अभिप्राय

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २००८ बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे तर ते वाचण्याची आम्हाला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हाला इथे जरूर कळवा.
-संपादक मंडळ

मुखपृष्ठ नेहमी पेक्षा वेगळे आहे, आवडले. बाकी नेहमी प्रमाणे अंक सुंदर झाला असणारच.

सर्व संपादक मंडळ आणि इतर समिती सभासदांचे तसेच लेखक, लेखिका, चित्रकार ई. चे अभिनंदन !

सर्वांना शुभ दीपावली !!

अंकाची यशस्वी चाचणी फक्त पुढील न्याहाळकांवर झालेली आहे - IE 6,7, Firefox, Chrome.
IE 8 न्याहाळकावर काहीवेळा पाने अर्धवटच दिसतात. अशावेळी पान Refresh करायला लागेल.

मुखपृष्ठ, सजावट सुंदर !!!!!!!
अजून एकही शब्द वाचलेला नाही.. पण एकूण अंकाची सजावट बघितल्यावर प्रतिसाद दिल्यावाचून रहावलं नाही.. !

सुरेख सजावट :)
अप्रतीम अंक :)
संपादक मंडळाचे आणि दिवाळी अंकात सहभागी असलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन :)

झकास मुखपृष्ठ! आतल्या पानांची ठेवण ही छान आहे... दिवाळी अंकासाठी परिश्रम घेतलेल्या सगळ्यांचे खूप आभार!
.
मी audio ऐकण्याचा प्रयत्न केला पण बराच वेळ थांबूनही चालू झाला नाही.... "Waiting for vishesh.maayboli.com" एवढच दिसतं खाली ब्राऊजर मधे. firefox वर बघतो आहे.

अंकाचा लेआऊट आणि मुखपृष्ठावरचे सुलेखन अतीसुंदर. तारांकित विभागची कल्पना आणि ती अमलात आणणार्‍या सगळ्यान धन्यवाद. बाकी अंक वाचल्यावर उर्वरित प्रतिक्रिया..

शेवयाचा उपमा भरलेल्या कंरज्यामधला १ला व्हिडिओ नॉट अव्हेलेबल येतंय ते जरा चेक करणार का?

अंक मस्तच झालाय, चाळणं चाललय :)
सगळ्यांचच अभिनंदन

नुसत्या दर्शनाने मन भारावले.
सुंदर अंक! सांस्कृतिक, साहित्यिक मेजवानी चवदार असणारच!
उत्तम अंकासाठी परिश्रम घेणार्‍या सर्वांना धन्यवाद!

मुखपृष्ठ अप्रतिम... अहाहा... अंक सुंदर असणारच...

मुखपृष्ठ एकदम सुरेख झालंय..... बाकी अंक नुसताच चाळून झालाय. काय वाचू आणि काय नको झालंय..सविस्तर अभिप्राय अंक पूर्ण वाचून झाल्यावर... :)

सगळ्यात पहिले ज्या ज्या लोकांनी या अंकासाठी इतकी मेहेनत घेतली त्या सगळ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन :)
अंक एकदम देखणा झालाय.... अजून फक्त चाळलाय...आधाशासारखा..... वाचायला सुरवात नाही करता आली. वाचन, श्रवण झाल्यावर अभिप्राय देईनच. पण हा 'मुंह दिखाई' चा मुजरा :)

लेखकांची नावे मराठीत नसल्यामुळे आम्ही जरा नाराज आहोत.
बाकी अंकाची मीठ-मोह-यांनी दृष्ट काढली पाहिजे :)

-प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अंक मस्तच दिसतोय... मुखपृष्ठ तर अगदी दृष्ट लागेलसं...
दरवर्षी मजकूरात वाढ होतेय. ते पण मस्तच..
वाचून तपशीलात अभिप्राय देत जाईनच.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

मुखपृष्ट दृष्टलागण्यासारखं झालंय.
आज्जुका....लेख मस्त....अगदी मनातलं पण बोलता न येणारं. देशात असताना नेमक एवढ फिरावं लागतं, आणि सोय अशी कधीच नसते. लेक देखील कुरकुर करायला लागलीये हल्ली, इकडे असं काय सगळं घाण घाण असतं म्हणून :(

सन्मी, गोड कथा अगदी सगळ्यांचीच असल्यारखी...जबरी आवडली :)

बाकी अजून वाचणं चालंलय. आजच सगळं वाचावं असला अधाशीपणा डोकावतोय मनात

आता श्रवणीय भाग पण सर्व न्याहाळकांवर (browser) नीट ऐकु येतोय. अजून कोणाला अडचण येत असल्यास कृपया तुम्ही कोणता न्याहाळक (browser) वापरता ते कळवा.

नाही.. अजूनही विंडोज व्हिस्टा होम बेसिक+आयई७ करता ऐकू येत नाहीये. 'क्लिक हिअर टू अपग्रेड फ्लॅश' असाच संदेश दिसतोय. गूगल क्रोम ब्राउझरानेही काही फरक पडला नाही.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

वाचणं चालू आहे आणि धन्य वाटतय..
गुरुजींच्या जादुई कविता, गझला, आणि बाकी काही लेख, कविता, ललित वगैरे वाचून झालंय..
हा अंक अगदी विविधतेने नटलेला आणि सर्वांगसुंदर आहे यात शंकाच नाही.
अभिनंदन....

मुखपृष्ठ, सजावट सुंदर! सुंदर अंक!!!!!!!
सगळ्यात पहिले ज्या ज्या लोकांनी या अंकासाठी मेहेनत घेतली त्या सगळ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन :)
अजून एकही शब्द वाचलेला नाही........ पण एकूण अंकाची सजावट बघितल्यावर प्रतिसाद दिल्यावाचून रहावलं नाही.. !

चिन्मय, डॉ आनंद कर्व्यांची इतकी सुंदर मुलाखत घेतल्याबद्दल तुला शतशः धन्यवाद. (सगळं सोडून शेती करुया ही वांझ इच्छा परत एकदा मनात चमकुन गेली :(
--------------
The old man was dreaming of lions

सुरेख. अंकाची सजावट उत्तम आहे. मुखपृष्ठ सुद्धा आवडलं.
अजून वाचायचाय. यथावकाश प्रतिक्रिया देईनच.

वैभव जोशी... आपण महान आहात!!
तुझी 'नेमस्त..' निदान २० वेळा वाचून काढली असेल!
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

चंपकचा लेख आवडला... बदलाचा अगदी फर्स्ट हॅन्ड अनुभव नेमक्या शब्दांत मांडलाय!
श्रीधर फडकेंशी संवाद खूपच आवडला... रंग किरमिजी माझेही आवडते आहेच...

संकल्पचे चित्र आणि त्यामागचे विवेचन अगदी भिडले!

हनीमूनला गेलेलो तेव्हा चन्डीगढला जाताना वाटेत बस बंद पडली. बर्याच स्त्रियांना प्रश्न पडला शेवटी माझी बायको आणि अजून एक अशीच गरजू एकत्र आल्या आणि एक टॉयलेट शोधून काढले.. तेव्हा इतरांचीही गर्दी तिकडे वळली! तेव्हा मी म्हणालेलो तेच इथेही म्हणावेसे वाटते.. 'किमान या प्रश्नावरून तरी स्त्रियांनी एकत्रित होण्याची गरज आहे'

अज्जुका,लेख परखड असला तरी परिस्थिती सत्य आहे... हा बाका प्रसंग पुरुषांवरही येतोच...

जसजसा वाचत जाऊ तसतसा अभिप्राय देऊच!
_________________________
-A hand that erases past can create a new begining.

सुरेख दिसतोय अंक एकदम. अजून वाचून झाला नाहीय. पण जे वाचलं ते मस्तच. अभिप्राय सारे सवडीनं टाकतेच.
संपादक मंडळाचं अगदी मनापासून अभिनंदन...

सर्वप्रथम दिवाळीअंका साठी कार्यरत असलेल्या प्रत्येकाचे खूप खूप अभिनंदन!! अंक अतिशय सुरेख झालाय.. मुखपृष्ठ तसंच लेखांची रचना,त्यांच्या विभागांची समर्पक शीर्षकं.. केवळ लाजवाब!!
...
संदीप चित्रे, पुन्हा एकदा 'बच्चन' ला भेटवल्याबद्दल खूप आभार!!
अज्जुका, अशा अनेक ज्वलंत विषयाला वाचा फोडण्यासाठी तुझ्या अशा धारदार लेखणीची खरंच खूप गरज आहे गं.. लिहीत रहा..
स्लार्टी, नेहमीप्रमाणेच एक उच्च पातळीवरचा आविष्कार!! जबरी धक्कातंत्र!
मंजुडी, तुझं प्लँचेट लय भारी!!
आणि केदार तुझा शेवटचा पुरावा आवडेश..
आता बाकीचं उद्या.. :)
*~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~*
समाधानाच्या तेलात राहो सुखाची वात, आनंदाच्या ज्योती लावू .. करू दीपोत्सवाला सुरुवात!
:)

एकुण अंकच सुंदर. वाचलेल्या पैकी स्वच्छतेच्या बैलाला, वृद्धाश्रम विशेष आवडले. तारांकित जाम आवडले. संपादन मंडळाचे कौतुक.
प्रसाद शिरगावकर चे लेखन ही आवडते व लेखकातला माणुसही आवडतो. बाकी वरिल प्रतिक्रिया फक्त लेखनाशी निगडित आहेत.
http://faljyotishachikitsa.blogspot.com
प्रकाश घाटपांडे

श्रेयनामावलीतील सर्वांचे अभिनंदन.
अंक अजून वाचायला सुरुवात केलेली नाही. पण नेहमीप्रमाणेच वाचनीय असणार ह्याची खात्री आहे.

अंक देखणा झाला आहे. संपादकीय आवडलं. अजून नुसता चाळला आहे. पण अंकातलं वैविध्य पाहता अंक आजवरचा सर्वात सरस ठरणार याची खात्री आहे. संपदक मंडळाचं पुन:पुन्हा अभिनंदन !!!!!!!!

परागकण

ह्या दिवाळीत वाचायला घेतलेला हा पहिला दिवाळी अंक..

मुखप्रुष्ठ सुंदर.. अंक तयार करण्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे अभिनंदन आणि आभार.

सुंदर मांडणी आणि संकल्पना, सध्यातरी नुसता ऐकतोय अंक वाचायचा बाकी आहेच. इतक्या मेहनती बद्दल संपादक मंडळाचे आभार आणि अभिनंदन. त्याच बरोबर अंकाशी कोणत्याही प्रकारे संलग्न असलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन :)
बाकी अंक वाचल्यावर लिहीनच :)

.................................................................................................................................
** खरे मित्र असाल तर तुमच्या दुखा:तही सहभागी करुन घ्या ! **

१) वैभवची कविता प्रचंड आवडली. खास करुन पहिली आणि अखेरची ओळ एकदम भिडली.
२) परागकण - कविता छान आहे रे.. पण त्याच त्याच आशयची पुनरावृती होते आहे तुझ्याकडून.
३) सामुराई - अलविदा खूपच छान! त्यावरचं चित्रही मस्त.
४) सुमती - कवितेला छान गेयता आहे.
५) मानस - तुझी कविता एकदम छान आहे. खरचं असं व्हायला पाहिजे.
६) मंक्या - कविता छान आहे.
७) स्वरुप - दोन्ही कविता छान आहेत.
८) पमा - छान..
९) चिन्नू - मायेची सय काय लिहिली आहेस कविता!!!!! अप्रतीम.. चांदण्यांचा कशिदा.. पिवळीधम्म शेवंती.. वगैरे वगैरे.. एकदम मस्त..
१०) प्रसाद - बहिणाबाईंच्या मन वढाय वढाय ची आठवण झाली कारण कवितेला लय तशीच आहे... सगळे उपकरण मस्त बसवलेत.
११) हेम्स - निवळ्ळ सुंदर कविता! किती दिवसानंतर तुझी कविता वाचतो आहे. आता नियमित गुलमोहरावर ये..

- बी

असा भरगच्च अंक चाळल्यावर पडणारा प्रश्न म्हणजे पहिलं काय वाचू ?
यावर उपाय म्हणजे क्रमाने वाचत जाणे. तेच आता करते :)

अज्जुकाचा लेख खूप आवडला. त्यावर प्रतिक्रिया द्यायची आहे पण जरा वेळात वेळ काढून.
सायुरी, लेख मस्तच जमलाय. अगदी नेमकी व्यथा मांडली आहेस. जपानमध्ये जाऊन शाकाहारी असणं किती कठीण आहे हे तिथे राहिलेल्यांपेक्षा जास्त चांगलं कुणाला कळणार? तू त्यामानाने लवकर उदोन्,सोबा खायला लागलीस. मला १,२ वर्ष जावी लागली. नाही म्हणायला करी फ्लेवरच्या कप नूडल्स सुरु केल्या होत्या पण त्यावेळी जॅपनीज वाचता येत नव्हतं . त्यात बीफ असतं हे खाऊन खाऊन आवडायला लागल्यावर उशिरा लक्षात आलं. मग खाववेनात. त्या बंद पडल्यावर मग मिसो रामेन,सोबा खायला सुरुवात केली. तोवर ब्रॉथ मध्ये नॉनव्हेज असतं हे लक्षात आलं होतं पण इथे रहायचं तर थोडंफार फ्लेक्जीबल असायला हवं हा शहाणपणा आला होता. सवयीने सुपरमार्केटमधले माशांचे, बीफ,पोर्क चे वास नाकाला खटकेनासे झाले होते. दुसर्‍या भाषेत सांगायचं तर खर्‍या अर्थाने 'रुळू' लागलो होतो.
असो, प्रतिक्रियेच्या नावाखाली खूप पाल्हाळ लावून झालं.

सुन्दर.
अज्जुका , आणि चाफ्फा रॉक्स...
अज्जुका,तु सहिच लिहितेस ग....
खुप छान.

दिवाळी अंक अप्रतिम आहे...चाळुन झाला. आतमधे अजुन छानच असणार.
एवढ्या सुंदर अंकाबद्दल आभार!!

मस्तच ....... मजा येतेय वाचताना !!!

संपादक मंडळींना धन्यवाद !!!

अगदी देखणा दिवाळी अंक. आत्तापर्यंत अज्जुकेचा लेख व चिट्ठी एवढेच वाचुन झाले आहे. अज्जुकेने लिहिलेल्या लेखावर एक बाफ उघडायला हरकत नाही. चिट्ठी खूपच गोड आहे. बाकी सर्व कधी एकदा वाचते असे झाले आहे.

इतका सुंदर संपन्न अंक आमच्या भेटीस आणल्याबद्दल संपादक मंडळाचे आणि सर्व पडद्यामागील कलाकारांचे आभार आणि अभिनंदन !!!

शुभ दिपावली !!!

सुंदर अंक आहे अस दिसतय.जमल्यास आज रात्री वाचायला घेईल.मुखपृष्ठ आणि बॅकग्राउंड एकदम जबरदस्त आहे
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

आतापर्यंत अंक बघण्यातच वेळ घालवला. बघत बसण्यासारखाच आहे. इतकं देखणं आहे न मुखपृष्ठ. त्याची कल्पना तर फारच सुंदर. विभागांची नावंपण अगदी नाविन्यपूर्ण. आता चवी चवीने वाचणार. संपादक मंडळाच, सल्लागारांच, लेखिकांच, लेखकांच, सादरकर्त्यांच आणि मुख्य म्हणजे मायबोलीच कौतुक आणि आभार.

व्वा छान झालाय अंक.. मुखपृष्ठ सुंदर आहे... ताराकिंत विभाग तर एकदम भारी दिसतोय... सावकाश ऐकायला पाहिजे...
इतका सुंदर अंक काढल्याबद्दल संपादक मंडळातील सर्व, त्यांना मदत करणारे आणि मायबोली प्रशासक सर्वांचेच खूप खूप आभार

बाकी प्रतिक्रीया नंतर

    ================
    गझल कार्यशाळेचा निकाल जाहीर सर्व विजेत्यांचे अभिनंदन :)

      अंक अतिशय देखणा झाला आहे. खूप कष्ट घेतलेले दिसत आहेत. संपादक मंडळाने अगदी मनापासून आणि घरचे कार्य असल्याप्रमाणे जीव ओतून काम केलेले दिसते आहे. :)
      नेटका आणि सुबक दिवाळी अंक. सगळ्यांचे अभिनंदन.

      दिवाळी अंक नुसताच चाळलाय अजून वाचले काहीच नाही. मांडणी, सजावट एकदम मस्त. संपादकांचे विषेश अभिनंदन. खूप जीव तोडुन काम केलय हे अंक बघीतला की लगेच कळते. तारांकित विभाग म्हणजे तर मोठी मेजवाणीच आहे. अजुन फक्त द.मा. मिराजदारांची कथा ऐकलीये. बाकीचे सगळे ऐकेन, वाचेन, बघेन तशी तशी प्रतिक्रिया देत जाईन.
      सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!

      अंक अतिशय सुंदर दिसतो. श्रेयनामावलीतील सर्वांचे अभिनंदन.

      आत्तापर्यंत फक्त "बच्चन...", "स्वच्छता..." आणि "निरीक्षक" वाचले. संदीप - सही लेख आहे. सुरूवातीला असे वाटले की बच्चन च्या एन्ट्री बद्दल आहे. पण शेवटचा अर्धा भाग तसा दिसत नाही. तरीही तुझ्या भाषेत 'एसीं' ना काही फरक पडत नाही, आपण एरव्ही बच्चन बद्दल बोलताना जसे कोठूनही सुरूवात करून कोठेही जातो तसेच!. एक मात्र वाटले - तू ८-१० चांगल्या एन्ट्र्या निवडून त्यावरच लिहीला असतास तर आणखी मस्त झाला असता.

      अज्जुका: खूप महत्त्वाच्या विषयावर लिहीले आहे. गेल्या काही वर्षांत सुलभ वगैरेंमुळे परिस्थिती सुधारली असेल असे वाटले होते. आता सरकारी व खाजगी दोन्ही क्षेत्रात बर्‍याच अधिकारीवर्गात बायका असून सुद्धा यात फारसा बदल घडत नाही हे आश्चर्य आहे.

      स्लर्ती - निरीक्षक एकदम जबरदस्त! कधीतरी आजूबाजूला दिसणार्‍या किंवा भेटणार्‍या एखाद्या हुशार व्यक्तीकडे जरा संशयाने बघायला पाहिजे :)

      बाकी अजून वाचायचा आहे अंक. पण पहिले इम्प्रेशन एकदम मस्त!

      संपादक्/ऍडमिनः मायबोली च्या मुख्य पानाखेरीज दुसरीकडे कोठेही लिन्क दिसत नाही अंकाची. ती उजव्या बाजूला वरती गणपतीची आणि दिवाळी अंकांची नेहमी असते तशी देता येइल का?

      संपादक, पहिल्या मराठी दिवाळी अंकाला प्रकाशित होऊन १२५ वर्षे झाली आहेत. लोकसत्ता मधिल बातमी नुसार केरळात पहीला मराठी दिवाळी अंक प्रकाशित झाला. ती चुक दुरुस्त कराल का?

      अंक जबरी आहे, फूल टू मस्त.

      अज्जुका अगदी योग्य शब्दात लिहीलेस अजुनही परिस्तिथी बदललेली नाही, नाही हवे तेवढे ह्या इश्युवर लक्ष ही दिले गेले नाही.

      ट्यूलिप - क्या बात है!. लाजबाब लिख्खा है. गुलजारच्या फॅन्स साठी मस्ट रिड.

      स्लार्टी - जंयत नारळीकर वाचत आहोत असे वाटले, खासकरुन दुसर्‍या रिमोट मधिल बॅटरी बाबतीत. आवडली कथा. (टिव्स्ट मात्र मला आधीच कळाला :) )

      वैभव नेमस्त खुप आवडली.

      चिन्या लेख आवडला. मुख्य म्हणजे तू संघाच्या भूमीकेबाबत बायस न ठेवता मत नोंदविल्याबद्दल तुझे अभिनंदन. सावरकरांसारखे दोन पाच नेते आपल्याला लाभले असते तर आजचा भारत बराच वेगळा दिसला असता. शिवसेना आणि आता मनसे ह्यात ऐक समान धागा आहे तो म्हणजे सर्वजातीसमभाव. कोणी कितीही त्यांचा विरुध्द असला तरी ह्या बद्दल नक्कीच त्यांना क्रेडीट द्यायला हवे.

      चिठ्ठी - संघमित्रा काय जबरी लिहीलीऐस. मस्तच. त्या पंक्या वरुन मला माझ्या घरचे किस्से आठवले. आणि असे मुलीतच नाहीतर मुलांच्या मैत्रीतही होते. :).

      दिसामाजी काहीतरी - ऐकदम श्र टच, आवडली.

      अजुन नुसताच चाळलाय, पण अंक छानच दिसतोय! दिवाळी सुरू झाली हे मायबोलीचा दिवाळी अंक पाहिल्याशिवाय पटतच नाही त्यामुळे दिवाळीची सुरूवात झकास!

      एक गोष्ट मात्र खटकली - मायबोलीचा लोगो अंकाच्या मुखपृष्ठावर बरोबर आहे पण अंकाच्या आत मात्र लोगो मधल्या 'म' ची पार्श्वभूमी पारदर्शक आहे. मायबोलीचा लोगो रजिस्टर्ड असल्यामुळे त्यात बदल करणं योग्य नाही असं या आधी दिवाळी अंकावर काम करताना बोलणं झाल्याचं आठवतय...

      बाकी अंक वाचून होईल तशी प्रतिक्रिया देईनच.

      - प्रिया.

      चंपक, 'आठवणी, सत्य आणि स्वप्न' हा तुझा लेख जिवापाड आवडला. हृदय भरुन आलं वाचता वाचता. अगदी यथार्त चित्रण केलं आहेस.

      संपादक, पहिल्या मराठी दिवाळी अंकाला प्रकाशित होऊन १२५ वर्षे झाली आहेत. लोकसत्ता मधिल बातमी नुसार केरळात पहीला मराठी दिवाळी अंक प्रकाशित झाला. ती चुक दुरुस्त कराल का?
      <<<<<<<
      केदार, लोकसत्तेतील माहिती चुकीची आहे. यावेळच्या बर्‍याच दिवाळी अंकांत शंभरीबद्दलचे उल्लेख आहेत. अर्थात याबद्दल अधिक माहिती ज्याने मायबोली दिवाळी अंकात 'दिवाळी अंकांची शंभरी' हा लेख लिहिलाय तो चिनूक्स व्यवस्थित देऊ शकेल.

      अंक सुरेख आहे. 'तारांकित' विभाग ऐकतेय. जबरदस्त आहे.

      aschigची कथा कळली नाही अजिबात. :-(

      'चिठ्ठी' मस्त आहे.

      चंपकचा लेख छान. सायुरीचा 'निहोन नो र्‍योरी...' आवडला.

      सिद्धार्थचं मोर हे चित्र आणि ओरिगामी खूप आवडलं.

      अज्जुकाने लेखात मांडलेला विषय महत्त्वाचा. कामानिमित्त भरपूर भ्रमंती करणार्‍या प्रत्येकीलाच सतावणारा प्रश्न खूप चांगल्याप्रकारे मांडला आहे. लेख आवडला.

      वैभवची 'नेमस्त' अतिशय आवडली. पुन्हापुन्हा वाचावीशी वाटणारी, सही कविता आहे.

      केदार,
      लोकसत्तेतील ती बातमी चुकीची आहे.
      'दिवाळीनिमित्त खास भेट' असं त्याकाळी अनेक नियतकालिकांवर छापलं जात असे. तसा उल्लेख मी माझ्या लेखात केला आहे.
      'केरळ कोकिळ' या नियतकालिकाने कधीही दिवाळी अंक काढला नाही. डॉ.मीना वैशंपायन यांनीही लोकरंग पुरवणीत लिहिताना केवळ 'मनोरंजन'च्या अंकाचा उल्लेख केला आहे.
      काशिनाथ मित्र यांचे जून १९२०मध्ये निधन झालं. जुलै, ऑगस्टच्या अंकांत या दिवाळी अंकांबद्दल (मित्र यांनी काढलेल्या) सविस्तर माहिती आहे..यावर्षी असंख्य ठिकाणी ही शताब्दी साजरी होते आहे. आणि त्यात आपल्या दिवाळी अंकाचाही उल्लेख होतो आहे.

      लालु, खूप खूप आवडला हा संवाद. मलाही असचं वाटलं होत की दिलीप चित्रे म्हणजेच दिलीप पु. चित्रे.

      साजिरा,
      अतिशय उच्च झालंय तुझं लिखाण, जिओ दोस्त.. पाणी आलं वाचताना डोळ्यात का ते कळलं नाहिये,
      विचार करतेय त्या का चा. ठरवलं होतं सगळं वाचून झाल्यावरच प्रतिक्रिया द्यायची एकदमच, पण राहवलं नाही

      आत्तापर्यंत जे वाचलय त्यात
      .
      स्वाती, स्लर्टी , श्र च्या कथा खूप आवडल्या. संघमीत्रा आणि मंजूच्या कथाही छान आहेत
      .
      साजीरा, संदीप आणि अमोल चे लेख ही भावले.
      .
      वैभवच्या कवीता आवडल्या (खर तर हे मुद्दाम लिहायला नकोच)
      .
      अजून बरच वाचायच बाकी आहे :)