अभिप्राय

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २००८ बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे तर ते वाचण्याची आम्हाला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हाला इथे जरूर कळवा.
-संपादक मंडळ

प्रतिसाद

palli-लेख फार छान आहे.
daad-सुंदर वर्णन्.मला पु.लं च्या 'हरीतात्या' सारख वाटल.
sayonara-छान
cinderella-छान
ITgirl,ashwini चांगल लिहिलय
SAJIRA-जबरदस्त लिहिलय् . लिहिलेल सगळ खर आहे का????
bee-ठिक लेख आहे
tulip-मी पण गुलजारचा फॅन आहे त्यामुळे लेख खुप आवडला.
farend-दादागिरी आपण करु शकतोय तर ती आपण करावी

**तुला खरंच वाटतं ३३% आरक्षणाने हा प्रॉब्लेम सुटे****
नाही मला तस वाटत नाही.पण याबद्दल अशा आरक्षणानंतर काहीतरी होण्याची शक्यता आहे.तोपर्यंत पुर्ण देशभरात काही फरक पडायची शक्यता नाही.

----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

सतिशबीव्ही, मरण हे अतिशय अशुभ काहितरी, शुभ प्रसंगी न बोलण्याची गोष्ट वगैरे अंधसमजातून तुमचा असा प्रतिसाद आलेला मला दिसतो. खरेतर तुमच्या प्रतिसादातच ह्याचे उत्तर आहे. >>(काय करणार ? कारण आजही पिक्चर किंवा सिरियल मध्ये जरी कुणी मेल्याचा सीन आला तर आमच्या घरात ताबडतोब चॅनेल बदलले जाते) >>> स्वतःच वरच्या विधानामागील (अ)तार्कीक स्पष्टिकरण मनाशी उगाळुन पहा आणि तुम्हाला उत्तर सापडेल.

लाजवाब! अप्रतिम झालाय यंदाचा दिवाळी अंक! संपादक मंडळाचे आणि सर्व साहित्यिकांचे हार्दिक अभिनंदन आणि मन:पूर्वक आभार. मुखपृष्ठ आणि दिवाळीअंकाचा संपूर्ण आकृतीबंध अतिशय सुंदर झाला आहे. कल्पेश आणि नितीन यांचे कौतुक करतो मी! आत्ता कुठे नुसता चाळून झालाय अंक. वैभवच्या रचना आणि काव्यवाचन खूप आवडलं. जपानी खाद्यजंत्री मस्त...शीतल महाजन आणि इतर सर्वच मुलाखती छान आहेत...भोवरे आणि ठसठसणारा कोपरा ही साहित्य-पुष्पं आवडली...गोकुळवाटा आवडलं... अंकामध्ये किलबिलचा सहभाग आनंददायक...चांदोबाची खडीसाखर गोड आहे. गोखल्यांचा गुलज़ार आणि चंद्र एकदम खास...दोन-तीनदा वाचला.

अंक अजुन पूर्ण वाचून झालेला नाही...पुन्हा येईनच! :-)

आज मर्मबंधाची हवा आहे, सिडनीत. उगवलोय म्हणाला, पण किरणं ढगांआड ठेऊन कुठे पसार झालाय सूर्य कुणास ठाऊक... पक्षांना फरक पडत नाही.... एक प्रकारचा कुंदपणा आहे हवेत... सगळे झोपलेत घरातले अजून... म्हणजे मुहुर्तही चांगला आहे.आलं घातलेला चहा आणि शंकरपाळ्या घेऊन बसलेय....
वैभवा, जे जितकं सहज आणि स्वाभाविक ते तितकच सुंदर, मोहक, आतलं, आणि आरपार भिडणारं... म्हणजे केळीच्या कोवळ्या लुसलुशीत पातीपासून झाडांना उखडून फेकून देणार्‍या झंझावातापर्यंत... निसर्गातलं सगळच कसं आपल्यात भिनतं?
तुझ्या कवितांना, गझलांचा तो स्वभाव आहे.... भिडायचं! एल्गार करून येतात शब्दं आणि निमूटपणे आमच्याच नकळत आपले ठसे ठेऊन जातात. जियो!
तुझी नेमस्त वाचल्यावर शंकरपाळ्या बाजूला राहिल्या आणि हेम्सची मनमुराद परत परत वाचून संपली तेव्हा चहा थंड होण्याच्याही पलिकडे गेला होता!
समोर बसून बोलल्यासारखी गझल उतरलीये. रुसते-बिसते, खात्री-बित्री... त्यातला 'अत्यंत काळजीपूर्वक...' बेफाम आहे!
परागकण, माझ्या नावाचं अदृष्टं आभाळ...... सुरेख!
सामुराई, उलगडते पण तरीही अनवट... "चालू लागशील तू माझ्या मागे तुझ्या परतण्याची वाट पाहत, तुझ्याही नकळत " छानय
सुमतीताई-रे ही सर पावसाची.... एखादी चाल मनात असताना उतरलेले शब्दं वाटतायत. त्यामुळे त्या सुरांसकट ऐकायला जास्तं आवडेल.
मानस६-ठीकय कविता.......
माझा अभिप्राय क्रमशः

-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया

मुखपृष्ठ उत्तम
सगळा अंक वाचे पर्यंत बहुदा पुढचा दिवाळी अंक यायची वेळ येईल इतका हा अंक भरगच्च आहे.
(शोनू मेन्यु मोजका ठेवला असता तरी चालले असते ;-)

आता जे जे वाचले त्या बद्दल स्पष्ट मत,

वेगळया क्षेत्रातील लोक असल्यामुळे असेल पण फडके, चित्रेंपेक्षा कर्वे, महाजन संवाद जास्त आवडला.
प्रसादची मन कुकर कुकर ,अज्जुकाचा लेख हे आवडले
स्थित्यंतर मधिल चंपकचा लेख छान आहे. पण बाप्पा ते सॅन्टा, लग्न आणि सहजिवन हे लेख ठिक ठाक
किलबिल विभागाचे नक्की प्रयोजन काय ते अजिबात समजले नाही. त्यातील चित्रे अतिशय सुमार दर्जा आहे.
लहान मुलांना प्रोत्साहन वगैरे ठिक आहे पण यामुळे अंक अत्यंत अमॅचुअर वाटु लागतो.

संगीत विषयक लिखाण वाचायला मला कंटाळा येतो त्यामुळे गुलजार आणि चन्द्र हे वाचायचे नाही असे ठरवलेले
पण केवळ ट्यु ने लिहिले आहे तर काहीतरी चांगले असेल असे वाटून शेवटी टिचकी मारलीच पण त्यापेक्षा चाफ्याचे चंद्राचे चित्र जास्त आवडले.

बाकी ईतर मजकूर आता पुन्हा भूक लागल्यावर फस्त करणार :)

दिवाळीसाठी मी पुण्याला आलो आहे त्यामुळे सगळ्या धावपळीत अंक फक्त चाळता आला आहे, निवांतपणे स्वाद अजून घ्यायचा आहे. बहुतेक आता १६ नोव्हेंबरनंतर शांतपणे वाचेन :)

नीरजा -- तुझा लेख मात्र आवर्जून वाचला, फक्त शीर्षक वाचूनच. मराठी वृत्तपत्रांना, लोकप्रभा इ.ना तू हा लेख पाठवावा असे मनापासून वाटते.

माणिक, अजूनही भेटेन कदाचित आवडली. लयीत वाचता आली असती तर अजून बहार होती. त्यातली शेवटची ओळ... एखादा माझा विचार ओळखीचे हसेल कदाचित ! सुरेख!
स्वरूप, आपण सारे खरच नापास! समाधानाचा पेपर... तो एक आपला आपल्यालाच सोडवायचा असतो... सगळी उत्तरं असतात प्रश्नांमधेच... किंबहुना फक्तं उत्तरच असतात त्या पेपरात.. आपल्याला प्रश्नं बनून दिसतात फक्तं! मस्तंमस्त कविता!
अपूर्ण... अप्रतिमच!
पमा, ती - बहोत खूब! तिचं काळोखात खुश्शाल विरघळून जाणं... मान गये!
चिन्नू, मायेची सय... अगदी! त्यातला तो "मौनरवे" माझ्याहातून इथे तिथे कुठे सांडलेला दिसला तर आधीच सांगते रागे येऊ नकोस.... काही काही शब्दं नकळत आपले होऊन जातात.
प्रसाद, मन कूकर कूकर! हे असं कसं सुचतं? त्यातलं खास करून 'मन वायर वायर', बहुत आवडलं.
हेम्स, मनमुराद! कवितेभोवती आपण फिरतोय की आपल्याभोवती हे कविता... इतकी मनमुराद आहे! ते शेवटी कंसातलं इत्कं परिणामकारक की ज्याचं नाव ते... कविता खूप वेळा वाचली!

-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया

मर्मबंध अर्थात ललित विभाग
१. अ टेल ऑफ फाइव्ह सिटीज - ठिक आहे. लंडन बद्दल माझं मत थोडसं निराळं आहे पण ते महत्वाचं नाही. बाकी लंडन, न्यूयॉर्क, शिकागो, दुबई आणि सिंगापोर या शहरांबद्दल माहिती असं नव्याने काहीच कळलं नाही किंवा त्या शहराशी तुमचं नातं, तुमचे भावबंध या संदर्भानेही काही फारसं आलं नाही त्यामुळे लेख ठिकच म्हणावा लागतोय. शहरांची निवड थोडी वेगळी असती, नेहमीची नसलेली अशी तर मजा आली असती. असो.
२. बच्चन येतो ना, भौ - बच्चन च्या जादूबद्दल काही वादच नाही. पण लेख म्हणून पसरलाय भरपूर. लेखाच्या लांबीबद्दल नाही म्हणत मी. थोडी कमी उदाहरणं घेऊन तीच elaborate झाली असती तर जास्त गोळीबंद झाला असता लेख. आणि चित्रे साहेब... बच्चन ला बच्चन बरोबरच 'साहेब' असं आदरार्थी बहुवचनात बोलणारी जनता पण आहे.. ते लाडाचं नाव विसरलात काय? :)
३. स्वच्छतेच्या बैलाला...!! - काय लेख आहे की टिंगल? वेळ काय प्रसंग काय आणि विषय काय? असले विषय दिवाळी सारख्या सणासुदीच्या अंकात घ्यायचे म्हणजे काय? श्या अगदीच ताळतंत्र सोडलं ब्वा!! (असं कुठूनतरी कानावर आलं हो!!)
४. सलाम - ओके आहे.
५. दिवाळी - चांगली माहिती आहे. आधी थोडी होतीच पण ती घासूनपुसून स्पष्ट झाली. उरलेली बरीचशी नवीन आणि interesting एकाच संस्कृतीच्या, एकाच धर्माच्या, एकाच सणाचे देशाच्या वेगवेगळ्या भागातले वेगवेगळे आविष्कार वाचायला छान वाटलं.
६. निहोन नो र्‍योरी... अर्थात, जपानी खाद्यजंत्री - खूप माहिती आहे. गरजेचीही आहे. पण खूप लांब आहे लेख. सुरुवातीला मजा येते ही नवीन माहिती घ्यायला. मी स्वतः शाकाहारी असल्याने कधी जपानला जायचे झाले तर मला उपयोग होईल. जपानचं माहित नाही पण वरती कुणी म्हणालं तसं युरोप अमेरिकेत गेल्यावर आपण अगदी सहज आपलं शाकाहारी असणं टिकवू शकतो. काही त्रास पडत नाही.

क्रमशः...

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

शनिवार, रविवार खास अंक वाचायला, ऐकायला आणि पहायला राखून ठेवलेत इतका भरगच्च अंक आहे! शोनू आणि हा अंक तयार होण्यासाठी ज्या सर्वांनी मेहनत घेतली आहे, त्या सर्वांचे अभिनंदन आणि आभार! सर्वप्रथम, मुखपृष्ठ आणि अंकाचा साचा अतिशय देखणा झालाय. श्री. गोसावी आणि श्री. वर्तक यांचे खूप कौतुक! 'दिवाळी' अंक शोभतोय!

आख्यान - भोवरे, सम आणि चिट्ठी आवडल्या. चिठ्ठी तर सहीच! भाषेचा बाज खास जमलाय!
मर्मबंध - एकसे एक कविता. नेमस्त, शब्दस्फटिक, चंद्र तारे.., आपण सारे नापास, मायेची सय आणि मनमुराद विशेष भावल्या.
स्पंदन - पाच शहरांची गोष्ट- लेखात ह्या पाच शहरांशी जुळलेलं नातं, त्या शहरांबद्दलच्या मनात रुजलेल्या गोष्टी, आठवणी हे सगळं आलं असत, तर मजा आली असती लेख वाचायला.
बच्चन.. - मस्त! आवडलाच लेख!
स्वच्छतेच्या बैलाला - परखड लेख. हे कधी ना कधी प्रवासात अनुभवलेलंच आहे. सगळ्या संबंधितांना वाचायला द्यायला हवा हा लेख!
सलाम, दिवाळी, निहोन.., वृद्धाश्रम, फुरुसातो, नाना, उभं जाळत उन, क्रिकेटमधली दादागिरी - हे लेख आवडले.
शिवाजी महाराजांची राज्य व सैन्यव्यवस्था - केदार, नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण, उत्तम लेख.
डिगूकाका - मस्त! प्रत्येक घरात असा एक डिगूकाका हवाच!
संवाद - सगळ्याच मुलाखती सुरेख झाल्यात. खूप आवडल्या. शीतल महाजन, डॉ. कर्वे, श्रीधर फडके, चित्रे दांपत्य - प्रश्नोत्तरे आवडली. फक्त एक जरा खटकले म्हणजे, शीतल महाजनच्या मुलाखतीत इतके इंग्लिश शब्द का? अंकाच्या मुखपृष्ठावर मराठीचा उद्घोष असताना, हे अजूनच खटकते. काही शब्द, जे मराठीतच रुळून गेले आहेत, त्याबाबत समजू शकतो...
अनुभूती - फक्त गोकुळवाटा वाचून झाले आहे. सुरेख!!
किलबिल -मोर आवडला. खडीसाखर आवडली - मस्तच कल्पना!
स्थित्यंतर - सगळेच लेख छान आहेत, खास करुन आठवणी, सत्य... , इये मराठीचिये नगरी आवडले.
आणि हो, अंकामधली चित्रं लाजवाब!!

तारांकित आणि अंकामधलं दृकश्राव्य अजून ऐकायच आणि पहायच आहे! मेजवानीच आहे हा अंक म्हणजे! पीडीएफ कधी निघतेय म्हणे? :)

तारांकित विभागातलं 'बखर बिम्मची' या पुस्तकातील एका भागाचं अमृता सुभाष यांनी केलेलं वाचन फार आवडलं.... ते पुस्तक आता वाचलंच पाहिजे असं वाटतंय...

"तारांकित" विभाग दिवाळीअंकात असावा ह्या सुपीक आयडियेची कल्पना / कल्पनेची आयडीया कोणाची?
कैच्याकैच जबरदस्त विभाग आहे. मोठा मझा आला!
धन्स...!

सगळं वाचून झालं म्हणताना मिश्किली राहिलंच होत की!! झकास एकदम!! चारही लेख आवडले!

चिन्या, आयटी, अज्जूका... माझ्या लेखांवरील प्रतिक्रियांबद्दल धन्यावाद... :)

तारांकित विभागातलं 'बखर बिम्मची' या पुस्तकातील एका भागाचं अमृता सुभाष यांनी केलेलं वाचन फार आवडलं.... ते पुस्तक आता वाचलंच पाहिजे असं वाटतंय... >>>> अगदी अगदी.. मला पण तसच वाटलं. !

वेळ काय प्रसंग काय आणि विषय काय? असले विषय दिवाळी सारख्या सणासुदीच्या अंकात घ्यायचे म्हणजे काय? >>>>> अज्जूका.. हे तुम्ही कुठून ऐकलं माहित नाही.. पण अगदी माझ्या मनातलं !!!! माझ्या मते हा विषय वेगळा बीबी उघडून चर्चेला घेतला असता तर ते जास्त चांगलं झालं असतं.. जशी चर्चा आडनाव, ओळख विषयांवर झाली होती... समस्या अगरी रास्त, लेख उत्तम... पण......................
दिवाळीच्या पहाटे उटणं बिटणं लावून अभ्यंग्स्नान करावं .. नंतर सुग्रास फराळ करावा... डुलकी येता येता हितगुज चा अंक पब्लिश व्हावा.. यादी पाहून उत्सुकतेने दिग्गज लेखकांपैकी एक म्हणून अज्जूका चे लेख उघडावा.. आणि त्यात काय तर लेडीज टॉयलेट मधले वास, तिथली घाणं आणि रिलेटेड समस्या ह्याचा उहापोहं.. (दिवाळीच्या सकाळी, फराळ झाल्यानंतर, अभ्यंगस्नानानंतर) !!!! (मी लेख रंगीबेरंगी वर चुकून आला होता तेव्हाच वाचला ते बरं झालं.. :) अर्थात हे माझं मतं.. बाकी usual disclaimers apply...

>>हे तुम्ही कुठून ऐकलं माहित नाही..<<
काही तुरळक लोकांच्या डोक्यात असंच येणार हे माहितीये मला. आयडी बदलले तरी कळतं कोण कोण आहे ते. :)
पण तुमच्या दुर्दैवाने घोळ असा आहे की संपादक मंडळींना तसं वाटलं नाही. मलाही तसं वाटत नाही.
पण एखाद्या विषयावर लेख लिहावा की चर्चेला मांडावा हे लेखकाचं स्वातंत्र्य आहे नाही का?
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

अडमा, माहिती नसलेल्या शहरांबद्दल लिहायला कशाला हवं? :) तूच म्हणतो आहेस की वैयक्तिक अनुभव आणि शहरांशी भावनिक नातं जोडलं गेलं होत म्हणून. ते बाजूला ठेवून कसं लिहिता येईल? त्या अनुभवांवरुनच तर मत बनणार ना?? असो. अजून वेगळ्या शहरांत तुला जायला मिळो आणि आम्हाला त्याबद्दल वाचायला मिळो!

आणि स्वच्छतेच्या बैलाला... ह्या लेखाचं महत्व स्त्री/ मुलगी झाल्याशिवाय नाही कळणार! ही अशी, तू लिहिलेली प्रतिक्रिया अपेक्षित नाही! - म्हणजे मला तरी बरोबर नाही वाटली... :(

पण एखाद्या विषयावर लेख लिहावा की चर्चेला मांडावा हे लेखकाचं स्वातंत्र्य आहे नाही का? >>>
आहे ना.. मी वरच म्हंटलय.. की हे माझं मत..

पण तुमच्या दुर्दैवाने घोळ असा आहे की संपादक मंडळींना तसं वाटलं नाही. >>>> दुर्दैव कसलं.. आम्हालाही आनंदच आहे.. :)

अज्जुकेचा लेख दिवाळी अंकात उचित की अनुचीत हे प्रत्येकाचे मत असु शकते परंतु ह्या विषयावर एक बाफ देखील उघडावा असे मला वाटते. आपल्यातील प्रत्येकीने हा अनुभव घेतला असेल आणि आपापल्या परीने त्यावर काही ना काही तोडगा पण काढला असेल. कारण शेवटी "न जाऊन" जमत नसते. बाफवर आपापले अनुभव देता येतील.

बाकी आत्तापर्यंत वाचलेल्यात चिट्ठी, निरीक्षक, कलाट, भोवरे, क्रिकेट, बच्चन, आज दिनांक विशेष आवडले. श्रद्धाची कथा ही छान आहे. पोटात ढवळुन आलं अगदी वाचताना. स्पंदन विभाग सगळाच आवडला. विषयांत भरपूर वैविध्य आहे. आज दिनांक खूप आवडले. ते वाचल्यावर गेल्या कित्येक महिन्यात डायरीला हातही नाही लावलाय हे आठवले. तिची मेलेमे खोयी हुई बेहेन साजिर्‍याकडे आहे हे सांगितले पाहिजे तिला आता ;) केदार ह्यांचा माहितीपूर्ण लेख आवडला. आधी तुकड्यांमधे काही वाचीव/ऐकीव माहिती होतीच. पण एका ठिकाणी अशी पहिल्यांदाच. ऍडमने लंडन आणि शिकागो ह्या माझ्या दोन्ही आवडत्या शहरांवर लिहिल्याने एकदमच मज्जा आली वाचायला. माझ्या मनातली प्रतिमा आणि त्याने लिहिलेले पडताळुन बघायला मजा आली.

कवितांमधे (सर्व मला समजल्याने) सर्वच आवडल्या. कविता क्लिष्ट नाहीयेत ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट :)

बाकी बरेच वाचायचे आहे. संवाद, अनुभूती आणि इतर भागांना हातही नाही लावलाय. शाळेला दिवाळीत असायची तशी एक महिन्याची सुट्टी मिळाली तर सर्व दिवाळी अंक आणि वर १-२ पुस्तकांचा फडशा पाडता येईल :)

'पक्ष्यांमध्ये मयुरू...' ह्या मुखपृष्ठावरील ओळी कोणाच्या आहेत? ही कविता आहे का? कोणाला माहिती असल्यास ती सबंध कविता इथे द्या ना....

santino,
मुखपृष्ठावरील ओळी या फादर स्टीफन्स यांच्या ख्रिस्तपुराणातील आहेत.
ख्रिस्त धर्माचा प्रसार व्हावा या हेतूने मिशनर्‍यांनी त्या त्या भागातील भाषा शिकून घेतली. फादर स्टीफन्स यांनी आपली बहुतेक सारी ग्रंथरचना ही त्यामुळे मराठीत केली. 'ख्रिस्तपुराण' हा ग्रंथ मराठीत का लिहिला, याचं समर्थन करताना फादर स्टीफन्स यांनी या ओळी रचल्या आहेत.

जैशी हरळामाजी रत्नकिळा | कीं रत्नामाजी हिरा निळा |
तैशी भाषामाजी चोखळा | भाषा मराठी ||१||
जैसी पुष्पांमाजी पुष्प मोगरी | कीं परिमळांमाजी कस्तुरी |
तैशी भाषांमाजी साजिरी | मराठिया ||२||
पक्ष्यांमध्ये मयुरू | वृक्षांमध्ये कल्पतरू |
भाषांमध्ये मानूं थोरू | मराठियेशी ||३||
तारांमध्ये बारा राशी | सप्त वारांमध्ये रविशशी |
ह्या द्वीपीच्या भाषांमध्ये तैशी | बोली मराठी! ||४||

धन्यवाद santino आणि chinoox. मी हाच प्रश्न विचारणार होते.

तारांकित मधलं बखर बिम्मची आणि जी.एंचं पत्र ऐकलं. ह्या अशा साहित्यकृती चांगल्या अभिवाचकांकडून वाचून घेतलेल्यांचं कौतुक आहे... आणि एखाद-दुसरी नाही तर बर्‍याच गोष्टी आहेत! मस्त वाटलं ऐकुन...आणि इतक्या दूर असून ऐकायला इतकं सहज उपलब्ध झालं ह्याहून अजून काय हवं!

प्लँचेट
शेवटचा पुरावा
भोवरे
निरीक्षक
चिठ्ठी
सम
दिसामाजी.......मस्त जमलेल्या कथा फापट-पसारा न करता सरळ्साध्या. या सर्वच आवडल्या

पुढे स्पंदनमधे;
स्वच्छतेच्या बैलाला...!!.
सलाम!!
दिवाळी
शिवाजी महाराजांची राज्य व सैन्यव्यवस्था,
वृद्धाश्रम
भीमरूपी महारुद्रा डिगूकाका
नाना
ठसठसणारा कोपरा
आज दिनांक..
उभं जाळतं ऊन
क्रिकेटमधली दादागिरी.. आवडले

किलबिल मधल्या मोर, चारीझार्ड आणि ओरीगामी वर ज्यांनी ज्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यांना त्याबद्दल धन्यवाद. सिद्धार्थ नऊ वर्षाचा आहे. इयत्ता तिसरी. कुणीतरी ओळख विचारली होती म्हणून ही अधिक माहिती.

~~~~~~~~~
~~~~~~~~~
:-)

आज खरा अंक वाचायला सुरवात केली.

पहीलाच साजिर्‍याचा 'आज दिनांक वाचला' काय अप्रितीम सुंदर माडणी आहे आणि फार हळुवार विषय. मस्तच...!!!
दुसरा 'स्वच्छ्तेच्या बैलाला' वाचण्या आधी अज्जुकाने कुठल्याश्या विषयावर परखडपणे आणि जळ्जळीत मत मांडली असतिल असे वाटले होते. पण वाचल्यावर आधी प्रतिक्रिया द्यावी अस वाटल. अयुष्यात अनेक विषयावर हतबल झ्याल्या वर जो एक संताप उफाळुन येतो तोच आला ... खरं या गोष्टींचा आम्ही पुरुष कधी विचारच करत नाही, कारण गरजच पडत नाही. आपल्याला आडोसा नसला तरी चालतो मग चिंता करा कशाला. हे वाचल्यावर प्रकर्शाने जाणवत की पुरुष प्रधान संस्कृती म्हणजे काय. खर तर अज्जुका तू जी सम्स्या मांडली आहेस ती समस्या अस्थीत्वात आहे हेच आजवर माहीत नव्हत मग त्या विषयावर विचार करण तर अशक्यच आहे.

क्रमशः

मी अंक वाचायला सुरूवात केली आहे. प्र-प्रथम अंकाची सजावट, मांडणी एकदम आकर्षक आहे. ज्या कोणाचे या साठी हात, ब्रश, डोकं लागले त्या सगळ्यांना प्रणाम!!!

सन्मी, चिट्ठी एकदम शाळकरी वयात घेऊन गेली. मध्येच एक वेळेचा संदर्भ लंपन ची आठवण करून गेला नि मी "वनवास" परत वाचायला घेतलं :)

वैभव, गझल अप्रतिम! "रेड सिग्नल" विशेष आवडली. "वगैरे" माझ्याकडे ऐकता येत नाहीये. पण ती वाचली आहे मी आधी. खरं तर तुझी गझल आवडली असं वेगळं का नि काय सांगायचं असं झालं. कारण हे म्हणजे "गाडीची चाकं सुंदर गोल फिरतात" असं म्हणण्यासारखं आहे. :)

संदीप, सुट्टी मस्त! चिन्मय, तुमचा क्विंटलकुमार आवडला. काही वाक्यांवर अशक्य हसलेय.

सध्या तरी इतकंच वाचून झालेय. अजून वाचलं कि प्रतिक्रिया देईनच!

अतिशय देखणा आणि भरगच्च अंक .... सर्व संबंधितांचे अभिनंदन !!

>>> "तारांकित" विभाग दिवाळीअंकात असावा ह्या सुपीक आयडियेची कल्पना / कल्पनेची आयडीया कोणाची?

ही कल्पना आणि कार्यवाही, दोन्ही चिनूक्सची. द. मा. मिरासदारांच्या कथाकथनाचं श्रेय साजिराला.
(श्रेयनामावलीत तसं नमूद केलं आहे.)

सगळ्या अंकाचा फडशा पाडला एकदाचा, यावेळी प्रकर्षाने जाणवले की गेल्या वर्षी पर्यंत केवळ मनोरंजन आणि करमणुक इथपत मर्यादा असलेल्या अंकाने यावर्षी काही सामाजीक समस्या, वैचारीक लेखन अश्या काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधुन अंक आणखी काही पावले पुढे चालला आहे. या बद्दल सर्वप्रथम सर्व संपादक मंडळाचे आणि त्यासाठी लेखन देणार्‍या लेखकांचे अभिनंदन.
तारांकीत ही एक जबरदस्त मेजवानी मिळाली यातली द. मा. मिरासदारांची कथा अक्षरश: वेळ मिळेल तेंव्हा पुन्हा पुन्हा ऐकलेय हिच तर्‍हा वैभवच्या कविता वाचनाची कविता वाचण्यापेक्षा ऐकायला किती गोड वाटते याचा अनुभव अविस्मरणीय आहे.
रहस्यकथा, गुढकथा विनोदी कथा अश्या सार्‍या लेखनाला एकाच ठिकाणी वाचायला मिळणे म्हणजे कसला अप्रतीम अनुभव आहे, याची सर आणखी कशाला येणे नाही. किलबिल म्हणजे छोट्या दोस्तांची कमाल आहे आणि मला तरी धमाल वाटली :)
बाकी लिहायला शब्द सापडत नाहीत.

satishbv आपल्या अभिप्रायाची दखल घेतली आहे पण नो कॉमेंटस !
.................................................................................................................................
** खरे मित्र असाल तर तुमच्या दुखा:तही सहभागी करुन घ्या ! **

स्वच्छतेच्या बैलाला हा लेख खूप महत्वपूर्ण आहे. ही समस्या सर्वांना आहेच पण तरी सर्वांनी त्यावर विचार करून तोडगा काढायचा प्रयत्न केला तर फार बरे होईल. स्वतंत्र बा.फ. उघडून काही होत असेल तर त्यासाठी माझे अनुमोदन.
ITGirl, Cindrella तुमच्या प्रतिक्रियांबद्दल मनापासून आभार.
दाद, अहो केवळ तुम्हा सर्वांच्या शब्दभंडारावर पोसत्येय जीवाला. कवितेतील शब्दांची मक्तेदारी माझी नाही. तरी तुम्हाला एखादा शब्द आवडलाच तर 'गुरुदक्षिणा' समजा!
तुम्हाला माझी कविता आवडावी हे भाग्य समजते मी.
सर्व मुलाखतकारांचे अभिनंदन. सर्वच मुलाखती आवडल्या. कर्वे यांची मुलाखत फारच उद्बोधक आहे. उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन.
तारांकित विभागासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचेच आभार. दिलीप प्रभावळकरांच्या आठवणी ऐकत रहाव्या अश्या. सोनाली कुलकर्णी यांनी केलेले वाचन पण खूप आवडले. पण सर्वात जास्त आवडले ते बखर बिम्मची-अमृता सुभाष यांनी वाचलेले!

स्वातीजी, माहिती दिल्या बद्दल धन्यवाद !
चिनूक्स आणि साजिरा यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार!