चांद भरली रात आहे, प्रियकराची साथ आहे
मोगर्याच्या पाकळ्यांची मख्मली बरसात आहे
मंद वाहे गंध वारा, दूर चंदेरी किनारा
अमृताच्या सागरातून जीवनौका जात आहे
ना तमा आता तमाची, वादळाची वा धुक्याची
आजला हातांत माझ्या साजणाचा हात आहे
गाण्याचे आद्याक्षर:
गाण्याचा प्रकार: