आज अचानक गाठ पडे

आज अचानक गांठ पडे ॥ धृ ॥

भलत्या वेळी, भलत्या मेळी
असतां मन भलतीचकडे ॥ १ ॥

नयन वळवितां, सहज कुठे तरि
एकाएकी तूच पूढे ॥ २ ॥

दचकुनि जागत, जीव निजेंतच
क्षणभर अंतरपाट उघडे ॥ ३ ॥

नसतां मनिंमानसी अशी ही
अवचित दॄष्टीस दॄष्टी भिडे ॥ ४ ॥

गूढ खूण तव कळुन नाकळुन
भांबावुन मागें मुरडे ॥ ५ ॥

निसटुनि जाई संधीचा क्षण
सदा असा संकोच नडे ॥ ६ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

प्रतिसाद

काल हे गाणं एका कार्यक्रमात विश्वजित बोरवणकर अफलातून गायला :-) वन्समोअर मिळाला.