चिरंतन चालती या येरझारा

तारकांचा हा फुलोरा सोबतीला मंद वारा
HDA2014_samudra.jpg संथ पाणी, त्यात दिसतो चंद्र गाली हासणारा

कोण जाणे काय आहे गूज ते दोघां मनी पण
लाट येते मंदशी अन् धुंद होतो तो किनारा


भावनांचा बांध फुटता गूज ये ओठांवरी अन्
लाट करते बावरूनी मूक भाषेचा इशारा


लाट परतू लागता तो थांबवू पाहे तिला अन्
पांघरूनी लाट जाते मखमलीशा नीर धारा


रोखण्याचा यत्न सारा फोलही ठरता बिचारा
घेत जातो शोषुनी अस्तित्व रंध्री तो किनारा


भेट ही घडतेच आहे जन्म झाल्यापासुनी पण
तृप्तता नाही, चिरंतन चालती या येरझारा

related1: 

HDA2014_blackseparator.jpg

HDA2014_rangoLee3.jpg

HDA2014_blackseparator.jpg


जो_एस(सुधीर जोशी)
HDA2014_silhouette_boy.jpg

जो_एस (सुधीर जोशी) यांना लहानपणापासून वाचन आणि लेखनाची आवड आहे. पु. ल. देशपांडे, मिरासदार, मतकरी, व. पु. काळे असे त्यांचे अनेक आवडते लेखक आहेत. मायबोलीवर ते २००४ सालापासून सभासद आहेत आणि तेव्हापासून त्यांच्या लेखनाला वेगळी दिशा मिळाली. ते एका खासगी कंपनीत कामाला आहेत. त्यांच्या कवितांना सुधीर मोघे, अजय-अतुल, प्रदिप भिडे, अरुण दाते अशा अनेक मोठ्या व्यक्तींच्या हस्ते बक्षीसे मिळाली आहेत.

HDA2014_blackseparator.jpg

प्रतिसाद

छान आहे :-)

कविता, चित्र दोन्ही मस्त.

मस्त नाद आहे कवितेला. आवडलीच.

आवडली.

कविता आणि चित्र , दोन्ही मस्त

लाट आणि किनारा यांचा कालातीत रोमान्स, एक प्रतीक प्रेमाच्या चिरंतनतेचं फार सुंदर शब्दात, लयीत आलं आहे .

सुंंदरच ! लाटा अन किनारा यांचे उत्कट भावविश्व बेहद्द आवडले.

>> कोण जाणे काय आहे गूज ते दोघां मनी पण
लाट येते मंदशी अन् धुंद होतो तो किनारा <<

व्वा, क्या बात है !
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . आणी अल्पना यांचे कवितेच्या आशयाला भिडणारे अतिशय चपखल रंगचित्र आहे हे सांगणे न-लगे !

जबरदस्त! चित्रमय वर्णन, पहिल्या तीन चार ओळीत एकदम पकड घेत नाही पण पुढे खूप सुंदर होत जाते.

आणी एक लिहायचे राहिलेच . . . ही कविता वाचताना 'पृथ्वीचे प्रेमगीत" ही कविता आठवली !

प्रतिसादाबद्दल धन्यवाद

छान

वा मस्त अगदी निगप्रेमी आहे कविता :)

बी

छान कविता.

"लाट येते मंदशी अन् धुंद होतो तो किनारा"

"लाट परतू लागता तो थांबवू पाहे तिला अन्
पांघरूनी लाट जाते मखमलीशा नीर धारा"

या ओळी सर्वात छान वाटल्या.

सुरेख ...

धन्यवाद

वाह वाह!

पुन्हा वाचली.. पुन्हा पुन्हा वाचली :)
अगदी ताला सुरात म्हणता येतेय :)

प्रतिसादासाठी आभारी आहे

'येरझारा' कल्पना सुरेख आहे.

धन्यवाद योग

खुप सुंदर !
'पृथ्वीचे प्रेमगीत" आठवले !