आली दिवाळी आली सांगे फुलास वारा
येती अधीर ओठी आनंद गीत धारा ॥धृ॥
आले चराचराला नवरुप यौवनाचे
बरसे धरेवरी हे बघ चांदणे सुखाचे
उजळोनी दीप टाकी हा आसमंत सारा ॥१॥
झाडे भुईनळ्याची येथे फुलून आली
नक्षत्र चांदण्याची पुष्पे तयास आली
आनंद आसमंती दु:खास नाही थारा ॥२॥
दाही दिशास आता सज्ञान दीप लावा
समतानी बंधूभावा येथे मिलाप व्हावा
दीपावलीस मग तो येईल रंग न्यारा ॥३॥
गाण्याचे आद्याक्षर:
गाण्याचा प्रकार: