अभिप्राय

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २००८ बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे तर ते वाचण्याची आम्हाला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हाला इथे जरूर कळवा.
-संपादक मंडळ

प्रतिसाद

मुलाखती सर्वच छान आहेत. पण त्यातल्या त्यात डॉ.कर्वे आणि शीतल महाजन यांच्या जास्त आवडल्या.
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

सगळ्यात आधी वाचलं गुलजार आणि चंद्र!- अतीव जिव्हाळ्याचा विषय आहे.... गुलजारही, चंद्रही. दोघे मिळून जीवाचं जे काय करतात त्यालाच "जीवाचं पाणी" म्हणत असावेत :)
ट्युलीप, गेल्या दिवाळी अंकातला पियानोवरची गाणी आणि आता हे! बहोत खूब! ते 'सिली हवा' ज्या नजाकतीने लतादिदींनी म्हटलय... अप्रतिम कंट्रोल.. कुठेही अनावश्यक "हिलकावा" नाही. चंद्रावरचा गुलजारसाहेबांचा शब्दन्शब्दं आणि त्यावरचा तुझाही शब्दनशब्द परत परत वाचला... छा गयी हो!
'आज दिनांक'ने टवका उडवलाच उडवला जीवाचा. किती अप्रतिम लिहिलय, साजिरा. सुर्रेख.
बच्चन येतो ना... संदीप, छान जमलाय लेख. ह्या प्राण्यावर लिहिण्यासारखं खूप आहे त्यामुळे किती लिहू अन किती नाही असं झालेलं दिसतय. मला आवडलेला एक प्रसंग- अभिमानमध्ये "तेरी बिंदिया रे" मधे आजूबाजूचं जग विसरून समोर फक्तं जया असल्यासारखं त्याच्या नजरेनं अपलक तिला "तकत" रहाणं... कॅमेरा थेट आणि फक्तं त्याच्या नजरेवर नसूनही, हे दाखवू शकणारा त्याचा अभिनय... इथे बघणारे आपणही विरघळतो.
चिनूक्स, दिवाळीवरचा लेख छानय. असं एकसंध इतकं माहितीपर वाचायला आवडलं.
आशू(डे), सलाम सुंदर जमलाय. तुला काय म्हणायचय ते अगदी भिडतय.
स्वच्छतेच्या बैलाला... अज्जुका, खरोखर सर्वार्थाने उमळून येऊन लिहिलेला परखड लेख आहे. ह्यातल्या कॉलेजच्या आयुष्यापर्यंतचं सगळं भोगलय. इतकी स्वाभाविक गरज इतकी दुर्लक्षित आहे की, आपली आपल्यालाच नव्हे तर समाजातल्या माणूस म्हणून जगणार्‍या प्रत्येकाला ह्यासाठी स्वतःची लाज वाटायला हवी. महिन्यातल्या त्या चार दिवसांसाठी स्त्रीला किती अन कसं तयार रहावं लागतं... मानसिक, शारिरिक, सामाजिक.. अनेक पातळ्यांवर कसली लढाई लढावी लागते ते त्या जातीला गेल्याविना कळणच शक्य नाही. तुझा हा लेख खरोखर एखाद्या दैनिकात यायला हवा.
वृद्धाश्रम... पल्ले, अप्रतिम अप्रतिम लेख. एखादी शिक्षा दिल्यासारखे रहाणारे हे म्हातारे जीव बघितले आणि त्यांच्यासाठी ठोस असं काही करता येण्यासारखं नाही असं बघितलं की, आपलं आयुष्यं इतकं नपुंसक वाटतं की विचारू नकोस... पण तू म्हणतेयस तसं, त्यांना काही वेळ देता आला तर जरूर द्यावा हे खरं. अगदी आतलं लिहिलयस. सुरेख आहे.
माझा अभिप्राय क्रमशः

-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया

vinaydesai,sandeep_chitre विनोदी लेखन ठिक आहे
chaffa-विनोदी लेख आवडले
chimanyagokhale-तुमचे विनोदी लेखन सर्वात भारी आहे.पुलंच्या उपास ची आठवण येत होती.माझ वजनही वीस दिवसात कमी करायच मी ठरवल होत.मग आधी जॉगिंगला जायला लागलो.पण ३-४ दिव्सांनी खुपच थंडी वाढली.त्याचबरोबर कमी जेवाव म्हणुन एक खास yogurt पित होतो.या सर्वाचा परीणाम म्हणजे आता आजारी पडलो आहे,त्यामुळे जॉगिंगही जमत नाही आणि कमी खाणही जमत नाही.सगळाच पोपट झालाय

----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

आता वाचलेल्यापैकी...

चंपक चे "आठवणी..." एकदम मस्त. पूर्वी मंचर, कळंब वगैरे जवळचे गावतले जीवन बघितले आहे. ते आता कसे बदलले असेल बघायची उत्सुकता यामुळे वाढली.

साजिरा - "आज दिनांक": एकदम छान!
शैलजा - "...कोपरा": चांगला आहे लेख, आवडला.
फ - इये मराठीचिये - मूळ प्रश्नावर (फक्त नोकरी, आपल्यातच फूट पडणे वगैरे...) अचूक बोट ठेवले आहे. अशा प्रकारच्या चित्रातले फारसे कळत नाही, पण लेख आवडला.

दाद, चिन्नु, सत्या,
आभार!
बाफ उघडून चर्चा झाली तर आनंदच आहे. त्यातून कदाचित अजून काही पैलू समोर येतील या समस्येचे.
किंवा कदाचित नुसतीच चर्चा करून गप्प बसण्यापेक्षा आपण या बद्दल काही करू शकतो का याचाही उहापोह करता येईल.
जरूर बाफ उघडूया. प्रशासक ऐकताय ना?

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

यंदाचा दिवाळी अंक चांगलाच दणदणीत आहे, वाचनाबरोबरच श्रवणीय आणि देखणीय मेजवानी आहे. दिवाळी अंकाला हातभार लावणार्‍या सर्वच मायबोलीकरांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.

तारांकित विभाग म्हणजे यंदाच्या दिवाळी अंकाचा मानबिंदू मानला पाहिजे. फारच सुरेख विभाग आहे हा.. मला ऑफिसमधून हा विभाग पाहता येत नाही म्हणून सायबर कॅफेत मुद्दाम जाऊन ३ तास वेळ काढून हा विभाग पाहिला. ३ तास कमीच पडले.

सगळेच विभाग उत्कृष्ट झाले आहेत. विशेष आवडलेल्यांपैकी चिमण्या गोखलेंची कथा.... काही काही वाक्यांवर मनमुराद हसले मी. निखळ विनोदाचा आस्वाद घेता आला ह्या कथेतून. साजिराची 'आज दिनांक' अत्युत्कृष्ट..... बाकी 'स्वच्छतेच्या बैलाला', 'ठुसठुसणारा कोपरा', 'सलाम' ' डिगूकाका' आवडले.आख्यान विभाग सगळाच छान आहे. स्वाती_आंबोळेंची कथा फार आवडली.

'प्लॅंचेट' ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सगळ्यांचेच मनापासून आभार.

champak,supermom,abhaya,sarivina लेख चांगले आहेत
chinoox-जबरदस्त लेख्.खुपच माहीतीपुर्ण आढावा घेतला आहे.चिनुक्स हा खुपच हुशार आणि बुध्दिमान माणुस दिसतोय.त्याच वाचनही अफाट असाव.
pha -जबरदस्त लेख आणि चित्र.

----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

चिन्याला अनुमोदन. 'स्थित्यंतर' विभाग फार छान झाला आहे. दिवाळी अंक पूर्वतयारी मध्ये आवाहन केलं होतं त्याप्रमाणे अपेक्षित सर्व ह्या भागात वाचायला मिळालं. अभया आणि फ चम विशेष कौतुक...

गोष्टी काही कविता आणि दोन लेख वाचून झालेत फक्त.
प्लँचेट : छानच जमलीय.
शेवटचा पुरावा : मस्तच. तरी मधल्या ट्विस्टमुळे शेवटच्या ट्विस्टची कल्पना आली होती पण तरीही छान वाटले वाचायला.
म्हाद्याचं कलाट : कथेचं श्रेय चेकॉव्ह ला. पण ती मराठीत अशा अस्सलपणे आणण्याचं मात्र टण्यालाच.
स. यो. स. यं. स्टॅ. य. : कल्पना चांगली पण थोडी ओढून ताणून कथेत बसवलेली वाटली.
भोवरे : आयडीया भन्नाट. भाषा तर प्रश्नच नाही.
निरीक्षक : ही संपूर्ण आवडली.सुरूवातीला त्यात काय ने सुरू होऊन, अरेच्चा आणि बाप रे ची स्टेशनं पार करत शेवटी गोष्टीतून बाहेर येऊन लिहीणार्‍याला दाद द्यावी लागते. काहीच विशेष न घडताही गोष्टीचा सशक्त शेवट झालाय.
सम : पमाच्या गोष्टी नेहमीच आवडतात. पण ही जरा कमी जमलीय असं वाटतं.
दिसामाजि : क्या ब्बात है!

कविता :
नेमस्त आणि काही बिघडत नाही : वाचकांच्या हृदयाचे धुण्याचे पिळे करण्याचं सामर्थ्य फार थोड्या लेखण्यांत असतं. बस इतनाही!
शब्दस्फटिक : वा!
ती : आवडली.
मायेची सय : बडा दम है यार! कल्पनेचं भान जराही सुटू न देता शब्दांचे इमले भवताली बांधत जायचं सोपं नसतं. लगे रहो.
मन कुकर कुकर : अगदी अगदी!
मनमुराद : नेहमीप्रमाणेच! अगदी हेम्स. प्रत्येक ओळीने रंग चढत गेलाय. आणि सडा सारवणावरच्या रांगोळीनंतरची हळदकुंकवाची शिंपण असते तसं ते "मग मी ..."

लेख :

गुलजार आणि चंद्र : गुलजार आणि ट्युलिप दोन्ही वाचायला आवडतात. सारख्याच इंटेन्सिटीनं. मग तिनं त्यांच्यावर लिहीलेल्याला काय म्हणू? गुलजार डोळ्यांपुढं आलेच आणि त्यांच्या कविता (यांच्या सगळ्या फक्त कविताच असतात. सिनेमातही. बिडी जलईले ही सुद्धा एक उत्तम कविता आहे. मी पहिल्यांदा पाहिलं हे गाणं तेंव्हाही आधी लक्षात आली ती गाण्यातली ब्रिलियंट सेन्शुआलिटी! ) पुन्हा नाचून गेल्या आजूबाजूला. चंद्र मात्र जायचा नाही एवढ्यात.

स्वच्छतेच्या बैलाला .. : अगदी अगदी. हा विषय आपल्याकडं कधी सिरियसली घेतला जाणार आहे देव जाणे. एकूणच स्वच्छता या मुद्द्यावर कायम कॉम्प्रो आणि चलता है ऍटिट्युड असतो. जिवाशी खेळ झाला तरी त्या बाबत काही करायची तयारी नसतेच कुणाची.
अर्थात कोण कशाला, जे काय करायचंय ते आपणच. अगदी कोअरपर्‍यंत या गोष्टीचं शिक्षण पोचलं पाहिजे.
अशा वेळी वाटतं समजून उमजून नाही तरी देवाधर्माच्या धाकानं तरी स्वच्छता सगळीकडे पाळली जाईल का?

<<चिनुक्स हा खुपच हुशार आणि बुध्दिमान माणुस दिसतोय.त्याच वाचनही अफाट असाव.>>

हो ना... वरती कोणीतरी लिहिलंय की तारांकीत विभागाची आयडिया आणि कार्यवाही चिनूक्सची आहे... मागे गणेशोत्सवाच्या वेळी सुद्धा चांगल्या मुलाखती ऐकायला मिळाल्या होत्या....

धन्यवाद रे चिनूक्स! :)

मिश्किली मधले सगळे आवडले.... चिमणने लिहिलेले विशेष आवडले...... त्यातलं जे मध्यवर्ती पात्र आहे, त्याच्या वयाची थोडीशी गफलत झाली आहे असे वाटते... कारण एकीकडे त्या पात्राला लग्न होऊ घातलेला मुलगा आहे, आणि तिकडे जिम मध्ये तो कल्पनाच्या काळ्याभोर डोळयांमध्ये पाहतोय (हिरवट म्हातारा असेल कदाचित).... त्याचा मित्र जो शेवटी कल्पनाशी लग्न करतो, त्याच्याशी झालेले संवाद पाहता हे दोघे समवयस्क असतील असे वाटते... पण ह्यामुळे विनोदनिर्मितीला काही बाधा आलेली नाहिये..... पुष्कळ ठिकाणी मनमुराद हसलो....

छानच आहे दिवाळी अंक, सर्व लेखकांचे आणि संपादक मंडळाचे अभिनंदन.
मला संघमित्राची 'चिठ्ठी' ही सुरेख कथा, 'दिवाळी अंकाची शंभरी' हा चिन्मयचा अभ्यासपूर्ण लेख, आणि जात्युच्छेदनावरचा चिन्याचा लेख विशेष आवडला.

धन्यवाद GS1!!!!!!!!!
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

अंक सर्वांगसुंदर आहे. अंकाच्या निर्मितीला हातभार लागलेल्या सर्वांचे अभिनंदन आणि आभार.

धन्यवाद सन्मी!
श्रद्धा कथा खूप परिणामकारक झाल्ये. मंजु प्लँचेट आवडलं.

चिन्नु, धन्यवाद!! :)

---------------------------------------------
उपास-तपासाच्या मी विरोधात आहे, पण 'फराळाच्या' नाही.... :)

मी Firefox वापरते. इतर दृक्‌श्रवणीय भाग नेहमी दिसतात. पण दिवाळी अंकातला कोणताही दृक्‌श्रवणीय भाग पाहायचा तर Click to Update Flash असा मेसेज येतो. माझ्याकडे आधीचा Flash Player आहे. पण तो अपडेटही होत नाही आणि त्यात या दिवाळी अंकातला दृक्‌श्रवणीय भागही पाहाता येत नाही. काय करू?
बाकी नुसते वाचनीय भाग आणि एकूणच अंक अतिशय अप्रतिम झालाय. मराठी असल्याचा खूप अभिमान वाटतो असं काही पाहिलं की!
इ-दिवाळी अंकाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

आत्ताशी सुरुवात करतेय. दिसामाजी - मस्त जमलीये ग श्रद्धे. लिहित रहा.

सगळं वाचायचंय खरं तर पण वेळ .. :(
~~~~~~~~~
~~~~~~~~~
:-)

अंक नेहमीप्रमाणेच उत्तम!!! सजावट, मांडणी सगळंच छान!!!

श्रध्दाचं 'दिसामाजिं काहीतरी' आवडलं.
वैभवची 'नेमस्त' सुरेख! ('एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते... ' क्या बात हैं!)
सायुरीची 'जपानी खाद्यजंत्री' मस्तच!
सगळे दिवाळी संवाद आवडले.
'गोकुळवाटा' खूप सुंदर गं श्यामली.
रुनीचं मातीकाम पण आवडलं.
'तारांकित' खूप सुंदर झालंय.
'चारझार्ड' लै भारी!! किलबिल विभाग फारच गोड झालाय! :)
'दिवाळी अंकांची शंभरी' खूप छान अभ्यासपूर्ण लेख. चिनमय (चिनूक्स्)ची त्यामागची मेहेनत जाणवतेय.

सगळ्या लेखकांचं आणि इतक्या सुरेख अंकाची मेजवानी देणार्‍या संपादकमंडळाचं हार्दिक अभिनंदन!!!!
..............
भेळ, मिसळ, पाणीपुरी दाबून करा फस्त
नाड्या थोड्या सैल करा, आराम करा मस्त!!! :P

आज अंक वाचयला मिळाला, अजुन पुर्ण वाचलेला नाहिये....

खुपच सुंदर बनलाय हा अंक....

अंकाच्या निर्मितीला हातभार लावणार्‍या सर्वांचे मनपुर्वक अभिनंदन!

वैभव >काय बोलु शब्दच नाहीत!! काव्यवाचन अप्रतिम !!
संपादक मंडळाचे मनपुर्वक अभिनंदन!

****************************************

सायुरी छान लिहीलंय गं. मला फार आवडलं. भाषा सुरेख. आणि लिखाण एकदम इंटरेष्टिंग झालेय. एखाद्या मुरलेल्या पुस्तकंबिस्तकं छापलेल्या लेखकासारखं.

दाद डिगूकाका वाचलं. जमून आलंय अगदी. पण तुझी ष्टगो का नाही म्हणे या वेळी?

adm टेल ऑफ फाईव्ह सिटिज मस्तच. फोटो पण छान. आणि नुसती गावाची वर्णनं नाहीत तर तिथल्या माणसांच्या मेंटालिट्या आणि आपल्याशी कंप्यारिझनी पण सही आहेत :)

अजून वाचतेय बाकीचे.

सुंदर अंक! सगळ्यांचे अभिनंदन.

'दिसामाजिं काहीतरी...' वर आलेल्या सर्व प्रतिक्रियांसाठी मनापासून धन्यवाद. :-)

चिनूक्स, 'दिवाळी अंकांची शंभरी' हा लेख महान आहे. त्यातले दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठांचे फोटो, बारीकसारीक तपशील हे वाचताना तुझी लेखामागची मेहनत जाणवतेय. पुनःपुन्हा वाचण्याजोगा लेख. :-)

डिगूकाका अतिशय आवडले. 'हल्-ए, हे डिगूकाकाला येतं..' कित्ती गोड!
असे प्रेमळ काका सर्वांना लाभो..

संघमित्रा - चिठ्ठी एकदम मस्त
चिनूक्स - दिवाळी वरचा लेख छान आहे, बरीच माहिती मिळाली. एक फक्त कळले नाही - उत्तर धृवाजवळ सहा महिन्यांची रात्र साधारण मे-जून च्या आसपास संपत असेल ना? दिवाळी च्या सुमारास नाही.
दाद - डिगूकाका मस्त!

हळुहळु सगळा दिवाळी अंक वाचला/वाचतेय.
खर तर प्रत्येकच कलाकृती छान झालीये त्यामुळे हे आवडले ते नाही असे काही नाहीये. आवडली, जास्त आवडली, खूप आवडली अश्या कॅटेगरीत सगळ्या कलाकृती मोडतात.
ह्या सङळ्यासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले त्यांच्या कष्टाचे चीज झालय.
या वेळी सगळ्यात जास्त आवडलेला विभाग म्हणजे तारांकित. मला दिलीप प्रभावळकरांचे वाचन सगळ्यात जास्त आवडले. बाकीचीपण छानच.
संवाद : यात सगळ्यात जास्त आवडलेली मुलाखत म्हणजे डॉ. आनंद कर्वे यांची.
आख्यानः मस्तच. सगळ्याच कथा आवडल्या. भोवरे जास्त आवडली. प्लँचेट, निरीक्षक्,चिठ्ठी, दिसामाजी काहीतरी सगळ्याच कथा मस्त.
मर्मबंध : मला कवीता कळत नाहीत त्यामुळे या विभागाकडे फिरकले नाही.
स्पंदन : दादचे डिगुकाका वाचुन हरितात्याची आठवण झाली. बाकी सगळे लेख पण आवडले. पहिल्यांदाच जपानबद्दल एवढी माहिती वाचायला मिळाली सायुरी आणि सायोनारामुळे. केदारचा लेख वाचला, बरीच माहिती मिळाली. हे सगळे आपल्याला शाळेत का नाही शिकवत. की शिकवतात आणि अभ्यास न केल्यामुळे मला माहित नाही, कोणास ठावुक. फारेंडचा लेख मला शिर्षक वाचुन (गांगुली) 'दादा' निवृत्त झाला त्याबद्दल आहे असे वाटले पण वेगळा निघाला. बाकीच्यांचे लेख पण आवडले. दिवाळी बद्दल बरीच माहिती कळली.
मिश्किली: चिमण्यागोखलेंची कथा जास्त आवडली.
किलबील : माकडाचा मोबैल (ती छोटी गायिका असाच उच्चार करते गाण्यात) आवडले. बाकीचे पण मस्तच. पुढच्या वेळी बालकलाकारांबद्दल पण माहिती दिलीत तर छान होईल.
अनुभूती : वैभव जोशींच्या कवीता मस्तच. नखचित्र सोडुन बाकीचे सगळे विडीओ थोडे जास्त लांबीचे झालेत असे मला वाटले. ( माझा स्वतःचा पण :) )
स्थित्यंतर : पूर्ण वाचला नाहीये अजुन. दिवाळी अंकाची शंभरी आणि लग्न ते सहजीवन हे २ लेख वाचलेत दोन्हीही खूप आवडले.

अतिशय सुखद अनुभव आहे दिलीप प्रभावळकरांच्या आवाजात त्यांनी लिहिलेलं ऐकणं हा. दिलीप प्रभावळकर नुसते कलाकार कधीच वाटले नाहीत. ते नेहेमीच कुणीतरी जेष्ठ आणि ज्यांच्याबद्दल आदर वाटावा असे कुणीतरी जवळचे वाटत राहतात.
चिनुक्स खूप खूप धन्यवाद.

द. मांची कथा पण छान रे साजिर्‍या.

साजिर्‍या तुझं 'आज दिनांक' छान जमलंय रे. अगदी मनापासून लिहिलं आहेस.

~~~~~~~~~
~~~~~~~~~
:-)

अंक आल्या आल्या सगळ्यात प्रथम काय केलं असेल तर वैभवच्या कविता वाचल्या आणि त्याच्या आवाजातल्या कविता ऐकल्या. झकास वाटलं एकदम तृप्त.

प्रसादः 'मन कुकर कुकर' धमाल रे एकदम.

प्लँचेट: मंजू अगदी दिवाळी अंकातली गोड गोष्ट झालीये गं !
चिठ्ठी: सन्मे खुपच छान जमलीये गं छोटीशी, आटोपशीर.
(या दोन्ही कथा वाचून मला खरं तर एकदम 'किशोर' च्या दिवाळी अंकाची आठवण झाली. मस्त वाटलं एकदम. )

~~~~~~~~~
~~~~~~~~~
:-)

सचिन

मला ग्रंथालीची मेल आली आणि मी सरळ वाचायला सुरुवातच केली. मला अंक इतका आवडला की, सतत वाचतच राहिलो. आपण खूपच मेहनत घेऊन हा अंक सिद्ध केला आहे,त्या बद्दल तुम्हा सर्वांना जेव्हढे धन्यवाद द्यावे तेव्हढे ते कमीच आहे. मद्याची गोष्ट, पाप्याचं वाजवणं हे मनाला भिडून गेलं. अभिताभवरचा लेख चांगला जमला. थोरांच्या आवाजात कविता ऐकणे ही तर मेजवाणीच होती. प्रत्येकच सदर वाचणीय झालं आहे.

अंकाची सजावट उत्तम आहे.
मी मागील चार महिन्यांपासून अमेरिका आणि इंग्लंड मध्ये फिरत आहे, त्यामुळे दिवाळीच्या काळात भारतात नव्हतो. दिवाळी अंक न वाचल्याने चुकल्या चुकल्या सारखं वाटत होतं. ती उणीव तुमच्या या अंकानं पूर्ण भरून काढली यात शंका नाही. भारता पासून दूर राहणारांसाठी हा तुमचा सधा नाही तर भरीव उपक्रम आहे. गांगलांनी मला ही लिंक पाठवली म्हणून त्यांना धन्यावाद. ग्रंथालीचा मी सुद्धा एक लेखक आहे. तुम्हा सर्वांचे आभार तसेच, तुम्हा सर्वांना मझ्या मनपासून शुभेच्छा.
भाऊ गावंडे, सद्या लंडन.

चिन्मय गोखले साहेब,

" ठरविले अनंते "
मस्त मजा आली लेख वाचताना.
...असेच लिहीत रहा! धन्यवाद!

- मयूर भागवत.