हेच ते गं, तेच हे ते

हेच ते गं, तेच हे ते, स्वप्नी येती सारखे
मूर्त केले स्वप्न तू हे, चित्ररेखे लाडके

हेच डोळे ते टपोरे, हीच कांती सावळी
नासिकेखालील रेषा हीच काळी कोवळी
हेच हसरे ओठ बाई, मुक तरीही बोलके

हीच छाती रुंद जेथे मीच माथे टेकिले
लाजुनिया चूर झाले धीट डोळे झाकिले
ओळखिली माळ मीही, हीच मोत्ये माणिके

गूज करिती हे कधी गं धरुन माझी हनुवटी
प्रश्न पुसिती धीट जेव्हा मूठ पडते मनगटी
ओठ ओले करुन जाती काय सांगू कौतुके

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

हे बंध रेशमाचे

पथ जात धर्म किंवा नातेही ज्या न ठांवे
ते जाणतात एक प्रेमास प्रेम द्यावे
हृदयात जागणार्‍या अतिगूढ संभ्रमाचे
तुटतील ना कधीही, हे बंध रेशमाचे

विसरुन जाय जेव्हा माणूस माणसाला
जाळीत ये जगाला विक्राळ एक ज्वाला
पुसतात डाग तेही धर्मांध आक्रमांचे

हे बंध रेशमाचे ठेवि जपून जीवा
धागा अतूट हाच प्राणात गुंतवावा
बळ हेच दुर्बळांना देती पराक्रमाचे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

हुरहुर असते तीच उरी

हुरहुर असते तीच उरी
दिवस बरा की रात्र बरी

कुठला रस्ता सांग खरा
वळणाचा की सरळ बरा

जगणे मरणे काय बरे
सुख खरे की दु:ख खरे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

हले डुले हले डुले पाण्यावरी नाव

हले डुले हले डुले पाण्यावरी नाव
पैलतीरी असेल माझ्या राजसाचा गाव

कुठून बाई ऐकू येई पावा?
उगीच कसा भासच व्हावा
कोण दूर घुमवी सूर लागेना गं ठाव

शांत जळी का हलली छाया
कोण असे भुलवितसे वाया?
हळूच हसे लपुनी बसे चाळवूनी भाव

कुजबुजते माझ्या मी कानी
गुणगुणते अस्फुट ही गाणी
मीच हसे मीच फसे काय हा स्वभाव

गाण्याचे आद्याक्षर: