राहिले ओठातल्या ओठांत वेडे

राहिले ओठातल्या ओठांत वेडे शब्द माझे
भेट होती आपुली का ती खरी, की स्वप्न माझे?

कापरे ते हात हाती बावरे डोळ्यांत आसू
आग पाण्यातून पेटे जाळणारे गोड हासू
दोन थेंबांच्या क्षणांचे प्रीतिचे तकदीर माझे

गर्द हिरवे पाचपाणी रक्तकमळे कुंकुमाची
खेळताना बिंबलेली शुभ्र जोडी सारसांची
आठवे? म्हटलेस ना तू? हे हवेसे विश्व माझे

मी म्हणू कैसे फुला रे, आज तू आहीस येथे
वेल दारी सायलीची रोज अजुनी बार देते
लाख पुष्पे तोडिल्याविण ये भरोनी पात्र माझे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: