फुलला साजिरा संसार माझा

फुलला साजिरा, फुलला साजिरा
फुलला साजिरा संसार माझा
फुलला साजिरा, फुलला

रोज रोज पाहते तरी नविन भासते
सुख असे क्षणोक्षणी जन्म घेई वेगळा .१

पुण्य होई पवित्र म्हणुन नांदते ईथे
इथेच विरूनी जायचे छंद हाच लागला ..२

मजसी या घराविना, चैन ना पडे मला
इथेच स्वर्ग सातही, इथेच मोक्ष लाभला ...३

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

फारा दिवसांनी आज

फारा दिवसांनी आज
उन्हे सोनियाची आली
चिंब साळीची बालके
उब पिऊनीया धाली॥१॥
ही भाताची रोपं जणू पाणीयाच्या वाक्यावाळे
पायी घेऊन नाचली
गेला वारा गंधांगुली
त्याच्या गालांना लावून
मेघ सारून आकाश
त्यांना घेतले चुंबून ॥२॥
त्याना पाहून फुटले
हसू राजेश्री श्रावणा
लोणियाने बळावला
त्याच्या ओठातला दाणा ॥३॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

आळविते केदार

फुले स्वरांची उधळित भवती,
गीत होय साकार
आज मी आळविते केदार

गोड काहि तरि मना वाटले
अनोळखीसे सौख्य भेटले
अबोध सुंदर भाव दाटले
कंपित होता तार

फिरत अंगुली वीणेवरती
मौनातुन संवाद उमलती
स्वरास्वरांवर लहरत जाती
भावफुले सुकुमार

जे शब्दांच्या अतीत झाले
स्वरातुनी या ते पाझरते
एक अनामिक अर्थ घेतसे
गीतातुन आकार

गाण्याचे आद्याक्षर: