रांगोळी सुलेखन

रां

गोळी - चित्रकलेसाठी वापरले जाणारे एक सहजसोपे माध्यम. कित्येक घरांत रोज पूजा करताना देवासमोर रांगोळी काढण्याची पद्धत आहे. तसेच औक्षण करताना आसनाखाली शुभचिन्ह काढायलासुद्धा रांगोळीच वापरतात. दिवाळी म्हटली की, सडे-रांगोळ्या सगळीकडेच दिसू लागतात. शहरी विभागात घराच्या मुख्य दरवाज्यासमोर गेरूचा एक चौकोन काढून त्यात रोज वेगवेगळ्या प्रकारची रांगोळी बघायला मिळते.
ठिपक्यांची रांगोळी, संस्कारभारतीची रांगोळी, पाण्यावरची रांगोळी असे अनेक रांगोळीचे प्रकार नेहमीच आपण पाहतो.

माझ्या घरातही देवासमोर रोज रांगोळी असते आणि ती काढतात माझे आजोबा. मुक्तहस्ते रंगांची उधळण करत ते रोज एक नवीन रांगोळी काढतात. त्यांनी देवासमोर रांगोळी काढायला सुरुवात नक्की कधी केली ते काही आठवत नाही. पण लहान असताना त्यांनी काढलेली रांगोळी ओळखली की, एक रुपया हातात मिळायचा. याचं कारण म्हणजे त्यांची रांगोळी कधीच सरळ, साधी, सोपी नसते. ते असते एक रांगोळी सुलेखन. रांगोळीतून देवाची रोज केलेली आराधना. दिनविशेषानुसार त्या रांगोळीतील रंग आणि अक्षरेही बदलत राहतात. उदाहरणच द्यायचं झालं तर -

DSC06351_2.JPG

DSC06747_2.JPG

१५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दिवशी हमखास भारताचा झेंडा बघायला मिळणारच आणि २ ऑक्टोबरला महात्मा गांधी.

DSC06190_2.JPG

आजोबांच्या रांगोळीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मधूनच कधीतरी त्यात मोडी लिपीपण बघायला मिळते.

DSC06269_2.JPG

गणपतीत तर बघायलाच नको. रोज एक नवीन गणपती आणि बरोबर त्याचं नाव.

DSC06491_2.JPG

आजोबांनी खास आमच्यासाठी घरच्याघरी भरवलेली ही रांगोळीसंस्कारशाळाच! आता ही सुलेखनचित्रं माझ्याबरोबर तुमच्याही स्मृतिचित्रांत दाखल होतील.

पुढच्या दृकश्राव्य फितीत आपण बघणार आहोत ती रांगोळी काढतानाचीच एक झलक.

[video:http://www.youtube.com/watch?v=K2bq1R0F1vw]

- हिम्सकूल

Taxonomy upgrade extras: