हे श्रीरामा, हे श्रीरामा
एक आस मज एक विसावा
एकवार तरी राम दिसावा, राम दिसावा
मनात सलते जुनी आठवण
दिसतो नयना मरता श्रावण
पिता तयाचा दुबळा ब्राम्हण
शाप तयाचा पाश होऊनी, आवळीतो जिवा
पुत्रसौख्य या नाही भाळी
परि शेवटच्या अवघड वेळी
राममूर्ति मज दिसो सावळी
पुत्र नव्हे तो अंश विष्णूचा, वरदाता व्हावा
मुकुट शिरावर कटी पीतांबर
वीरवेष तो श्याम मनोहर
सवे जानकी सेवातत्पर
मेघःश्यामा, हे श्रीरामा, रूप मला दावा
(यातल्या बालकलाकराचा अभिनयही आशाच्या थेट भिडणार्या स्वराच्याच तोडीचा!)
गाण्याचे आद्याक्षर:
गाण्याचा प्रकार: