घेई छंद मकरंद

घेई छंद मकरंद
प्रिय हा मिलिंद
मधु सेवनानंद
स्वच्छंद हा धुंद ||

मिटता कमलदल
होई बंदी हा भृंग
तरी सोडी ना ध्यास
गुंजनात हा दंग ||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

प्रतिसाद

अरुण, अभिषेकी आणि वसंतराव दोघांनी गायलेल्या गाण्यात दोनच कडवी आहेत. आत्ताच दोन्ही गाणी ऐकून खात्री करुन घेतली. :)