चंदाराणी....

चंदाराणी...

चंदाराणी, का गं दिसतेस थकल्यावाणी... चंदाराणी...

शाळा ते घर, घर ते शाळा, आम्हा येतो कंटाळा
रात्रभर तू चाल चालसी, दिवसातरी मग कोठे निजसी...चंदाराणी...

वारा वादळ छप्पन वेळा, थारा नाही आभाळा
कसा गडे तू तोल राखिसी, पुढती पुढती पाय टाकिसी...चंदाराणी...

काठी देखील नसते हाती, थोडी नाही विश्रांती
चढसी कैसी, कशी उतरसी निळ्या डोंगरी अखंड फिरसी...चंदाराणी...

वाडा घरकुल घरटे नाही, आई नाही अंगाई
म्हणूनिच का तू अवचित दडसी, लिंबामागे जाऊन रडसी...चंदाराणी...

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

प्रतिसाद

चित्रपट - जिव्हाळा
सन्गीतकार - श्रिनिवास खळे.

चित्रपट जिव्हाळा, गीतकार ग.दि.माडगूळकर संगीतकार श्रीनिवास खळे.

या चिमण्यांनो परत फिरा रे आणि प्रिया तुज काय दिसे स्वप्नात ही दोन्ही गाणीही याच चित्रपतातली.