गेले द्यायचे राहुनी तुझे नक्षत्रांचे देणे
आता माझ्या पास कळ्या आणि थोडी ओली पाने
आलो होतो हासत मी काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता रात्र रात्र शोषी रक्त
आता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला
झाले कळ्यांचे निर्माल्य आणि पानांच पाचोळा
गाण्याचे आद्याक्षर:
गाण्याचा प्रकार:
प्रतिसाद
गाइ पान्यावर काय म्हनुनी आल्या
क्रुपया या गान्याचे बोल सान्गा_कविता बी यान्ची आहे_कदाचित सुधिर फद्दके हे गायक आहेत_