एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात

एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात
शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात

धरेवरी अवघ्या फिरलो, निळ्या अंतराळी शिरलो
कधी उन्हामध्ये न्हालो, कधी चांदण्यात

वने, माळराने, राई,
ठायी, ठायी केले स्नेही
तुझ्याविना नव्हते कोणी, आत अंतरात

फुलारून पंखे कोणी, तुझ्यापुढे नाचे रानी
तुझ्या मनगटी बसले कुणी भाग्यवंत

मुका बावरा, मी भोळा
पडेन का तुझिया डोळा ?
मलिनपणे कैसा येऊ, तुझ्या मंदिरात

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

एक आस मज एक विसावा

हे श्रीरामा, हे श्रीरामा
एक आस मज एक विसावा
एकवार तरी राम दिसावा, राम दिसावा

मनात सलते जुनी आठवण
दिसतो नयना मरता श्रावण
पिता तयाचा दुबळा ब्राम्हण
शाप तयाचा पाश होऊनी, आवळीतो जिवा

पुत्रसौख्य या नाही भाळी
परि शेवटच्या अवघड वेळी
राममूर्ति मज दिसो सावळी
पुत्र नव्हे तो अंश विष्णूचा, वरदाता व्हावा

मुकुट शिरावर कटी पीतांबर
वीरवेष तो श्याम मनोहर
सवे जानकी सेवातत्पर
मेघःश्यामा, हे श्रीरामा, रूप मला दावा

(यातल्या बालकलाकराचा अभिनयही आशाच्या थेट भिडणार्‍या स्वराच्याच तोडीचा!)

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

एक झोका

एक झोका, चुके काळजाचा ठोका ll धृ. ll
उजवीकडे डावीकडे
डावीकडे उजवीकडे
जरा स्वतःलाच फेका ll १ ll
नाही कुठे थांबायचे
मागेपुढे झुलायचे
हाच धरायचा ठेका ll २ ll
जमिनीला ओढायचें
आकाशाला जोडायचें
खूप मजा, थोडा धोका ll 3 ll

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: