या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती
हिरवे हिरवे पान तशी ही भिजून आली पाती
फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे ||
रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली
काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतुंचे सहा सोहळे येथे भान हरावे ||
बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते
वेलींवरती प्रेमप्रियेचे जन्म फुलांनी घेते
प्रभुच्या पाशी सजणासाठी गाणे गात झुरावे ||
या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती
अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे ||
गाण्याचे आद्याक्षर:
गाण्याचा प्रकार:
प्रतिसाद
अरूण, संगीत
अरूण,
संगीतकार यशवंत देवच आहेत. पण शब्दांमधे कृपया या दुरुस्त्या करणार का?
पहिले कडवे - दुसरी ओळ : हिरवे हिरवे "प्राण" तशी ही "रुजून" आली पाती
तिसरे कडवे - दुसरी ओळ : "वेलीवरती प्रेम प्रियेचे" जन्म फुलांनी घेते (वेलींवरती नाही, आणि प्रेम प्रियेचे हे दोन वेगळे शब्द आहेत)
तिसरे कडवे - तिसरी ओळ : "नदीच्या काठी" सजणासाठी गाणे गात झुरावे