चंपक गोरा कर कोमल हा,
करात तुझिया देते
नेशिल तेथे येते ॥ ध्रु ॥
चैत्रतरुंच्या छायेमधला
गोड गारवा प्रेमे कवळू
फुलाफुलांच्या हृदयामधला
मधुमासाचा सुगंध उधळू
पवनामधुनि सूर गंजता, तुझे गीत मी गाते ॥ १ ॥
निळ्या नभाचे तेज उतरता
मोहक सुंदर वातावरणी
दोन मनांचा संगम बघुनी
हसू लागली ही जलराणी
लाजत लाजत प्रीत देखणी, जिथे मोहुनी बघते ॥ २ ॥
गाण्याचे आद्याक्षर:
गाण्याचा प्रकार:
प्रतिसाद
गायले आहे आशानेच पण...
दिनेश, गायिका आशा भोसलेच आहेत पण तू जे भावगीत या प्रकाराखाली टाकले आहेस ते मात्र बदलावे असे वाटते कारण हे गाणे 'लक्ष्मी आली घरा' या चित्रपटात होते.
दिनेश - बरं केलंस. आभाराचे उपचार पाळण्याहून जास्त काळ ओळखतो आपण एकमेकांना. :)