राधा

HDA2014_radha.jpg
जितकी ओळखीची,
तितकीच अनोळखी
माझ्यापासून वेगळी,
तरीही जोडलेली
माझ्याही मनाच्या तळाशी
अशीच एक राधा लपलेली


राधा तृप्त तृप्त, तरी अतृप्त
मनभर तिचा स्पर्श
तरीही ती अस्पर्श


खोल खोल खूप खोल
जखम वेडी रुतलेली
माझ्याही मनाच्या तळाशी
अशीच एक राधा जपलेली

related1: 

HDA2014_morapeese_separator_blue.jpg
HDA2014_rangolee12.jpg

HDA2014_morapeese_separator_blue.jpg


कविता नवरे
HDA_14_Kavita.jpg

कविता नवरे या व्यवसायाने ग्रंथपाल आहेत व त्यांना ट्रेकिंगची आवड आहे. लहान मुलांच्या 'ट्रेक कॅम्प' आयोजनात त्यांचा सहभाग असतो. 'गम्मत गाणी जम्मत गोष्टी' हे त्यांनी लिहिलेले लहान मुलांसाठीचे ई-पुस्तक ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित झाले आहे.

HDA2014_morapeese_separator_blue.jpg

प्रतिसाद

कविता, प्रत्येकाच्या मनाच्या तळाशी अशी राधा जपलेली असावी बहुतेक :-)

आवडली :)

कविता नि चित्र .. दोन्ही आवडली :)

कविता आणि चित्र. दोन्ही आवडलं.

कवितेची कविता आणि चित्र दोन्ही आवडेश

धन्यवाद संपादक आणि वाचक
अश्वे चित्र फारच सुरेख काढलयस :)

कविता, चित्र दोन्ही सुरेख

आवडली .. :)

आवडली

मस्त आहे

छान.

कविता आणि त्याला अगदी समर्पक असे चित्र खूप आवडले.

आशय साध्या, सहज शब्दांत मांडलाय.... छान.

सुंदर ...

कविता आणि चित्र. दोन्ही आवडलं.

सर्व प्रतिसाद +१
कवे तुझा हा गुण माहीत नव्हता :)

आशय छान....
अजून खुलवायला हवी.