चिंचा आल्यात पाडाला

चिंचा आल्यात पाडाला
हात नको लावूस झाडाला
माझ्या झाडाला

माझ्या कवाच आलय ध्यानी
तुझ्या तोंडाला सुटलय पाणी
काय बघतोस राहुन आडाला

मी झाडाची राखणवाली
फिरविते नजर वर खाली
फळ आंबुस येईल गोडाला

माझ्या नजरेत गोफणखडा
पुढं पुढं येसी मुर्दाडा
काय म्हणूं तूझ्या येडाला

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: