गर्दीत आसवांना मज ढाळाता न आले
आक्रोश हुंदक्याचे मज टाळता न आले
वर्षाव अमृताचा केलास येऊनी तू
झोळीत जीर्ण माझ्या सांभाळता न आले
अपराध घोर माझे पोटा घातले तू
तरीही तुझ्याच संगे मज चालाता न आले
समजून घेतले ना तुजला कधी कोठे
डोळ्यातले इशारे मज पाळता न आले
गेली जरी निघोनी उल्के परी अता तू
ओल्या तुझ्या स्मृतीना मज जाळता न आले
गाण्याचे आद्याक्षर:
गाण्याचा प्रकार: