लाविला तुरा फेट्यासी
Submitted by mbhure on गुरु., 05/27/2010 - 15:25लाविला तुरा फेट्यासी
युवराज तुम्ही मी हो दासी
बसताच उद्या मंचकी
विसाराल जुन्या ओळखी
विसर तो स्नेह सुखवासी, हो हो
महालात जिगाचे पडदे
भोवती शिपाई प्यादे
कोठली वाट दीनासी .१
मज हवी भेट राजांची
बाई तू कोण कुणाची
क्षण नसे वेळ आम्हासी
हे हास्य मोकळे असले
मी प्रथम जयाला फसले
दिसणे न पुन्हा नजरेसी ..२
येईल नवी युवराणी
अति नाजुक कमळावाणी
पुसणार कोण चाफ्यासी
लाडके तुझ्यावाचोनी
मज आवडतेना कुणी
पहिलीच भेट रमणीसी ...३