श्रावणात घन निळा बरसला
Submitted by दिनेश. on सोम., 04/06/2009 - 07:47श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीमधारा
उलगडला झाडांतुन अवचित, हिरवा मोरपिसारा ॥ ध्रु ॥
जागुनि ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी
जिथे तिथे राधेला भेटे, आता श्याम मुरारी
माझ्याही ओठावर आले, नाव तुझेच उदारा ॥ १ ॥
रंगाच्या रानात हरवले, हे स्वप्नांचे पक्षी
निळ्या रेशमी पाण्यावरती, थेंबबावरी नक्षी
गतजन्मीची ओळख सांगत, आला गंधित वारा ॥ २ ॥
पाचुच्या हिरव्या माहेरी, उन हळदीचे आले
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरु झाले
मातीच्या गंधाने भरला, गगनाचा गाभारा ॥ ३ ॥
गाण्याचे आद्याक्षर:
गाण्याचा प्रकार: