गुलाबी फुलोराघनगर्द रानी धुके दाटलेले
किती प्रश्न सारे नभी साठलेले

कोडे नभाने असे सोडवावे
धरतीस हिरवे उत्तर मिळावे

रेशीम धुक्याने उतरुन हलके
रेशीम काटे ऊरी जागवावे

नव्याने सलावी, जुनी वेदना अन्‌
नवे गीत हृदयी, जन्मास यावे

संमोहनाच्या गाफील क्षणी या
तुझ्या आठवांनी, लपेटून घ्यावे

रात्रीस यावा गुलाबी फुलोरा
भिजरे तराणे श्वासात यावे

- जयवी - जयश्री अंबासकर

मी आणि माझ्या मुलाने (वय वर्ष- १६) केलेला हा पहिला वहिला प्रयत्न. ह्यातली सगळी वाद्यं माझ्या मुलाने Garage Band हे सॉफ्ट्वेअर iPad वर वापरुन वाजवली आहेत. शिवाय हे सगळं रेकॉर्डींग घरी केलंय.

काव्य, संगीत, गायन - जयश्री अंबासकर

संगीत संयोजन - अद्वैत अंबासकर

प्रतिसाद

काव्य, संगीत, संयोजन,गायन,..... नं.१

सुंदर गीत! अद्वैतचं कौतुक करावं तेवढं कमी!

अप्रतिम,

आवडलं.

संगीत संयोजन झकास!

अप्रतिम! परिणामकारक झालंय गीत..
शुभेच्छा! :)

अभिनंदन जयश्री, एक पूर्णानुभव.

सर्व काही नेहमीप्रमाणेच मस्त!
अद्वैतचे खास कौतुक! :-)

शाब्बास अद्वैत.
छान सादरीकरण.

सादरीकरण खरेच मस्ताय जयश्रीतै! सो अ‍ॅज कविता :)

वॉव ! खुपच सुरेख !
अद्वैतचे खास कौतुक.
जयश्री गातेस पण छानच गं :)

खूप खूप धन्यवाद दोस्तांनो :)
अद्वैतला तुमचं कौतुक नक्की पोचवते :)

रैना +१ :)

जयू, कविता सुरांसकट जन्माला आलेली दिसतेय... ओढाताण नाही अशी सहज चाल. आणि इतकं मस्तं गातेस ते कधी नाही कळलं आम्हाला ते? ते कसं, बयो?
अद्वैत... मजा आया... जियो. मधले पिसेस वगैरे त्याचे स्वतःचे का गं? पोरगं झक्कं तैयार आहे... समजून, उमजून वाजलीत सगळी इन्स्ट्रुमेन्ट्स.
सुंदर.

जया,
पुनः एकदा- सबकुछ अंबासकर गीत आवडले!

दाद........ शुक्रिया जानेमन :) तुझी दाद फारच महत्वाची आहे गं. एकबार मिलते है यार........ तुझं तबलावादन डोळे भरुन बघायचंय आणि मनभरुन ऐकायचंय .......!!

हो ....सगळे पीसेस त्यानेच वाजवले आहेत. मनापासून आवडतं त्याला म्युझिक :) बरंच काय काय करत असतो अभ्यासातून वेळ काढून.

योग :)

जयवी, पुन्हा एकदा ... अतिशय सुरेख :) तुमचा आवाज फार गोड आहे. अद्वैतचं संगीत संयोजनही खूपच आवडलं. त्याला मोठ्ठी शाब्बासकी आणि पुढील संगीतमय प्रवासासाठी अनेकानेक शुभेच्छा :)

सुंदर काव्य. गोड आवाज. संगीत संयोजन खासच!

जयवी, कविता आवडली. तुझा (गोड) आवाज तसंच अद्वैतचं संगीत संयोजनही खूप आवडलं. पुढील संगीतमय प्रवासासाठी अनेकानेक शुभेच्छा!

व्वा, मस्त जमुन आलीय मैफल. अद्वैतचे खास कौतुक, अगदी तयारीचा वाटतोय.

खूप खूप धन्यवाद लोक्स :)
अद्वैत खुश हो गया :)

जयवी, फारच छान गातेस आणि अद्वैतचे संगीत तर कर्णमधूरस!
चाल पण सुरेख लावलीये. दोघांना अनेक शुभेच्छा :)

धन्यवाद विनिता :)

वाह! वाह! वाह!!
जयुताई, अद्वैतला मनापासून आशिर्वाद आणि मोठ्ठी शाबास्की! मस्त चाल आणि चढ-उतार, लय.. सर्वच छान गं!
तुझ्या गाण्याबद्दल काय म्हणावे? आवाज तर गोड आहेच पण खास जयु टच पण सुंदर. गाण्यामध्ये त्या गद्य पंक्ती शोभा वाढवतात. पर्फेक्ट्ली ओर्केस्ट्रेड!
मध्ये मध्ये सूर कुठेतरी चुकल्यासारखा वाटला-चुभुद्याघ्या!
आणि तुझ्या कवितेबद्दल काय म्हणु? हिरवे उत्तर काय, रेशीम धुके काय.. खूपच छान.
रेशीम धुक्याचे कडवे लय म्हणजे लयीच आवडेश!
एकुणात मस्त मेजवानी :)

शुक्रिया जानेमन :)

जयवी,

खूप अप्रतिम वाटले ऐकताना. सुंदर, गोड, प्रणयी कविता. चालही तितकीच नादमधुर!

अद्वैत चे कौतुक करावे तितके कमीच.

आता आवडलेल्या गोष्टी एक एक करून सांगते :-)

१)
कोडे नभाने असे सोडवावे
धरतीस हिरवे उत्तर मिळावे
>>>
कसली अफलातून कल्पना आहे. :-) नभाला पडलेले कोडे/ प्रश्न नभानेच असे सोडवावे की धरतीस हिरवे उत्तर मिळावे. सुरेख कल्पना. किती सुंदर रीत्या पावसाला सूचित केले आहे.

२) रेशीम धुक्याने उतरुन हलके
रेशीम काटे ऊरी जागवावे

>>
ह्यातल्या रेशीम शब्दाला गाताना असा काही न्याय मिळाला आहे की बास रे बास!
मुलायम, रेशमी मोरपिसाच्या झुळझुळत्या स्पर्शाची अनुभूती मिळाली. जियो!

३)
नव्याने सलावी, जुनी वेदना अन्‌
नवे गीत हृदयी, जन्मास यावे
>>
ओहो! टचिंग थॉट!

४)
गाण्यामध्ये त्या गद्य पंक्ती शोभा वाढवतात. >>> + १

५)
रात्रीस यावा गुलाबी फुलोरा
भिजरे तराणे श्वासात यावे
>>>
गुलाबी फुलोरा ह्या पंक्तीचा उच्चार खास झालाय गाताना. खूपच आवडले. :-)

निंबुडा..खूप खूप धन्यवाद.....!!
अगदी वेळ काढून सविस्तर प्रतिसाद दिलास.....सुखावलेय :)