अभिप्राय

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २००८ बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे तर ते वाचण्याची आम्हाला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हाला इथे जरूर कळवा.
-संपादक मंडळ

प्रतिसाद

असा भरगच्च अंक चाळल्यावर पडणारा प्रश्न म्हणजे पहिलं काय वाचू ?
यावर उपाय म्हणजे क्रमाने वाचत जाणे. तेच आता करते :)

अज्जुकाचा लेख खूप आवडला. त्यावर प्रतिक्रिया द्यायची आहे पण जरा वेळात वेळ काढून.
सायुरी, लेख मस्तच जमलाय. अगदी नेमकी व्यथा मांडली आहेस. जपानमध्ये जाऊन शाकाहारी असणं किती कठीण आहे हे तिथे राहिलेल्यांपेक्षा जास्त चांगलं कुणाला कळणार? तू त्यामानाने लवकर उदोन्,सोबा खायला लागलीस. मला १,२ वर्ष जावी लागली. नाही म्हणायला करी फ्लेवरच्या कप नूडल्स सुरु केल्या होत्या पण त्यावेळी जॅपनीज वाचता येत नव्हतं . त्यात बीफ असतं हे खाऊन खाऊन आवडायला लागल्यावर उशिरा लक्षात आलं. मग खाववेनात. त्या बंद पडल्यावर मग मिसो रामेन,सोबा खायला सुरुवात केली. तोवर ब्रॉथ मध्ये नॉनव्हेज असतं हे लक्षात आलं होतं पण इथे रहायचं तर थोडंफार फ्लेक्जीबल असायला हवं हा शहाणपणा आला होता. सवयीने सुपरमार्केटमधले माशांचे, बीफ,पोर्क चे वास नाकाला खटकेनासे झाले होते. दुसर्‍या भाषेत सांगायचं तर खर्‍या अर्थाने 'रुळू' लागलो होतो.
असो, प्रतिक्रियेच्या नावाखाली खूप पाल्हाळ लावून झालं.

सुन्दर.
अज्जुका , आणि चाफ्फा रॉक्स...
अज्जुका,तु सहिच लिहितेस ग....
खुप छान.

दिवाळी अंक अप्रतिम आहे...चाळुन झाला. आतमधे अजुन छानच असणार.
एवढ्या सुंदर अंकाबद्दल आभार!!

मस्तच ....... मजा येतेय वाचताना !!!

संपादक मंडळींना धन्यवाद !!!

अगदी देखणा दिवाळी अंक. आत्तापर्यंत अज्जुकेचा लेख व चिट्ठी एवढेच वाचुन झाले आहे. अज्जुकेने लिहिलेल्या लेखावर एक बाफ उघडायला हरकत नाही. चिट्ठी खूपच गोड आहे. बाकी सर्व कधी एकदा वाचते असे झाले आहे.

इतका सुंदर संपन्न अंक आमच्या भेटीस आणल्याबद्दल संपादक मंडळाचे आणि सर्व पडद्यामागील कलाकारांचे आभार आणि अभिनंदन !!!

शुभ दिपावली !!!

सुंदर अंक आहे अस दिसतय.जमल्यास आज रात्री वाचायला घेईल.मुखपृष्ठ आणि बॅकग्राउंड एकदम जबरदस्त आहे
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

आतापर्यंत अंक बघण्यातच वेळ घालवला. बघत बसण्यासारखाच आहे. इतकं देखणं आहे न मुखपृष्ठ. त्याची कल्पना तर फारच सुंदर. विभागांची नावंपण अगदी नाविन्यपूर्ण. आता चवी चवीने वाचणार. संपादक मंडळाच, सल्लागारांच, लेखिकांच, लेखकांच, सादरकर्त्यांच आणि मुख्य म्हणजे मायबोलीच कौतुक आणि आभार.

व्वा छान झालाय अंक.. मुखपृष्ठ सुंदर आहे... ताराकिंत विभाग तर एकदम भारी दिसतोय... सावकाश ऐकायला पाहिजे...
इतका सुंदर अंक काढल्याबद्दल संपादक मंडळातील सर्व, त्यांना मदत करणारे आणि मायबोली प्रशासक सर्वांचेच खूप खूप आभार

बाकी प्रतिक्रीया नंतर

    ================
    गझल कार्यशाळेचा निकाल जाहीर सर्व विजेत्यांचे अभिनंदन :)

      अंक अतिशय देखणा झाला आहे. खूप कष्ट घेतलेले दिसत आहेत. संपादक मंडळाने अगदी मनापासून आणि घरचे कार्य असल्याप्रमाणे जीव ओतून काम केलेले दिसते आहे. :)
      नेटका आणि सुबक दिवाळी अंक. सगळ्यांचे अभिनंदन.

      दिवाळी अंक नुसताच चाळलाय अजून वाचले काहीच नाही. मांडणी, सजावट एकदम मस्त. संपादकांचे विषेश अभिनंदन. खूप जीव तोडुन काम केलय हे अंक बघीतला की लगेच कळते. तारांकित विभाग म्हणजे तर मोठी मेजवाणीच आहे. अजुन फक्त द.मा. मिराजदारांची कथा ऐकलीये. बाकीचे सगळे ऐकेन, वाचेन, बघेन तशी तशी प्रतिक्रिया देत जाईन.
      सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!

      अंक अतिशय सुंदर दिसतो. श्रेयनामावलीतील सर्वांचे अभिनंदन.

      आत्तापर्यंत फक्त "बच्चन...", "स्वच्छता..." आणि "निरीक्षक" वाचले. संदीप - सही लेख आहे. सुरूवातीला असे वाटले की बच्चन च्या एन्ट्री बद्दल आहे. पण शेवटचा अर्धा भाग तसा दिसत नाही. तरीही तुझ्या भाषेत 'एसीं' ना काही फरक पडत नाही, आपण एरव्ही बच्चन बद्दल बोलताना जसे कोठूनही सुरूवात करून कोठेही जातो तसेच!. एक मात्र वाटले - तू ८-१० चांगल्या एन्ट्र्या निवडून त्यावरच लिहीला असतास तर आणखी मस्त झाला असता.

      अज्जुका: खूप महत्त्वाच्या विषयावर लिहीले आहे. गेल्या काही वर्षांत सुलभ वगैरेंमुळे परिस्थिती सुधारली असेल असे वाटले होते. आता सरकारी व खाजगी दोन्ही क्षेत्रात बर्‍याच अधिकारीवर्गात बायका असून सुद्धा यात फारसा बदल घडत नाही हे आश्चर्य आहे.

      स्लर्ती - निरीक्षक एकदम जबरदस्त! कधीतरी आजूबाजूला दिसणार्‍या किंवा भेटणार्‍या एखाद्या हुशार व्यक्तीकडे जरा संशयाने बघायला पाहिजे :)

      बाकी अजून वाचायचा आहे अंक. पण पहिले इम्प्रेशन एकदम मस्त!

      संपादक्/ऍडमिनः मायबोली च्या मुख्य पानाखेरीज दुसरीकडे कोठेही लिन्क दिसत नाही अंकाची. ती उजव्या बाजूला वरती गणपतीची आणि दिवाळी अंकांची नेहमी असते तशी देता येइल का?

      संपादक, पहिल्या मराठी दिवाळी अंकाला प्रकाशित होऊन १२५ वर्षे झाली आहेत. लोकसत्ता मधिल बातमी नुसार केरळात पहीला मराठी दिवाळी अंक प्रकाशित झाला. ती चुक दुरुस्त कराल का?

      अंक जबरी आहे, फूल टू मस्त.

      अज्जुका अगदी योग्य शब्दात लिहीलेस अजुनही परिस्तिथी बदललेली नाही, नाही हवे तेवढे ह्या इश्युवर लक्ष ही दिले गेले नाही.

      ट्यूलिप - क्या बात है!. लाजबाब लिख्खा है. गुलजारच्या फॅन्स साठी मस्ट रिड.

      स्लार्टी - जंयत नारळीकर वाचत आहोत असे वाटले, खासकरुन दुसर्‍या रिमोट मधिल बॅटरी बाबतीत. आवडली कथा. (टिव्स्ट मात्र मला आधीच कळाला :) )

      वैभव नेमस्त खुप आवडली.

      चिन्या लेख आवडला. मुख्य म्हणजे तू संघाच्या भूमीकेबाबत बायस न ठेवता मत नोंदविल्याबद्दल तुझे अभिनंदन. सावरकरांसारखे दोन पाच नेते आपल्याला लाभले असते तर आजचा भारत बराच वेगळा दिसला असता. शिवसेना आणि आता मनसे ह्यात ऐक समान धागा आहे तो म्हणजे सर्वजातीसमभाव. कोणी कितीही त्यांचा विरुध्द असला तरी ह्या बद्दल नक्कीच त्यांना क्रेडीट द्यायला हवे.

      चिठ्ठी - संघमित्रा काय जबरी लिहीलीऐस. मस्तच. त्या पंक्या वरुन मला माझ्या घरचे किस्से आठवले. आणि असे मुलीतच नाहीतर मुलांच्या मैत्रीतही होते. :).

      दिसामाजी काहीतरी - ऐकदम श्र टच, आवडली.

      अजुन नुसताच चाळलाय, पण अंक छानच दिसतोय! दिवाळी सुरू झाली हे मायबोलीचा दिवाळी अंक पाहिल्याशिवाय पटतच नाही त्यामुळे दिवाळीची सुरूवात झकास!

      एक गोष्ट मात्र खटकली - मायबोलीचा लोगो अंकाच्या मुखपृष्ठावर बरोबर आहे पण अंकाच्या आत मात्र लोगो मधल्या 'म' ची पार्श्वभूमी पारदर्शक आहे. मायबोलीचा लोगो रजिस्टर्ड असल्यामुळे त्यात बदल करणं योग्य नाही असं या आधी दिवाळी अंकावर काम करताना बोलणं झाल्याचं आठवतय...

      बाकी अंक वाचून होईल तशी प्रतिक्रिया देईनच.

      - प्रिया.

      चंपक, 'आठवणी, सत्य आणि स्वप्न' हा तुझा लेख जिवापाड आवडला. हृदय भरुन आलं वाचता वाचता. अगदी यथार्त चित्रण केलं आहेस.

      संपादक, पहिल्या मराठी दिवाळी अंकाला प्रकाशित होऊन १२५ वर्षे झाली आहेत. लोकसत्ता मधिल बातमी नुसार केरळात पहीला मराठी दिवाळी अंक प्रकाशित झाला. ती चुक दुरुस्त कराल का?
      <<<<<<<
      केदार, लोकसत्तेतील माहिती चुकीची आहे. यावेळच्या बर्‍याच दिवाळी अंकांत शंभरीबद्दलचे उल्लेख आहेत. अर्थात याबद्दल अधिक माहिती ज्याने मायबोली दिवाळी अंकात 'दिवाळी अंकांची शंभरी' हा लेख लिहिलाय तो चिनूक्स व्यवस्थित देऊ शकेल.

      अंक सुरेख आहे. 'तारांकित' विभाग ऐकतेय. जबरदस्त आहे.

      aschigची कथा कळली नाही अजिबात. :-(

      'चिठ्ठी' मस्त आहे.

      चंपकचा लेख छान. सायुरीचा 'निहोन नो र्‍योरी...' आवडला.

      सिद्धार्थचं मोर हे चित्र आणि ओरिगामी खूप आवडलं.

      अज्जुकाने लेखात मांडलेला विषय महत्त्वाचा. कामानिमित्त भरपूर भ्रमंती करणार्‍या प्रत्येकीलाच सतावणारा प्रश्न खूप चांगल्याप्रकारे मांडला आहे. लेख आवडला.

      वैभवची 'नेमस्त' अतिशय आवडली. पुन्हापुन्हा वाचावीशी वाटणारी, सही कविता आहे.

      केदार,
      लोकसत्तेतील ती बातमी चुकीची आहे.
      'दिवाळीनिमित्त खास भेट' असं त्याकाळी अनेक नियतकालिकांवर छापलं जात असे. तसा उल्लेख मी माझ्या लेखात केला आहे.
      'केरळ कोकिळ' या नियतकालिकाने कधीही दिवाळी अंक काढला नाही. डॉ.मीना वैशंपायन यांनीही लोकरंग पुरवणीत लिहिताना केवळ 'मनोरंजन'च्या अंकाचा उल्लेख केला आहे.
      काशिनाथ मित्र यांचे जून १९२०मध्ये निधन झालं. जुलै, ऑगस्टच्या अंकांत या दिवाळी अंकांबद्दल (मित्र यांनी काढलेल्या) सविस्तर माहिती आहे..यावर्षी असंख्य ठिकाणी ही शताब्दी साजरी होते आहे. आणि त्यात आपल्या दिवाळी अंकाचाही उल्लेख होतो आहे.

      लालु, खूप खूप आवडला हा संवाद. मलाही असचं वाटलं होत की दिलीप चित्रे म्हणजेच दिलीप पु. चित्रे.

      साजिरा,
      अतिशय उच्च झालंय तुझं लिखाण, जिओ दोस्त.. पाणी आलं वाचताना डोळ्यात का ते कळलं नाहिये,
      विचार करतेय त्या का चा. ठरवलं होतं सगळं वाचून झाल्यावरच प्रतिक्रिया द्यायची एकदमच, पण राहवलं नाही

      आत्तापर्यंत जे वाचलय त्यात
      .
      स्वाती, स्लर्टी , श्र च्या कथा खूप आवडल्या. संघमीत्रा आणि मंजूच्या कथाही छान आहेत
      .
      साजीरा, संदीप आणि अमोल चे लेख ही भावले.
      .
      वैभवच्या कवीता आवडल्या (खर तर हे मुद्दाम लिहायला नकोच)
      .
      अजून बरच वाचायच बाकी आहे :)

      यावेळचे मुखपृष्ठ देखिल आवडले.. यंदा असणार्‍या इतर दिवाळीअंकापेक्षा उत्कृष्ट नि वेगळेपण जपणारे असे मुखपृष्ठ आहे..
      नि अंकाची आखणी सालाबादाप्रमाणे अतिशय चोख !

      मायबोली अंक वाचण्याची मजा काहि औरच !

      आता लौकरात लौकर अंक वाचुन काढायला हवा..

      -::- -::- -::--::--::--::--::-
      Yo Rocks !! तुम्ही म्हणाल जसं..
      -::- -::- -::--::--::--::--::-

      शोभा चित्रे - दिलीप चित्रे ह्यांच्या मुलाखतीत फक्त एकच चूक आढळली. शेवटच्या परिच्छेदात रोहिन्टन मिस्त्री ह्यांना इन्डियन अमेरिकन असे संबोधले आहे. मिस्त्री अमेरिकेत नसून कॅनडा मधे स्थाइक झालेले आहेत. हे सांगायचे अजुन एक कारण म्हणजे २००२ च्या अमेरिकन दौर्‍यात मिस्त्रींना जवळपास प्रत्येक विमानतळावर मानहानीकरक वागणुक मिळाल्याने, ते दौरा रद्द करुन कॅनडास परतले. त्यांनी व त्यांच्या प्रकाशकाने ह्याबद्दल अतिशय कडक भाषेत निवेदन दिले होते.

      --------------
      The old man was dreaming of lions

      एवढा सुंदर अंक उपलब्ध करून दिल्याबद्दल मायबोलीला अनेक धन्यवाद!
      सर्व विभाग सुंदर. संपादकीय, स्थित्यंतर, दृकश्राव्य, किलबिल :) तसेच मर्मबंध, स्पंदन आणि आख्यान... देता किती घेशील दो कराने, अशी अवस्था झाली आहे!
      किलबिलमध्ये भाग घेतलेल्या सर्व चिमुकल्या दोस्तांचे कौतुक करावे ते थोडेच आहे. मोर आणि चारीझार्ड गोड आहेत. सत्याची 'बाप्पा तुझ्या पेंटींगला' बडबडगीतपण छान.
      काव्यवाचन अतिशय सुंदर झाले आहे. वैभव यांच्या सर्व कविता आणि सादरीकरण आवडले.
      पाककृती छान झाल्यात :) शिल्पा अरंगेट्रम बद्दल उशीराने अभिनंदन! रुनी, तुझे आणि टीमचे पण कौतुक. मातीकामाची पद्धत सविस्तर समजावल्याबद्दल धन्यवाद.

      सन्मी, चिठ्ठी एकदम गोड! शिरगावकरांची गोष्ट आणि कविता दोन्ही छान. अलविदापण आवडली. चिनूक्स यांचा दिवाळीवरचा माहीतीपूर्ण लेखदेखील विशेष. स्थित्यंतरात टीपलेली सर्व स्थित्यंतरे छानच. रेखाटने यथोचित.

      उल्लेखनीय म्हणजे दिवाळी संवाद आणि तारांकित विभाग. ह्या विभागावर काम करणार्‍यांचे मनापासून अभिनंदन! मुलाखती छान झाल्या आहेत. तारांकितमध्ये आतापर्यंत अमृता सुभाष यांच्या गोड आवाजातील 'बखर बिम्मची' आणि मिरासदार यांचे खुमासदार कथाकथन तसेच महानोरांचे वैविध्यपूर्ण शैलीतले वाचन.. एवढा फराळ चाखला!
      पुन्हा पुन्हा वाचत, ऐकत आणि पाहत रहावा असा सुंदर अंक!

      बी, तुझ्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.

      स्लर्टि, तुझी 'निरिक्षक' कथा क्लास आहे! कथानक असं छान उलगडत जातं कि व्वा! अजून बाकिचा अंक वाचायचा आहे पण दाद दिल्या शिवाय रहावेना :-) मस्तच जमली आहे.

      आत्तापर्यंत वाचलेले आणि आवडलेले लेख :

      संपादकीय मस्त लिहिलंय... :)

      स्लार्टी, संघमित्रा, स्वाती आणि श्रध्दाके यांच्या कथा खूप आवडल्या.... मंजुडी आणि केदार१२३ यांच्या कथासुध्दा छान....
      'आज दिनांक' हा साजिर्‍याचा लेख खूपच आवडला... खूप सुंदर लिहिलंय....माझी पार्श्वभूमी सुद्धा इंजिनियरींगची असल्यामुळे उत्तरार्ध जरा जास्त भावला....जुन्या आठवणी जाग्या झाल्या...

      केदार चा शिवाजी महाराजांवरील लेख नेहेमीप्रमाणे छान आणि माहितीपूर्ण......

      स्थित्यंतर मधील 'इये मराठीचिये नगरी' हा लेख आवडला...

      बाकी सगळं वाचायचंय अजून.... मायबोलीचा हा दिवाळी अंक म्हणजे मेजवानी आहे एकदम.... अतिशय सुंदर अंक....
      ह्या दिवाळी अंकावर काम करणार्‍यांचे मनापासून अभिनंदन!

      रुनी व नितीन
      आताच तुमची कुंभारकामाची चित्रफीत शांतपणे परत एकदा पाहिली. रुनीच्या मातीकामाची चित्रं पाहिली होती अन लेखही वाचला होता. पण या चित्रफितीची मजा न्यारीच. इतकं मस्त वाटलं पाहून. कॅरल दुव्हॉलच्या शोमधे दाखवतात त्या तोडीची आहे ही चित्रफीत. योग्य जागी व न अडखळता निवेदन, कॅमेराची स्थिर हाताळणी, व्यवस्थित काटेकोर फ्रेमिंग, निवेदनातल्या मोकळ्या जागा संगिताने भरुन काढलेल्या ( त्या संगीताचा ॠणनिर्देश सुद्धा ) सगळं अगदी मस्त जमून आलंय. या करता तुम्ही दोघांनी केलेली तयारी व मेहनत अगदी लक्षणीय आहे. आपल्या पहिल्या दृकश्राव्य अंकासाठी इतक्या कमी वेळात इतकी सुंदर चित्रफीत सादर केल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार व अभिनंदन.

      दिवाळी अंक अजून नीट वाचून, ऐकून, पाहून व्हायचा आहे, सद्ध्या तरी नुसतेच वर वर पाहून झाले आहे. मुखपृष्ठ अतिशय देखणे झालेय! सजावटही सुरेख! पमा, संघमित्रा आणि स्वाती यांच्या कथा वाचून झाल्या आहेत, खूपच आवडल्या!

      देखण्या अंकासाठी संपादक आणि टीमचे आभार!

      संपादक मंडळाचे आणि ज्यानी ज्यानी म्हणुन ह्या अंकपुर्तीसाठी हात भार लावला आहे त्या सर्वांचे अभिनंदन!!!, सालाबाद प्रमाणे यंदाची मांडणी आणि सजावट फार देखणी आहे. मुखपृष्ठ विषेश आवडले.
      वैभव, प्रसाद, मानस, सुमती, चिनु ह्यांच्या कविता विषेश आवडल्या. तारांकित विभाग आणि संवाद तर साहित्य मेजवानी आहेत. किलबिल मध्ये सिद्धार्थ चे चित्र सुंदर आहेत, सोबत त्याच वय आणि माहीती दिली असतीत आमची पण ओळख झाली असती या बालाकाराशी. मिल्याचा माकडाचा मोबाईल चिल्यापिल्यांना खुपच आवडेल. पल्लीची रेखाटन पण छान आहेत

      बाकी अजुन बरच वाचयच बाकी आहे, हा दिवाळिचा साहित्य फराळ हळुहळु फस्त करू म्हणतो...

      सगळ्यांना दिवाळी निमित्त हार्दीक शुभेच्छा!!!

      सुन्दर अन्क.

      कथा विभाग अर्थात आख्यान..
      १. प्लँचेट - ओके. छान वातावरणनिर्मिती. लहान वयाची निरागसता चांगली पकडलीये.
      २. शेवटचा पुरावा - छान थ्रिलर. पण शेवटचा ट्विस्ट obvious होता.
      ३. म्हाद्याचं कलाट - वर्णन कसलं छान पण शेवट इतका obvious होतो आणि गूढतेची फोडणी लागल्याने अजून क्लिशे.
      ४. समाधी योग, सकर्मक यंत्र की स्टॅटिस्टिकल यक्ष - अधून मधून कळल्यासारखी वाटत होती आणि तिथे तिथे आवडतही होती. पण एकूणात बात कुछ हजम नही हुई. माफ करना!!
      ५. भोवरे - साधी सोप्पी पण खूपच छान. वेग आणि प्रवाहीपण अगदी मस्त. राशोमानच्या संकल्पनेचाच वेगळ्या पद्धतीने वापर ते ही छान.
      ६. निरीक्षक - नारळीकरांच्या एका कादंबरीची आठवण झाली. पृथ्वी हे अभयारण्य आहे या संकल्पनेशी विशेषत:. पण कथा छान.
      ७. चिठ्ठी - मस्तंच.. लंपन कथांसारखी मज्जा आली. कुचूकुचू हा शब्द फारच करेक्ट..
      ८. सम - चांगलीये.
      ९. दिसामाजि काहीतरी - चांगलीये.

      -नी
      http://saaneedhapa.googlepages.com/home