रातिची झोप मज येईना

रातिची झोप मज येईना, कि दिस जाईना
जा जा जा, कुणितरी सांगा हो सजणा ॥ ध्रु ॥

लागली श्रावणझड दारी, जिवाला वाटे जडभारी
अशी मी राघुविण मैना, की झाली दैना ॥ १ ॥

एकली झुरते मी बाई, सुकली गं पाण्याविण जाई
वाटते पाहु मनमोहना, की मन राहिना ॥ २ ॥

कठिण किति काळिज पुरुषाचे, दिवस मज जाती वर्षाचे
जाऊनी झाला एक महिना, की सखा येइना ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

प्रतिसाद

दिनेश, ही चित्रपटातील लावणी असल्यामुळे चित्रपटगीत म्हणून टाकणे जास्त योग्य होईल का?