गोरी गोरी पान, फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण ॥ ध्रु ॥
गोर्या गोर्या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडिवर चांदण्याची खडी
चांदण्याच्या पदराला बिजलीचा बाण ॥ १ ॥
वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची जोडी तुडवी गुलाबाचे रान ॥ २ ॥
वहिनीशी गट्टि होता, तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्या परी होउ दोघी आम्ही सान ॥ ३ ॥
गाण्याचे आद्याक्षर:
गाण्याचा प्रकार:
प्रतिसाद
हे गाणे मुळात चित्रपटासाठी म्हणून लिहीले गेले होते...
श्रीनिवास खळे यांच्यावरील 'नक्षत्रांचे देणे' या कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे हे गाणे 'लक्ष्मीपूजन' या चित्रपटासाठी म्हणून लिहीले गेले होते, पण दुर्दैवाने तो चित्रपट पूर्ण झालाच नाही.