ॐकार स्वरूपा
Submitted by हिम्सकूल on बुध., 04/01/2009 - 14:33ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था
अनाथाच्या नाथा, तुज नमो
तुज नमो, तुज नमो, तुज नमो ॥१॥
नमो मायबापा, गुरुकृपाघना
तोडी या बंधना मायामोहा
मोहोजाळ माझे कोण नीरशील
तुजविण दयाळा सद्गुरुराया ॥२॥
सद्गुरुराया माझा आनंदसागर
त्रैलोक्या आधार गुरुराव
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश
ज्यापुढे उदास चंद्र-रवि
रवि, शशी, अग्नि, नेणती ज्या रूपा
स्वयंप्रकाशरूपा नेणे वेद ॥३॥
एका जनार्दनी, गुरू परब्रम्ह
तयाचे पैनाम सदामुखी ॥४॥