे सीलर न वापरता ब्रशने लावायचे सीलर वापरावे.

सविस्तर कृती व्हिडिओमध्ये दाखवली आहे. आपणही मेंदीचा हा नवीन प्रयोग नक्की करून पहा.

[video:http://www.youtube.com/watch?v=rcw5O4hJJFI]

- दीपांजली