आकाश कंदील

स्वप्नाली मठकर
संकलन - अमित वर्तक, विजय देशमुख

प्रतिसाद

खूप सुंदर आणि सुबक झालाय कंदिल... स्वप्नाली :-)

वा........ सुरेखच !!

अप्रतिम झालायं आकाशकंदील स्वप्नाली!

मस्त झालाय आकाशकंदिल सावली. फुलपाखराकरता जे रंग निवडलेस तो चॉईस आवडला.

सुंदरच झालाय आकाशकंदिल.

मस्त आकाशकंदील! :-)

मस्तच आकाशकंदील!

खूपच छान आहे.

अप्रतिम झालायं आकाशकंदील 

अप्रतिम झालायं आकाशकंदील 

सोपा सुटसुटित आहे कंदिल.

मस्त झालाय कंदिल.
व्हिडिओ क्लिपमुळे कृती अगदी व्यवस्थित समजली.

सुरेख दिसतो आकाशकंदील. एकदम देखणा.
शूट करतांना कॅमरा पूर्ण वेळ खूप झूम इन केला होता, त्यामुळे खूपदा कंदीलाचा अर्धाच भाग दिसत होता. ते टाळायला हवे होते.

वॉव! किती सुंदर, सुबक दिसतोय आकाशकंदिल ! करायला पण खूप अवघड नाहीये! हा व्हिडिओ २-३ दिवस आधी बघायला मिळाला असता तर !!

मस्त झालाय आकाशकंदिल.

सुबक काम आहे! :)

थँक्यु लोकहो :)

शूट करतांना कॅमरा पूर्ण वेळ खूप झूम इन केला होता, त्यामुळे खूपदा कंदीलाचा अर्धाच भाग दिसत होता. >>> कॅमेरा ट्रायपॉडवर लावुन फिक्स केला होता. आणि लेकीला फक्त ऑन ऑफ करायला सांगितला होता. झुम इन / आऊट करता येण्यासारखे नव्हते. कॅमेरा दुर ठेवला असता तर आजुबाजूचा बराच भाग येत होता. त्यामुळे जरा प्रॉब्लेम झालाय. पुढच्या वेळी अजुन काहीतरी अरेंजमेंट करायला हवी ते कळले. वर्षाच्या 'रंगीत पेन्सील'च्या व्हिडीयोच्या वेळेस हा प्रॉब्लेम आला नसावा कारण कॅमेरा मागे मी पहात होते आणि काही ठिकाणी झूम इन / झूम आऊट करता आले.

स्वप्नाली
सुंदर झालाय आकाशकंदिल!

खूपच सुरेख झालाय आकाशकंदिल.
सुदैवाने हा व्हिडिओ मी आधीच पाहिलेला असल्याने ;-) दिवाळीच्या आधी लेकीने छोटा कंदिल करायचा घाट घातला तेव्हा त्याच्या झिरमिळ्या अश्याच क्विलिंगच्या करायला तिला शिकवता आले. तिला त्यात रस वाटला तर पूर्ण सेट आणून आम्हा दोघींना एकत्रच क्विलिंग शिकता येईल.
सावली खूपच छान गं.

अप्रतिम झाला आहे कंदील

जे डिझाईन हा आकाशकंदिल बनवायला वापरले आहे, त्याची स्कॅन/ फोटो देऊ शकाल का?

व्हिडीओ बघुन सोपं वाटतय, पण ते इतकही सोपं नसणारच याची खात्री आहे. :)

आकाशकंदील आवडला. सोपा आणि सुटसुटीत. खूपच छान!

आकाश कंदील मस्त दिसतोयं, टेंपलेट मिळेल का ?

अप्रतिम झालाय आकाश कंदिल, खुपच आवडला. करायला जमू शकेल असं वाटतंय. घरात नेहमीसाठीही आकर्षक प्रकाशयोजना होईल. शोभा म्हणुन सहज टांगून ठेवायलाही सुंदर आहे.

छान झालाय अगदी.

आकर्षक डिझाईन,मस्त डेमो .

मस्त, सुरेख झालाय कंदिल .. माझ्या मुलालाही खुपच आवडला प्रॉजेक्ट :)

फुलपाखराचा आकार असलेलं डिझाईन कुठून घेतलं त्याची लिंक देणार का?

ते गोलाकार लाईन्स् वरून कट करणं कठिण असेल .. ते व्हिडीयोतून गाळलं का? ;)

थँक्यु :)
प्राजक्ता, सशल,
टेम्प्लेटसाठी या लिंकवर इमेज मिळेल
http://2.bp.blogspot.com/-BUKZP5TLoe8/UoEblsGqstI/AAAAAAAACak/8H1-51Ohgz...

सशल, ते डिझाईन मी कॉम्प्युटरवर काढलेले आहे.
ते गोलाकार लाईन्स् वरून कट करणं कठिण असेल >> नाही. तिथे तसेही फारसे कट्स नाहीत. स्विवेल कटर असेल तर कठीण नाही. विडीयो फार मोठा होत असल्याने मी प्रत्येक स्टेप थोडी थोडी रेकॉर्ड केली. सर्व कटींग वगैरे करतानाचा विडीयो केला तर दोन तीन तासाचा झाला असता. तरी बरेच मोठे / कंटाळवाणे आणि तुकड्या तुकड्यातले रेकॉर्डींग होते. संकलकांनी खुप छान संकलन केलेय त्यामुळे कंटाळवाणे होत नाही. थँक्यु अमित वर्तक, विजय देशमुख.

अरे वा, तू स्वतः काढलं आहेस ते डिझाइन? क्या बात है! :)

तिकडे कॉपीराईट कर ना ..

पुढच्या वर्षीकरता असंच सोपं पण मुलांनां आवडेल (म्हणजे एव्हढं गर्ली नसलेलं ;)) डिझाइन ही कर .. हवं तर डाऊनलोड साठी चार्ज कर .. ;)

ओके गर्ली नसलेलं डिझाईन सुचलं तर देऊन ठेवेन आधीच.