देह देवाचे मंदिर

देह देवाचे मंदिर
आत आत्मा परमेश्वर

जशी ऊसात हो, साखर
तसा देहात हो, ईश्वर
जसे दुधामध्ये लोणी
तसा देही चक्रपाणी

देव देहात देहात
का हो जाता देवळात
तुका सांगे मूढ जना
देहि देव का पाहिना

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

प्रतिसाद

नाटकाचे नाव देहुरोड आहे का?