शतजन्म शोधिताना

शतजन्म शोधिताना, शत अर्ति व्यर्थ झाल्या
शत सूर्यमालिकांच्या, दीपावली विझाल्या ॥ १ ॥

तेव्हां पडे प्रियासी, क्षण एक आज गाठी
सुखसाधना युगांची, सिद्धिस अंति गाठी ॥ २ ॥

हा हाय जो न जाई, मिठी घालु मी उठोनी
क्षण तो क्षणात गेला, सखि हातचा सुटोनी ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

शब्दावाचून कळले सारे

शब्दावाचून कळले सारे
शब्दांच्या पलिकडले
प्रथम तुला पाहिले आणिक
घडू नये ते घडले ||

अर्थ नवा गीतास मिळाला
छंद नवा अन ताल निराळा
त्या दिवशी का प्रथमच माझे
सूर सांग अवघडले ||

आठवते पुनवेच्या रात्री
लक्षदीप विरघळले गात्री
मिठीत तुझिया या विश्वाचे
रहस्य मज उलगडले ||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

शोधू मी कुठे, कशी, प्रिया, तुला

शोधू मी कुठे, कशी, प्रिया, तुला ?
प्रीती का देई साद ही मजला ?

दिसे कुणी मज पुन्हा लपते, ग
घुमते का शीळ इथे ?
पदरी मी भास खुळे जपते, ग
हलले का पान तिथे ?
वारा हा काही सांगतो मजला !

ओळखीची खूण काही पटते, ग
नच झाली भेट जरी
डोळियांच्या पापणीत मिटते, ग
उमटे जे बिंब उरी
येती या चाहुली कशा मजला ?

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: