मल्मली तारुण्य माझे

मल्मली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या, तू जिवाला गुंतवावे ॥ ध्रु ॥

लागुनी थंडी गुलाबी, शिरशिरी यावी अशी, की
राजसा माझ्यात तू अन मी तूझ्यामाजी भिनावे ॥ १ ॥

गर्द राईतून यावा, भारलेला गार वारा
तू मुक्या ओठात माझ्या, दंशताजे ऊन प्यावे ॥ २ ॥

चांद्ण्याचा श्वास जाईच्या फुलांमाजी विरावा
आपुल्या डोळ्यात साया तारकांनी विरघळावे ॥ ३ ॥

तापल्या माझ्या तनूची, तार झंकारुन जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे ॥ ४ ॥

रे तूला बाहूत माझ्या, रुपगंधा जाग यावी
मी तूला जागे करावे, तू मला बिलगून जावे ॥ ५ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

प्रतिसाद

पहिल्या कडव्याच्या दुसर्‍या ओळीत 'राजसा माझ्यात तू' असे हवे ना?