ओळख पहिली गाली हसते
Submitted by प्रिया on शुक्र., 03/27/2009 - 21:36ओळख पहिली गाली हसते
सांग दर्पणा कशी मी दिसते
आषाढीच्या तिन्हीसांजेला
पैलतिरी त्या पाणवठ्याला
बघुनि ज्याला जीव लाजला
आठवण त्याची हृदयी ठसते
नाव जयाचे घुमता कानी
चित्र रंगते मिटल्या नयनी
बाहुपाशी जाता विरुनी
माझ्यावर मी जेव्हा रुसते
करी बांगडी राजवारखी
नथणी बुगडी तुझ्यासारखी
तुझ्यापरी तो रत्नपारखी
म्हणुनी तुजला घडी घडी पुसते
गाण्याचे आद्याक्षर:
गाण्याचा प्रकार: