मनातल्या त्या भावकळीची आज उमलली दले
क्षणांची अवचित झाली फुले॥धृ॥
एक पाखरू स्वप्नामधले
शीळ खुणेची घेऊनी आले
स्पर्श बावरी ओळख पटता लाज गुलाबी खुले॥१॥
जुळता डोळे मौन बोलले
अधरावरती शब्द बुडाले
ओठ मिठीचे दान बिलोरी कुणी कुणाला दिले॥२॥
कोष लोपला मिटले अंतर
झाले त्याची आता निरंतर
मीलन वेड्या दोन मनाचे अभंग नाते जुळे ॥३॥
गाण्याचे आद्याक्षर:
गाण्याचा प्रकार: