नाच रे मोरा ......

नाच रे मोरा अंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच.... IIधृII

ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच....
नाच रे मोरा नाच.... II१II

झरझर धार झरली रे, झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊं, काहीतरी गाऊ
करून पुकारा नाच....
नाच रे मोरा नाच.... II२II

थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत खेळ खेळू दोघात
निळ्या सौंगड्या (सवंगड्या) नाच....
नाच रे मोरा नाच.... II३II

पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे
आभाळात छान छान सातरंगी कमान
कमानीखाली त्या नाच.....
नाच रे मोरा नाच.... II४II

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: