अभिप्राय

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २००८ बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे तर ते वाचण्याची आम्हाला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हाला इथे जरूर कळवा.
-संपादक मंडळ

प्रतिसाद

वैभवच्या सगळ्या कविता आणि गझल ऐकल्या. त्याच्याच आवाजात ऐकायला वाचण्याहून वेगळी मजा आली. त्यात हलकस्सं संगीतही मस्त वाटलं.
.
माकडाचा मोबाईल गाणं पण छान जमलंय... अजून वाचन फारसं झालं नाहिये...

केदार्,संघाने जात्युच्छेदनाबाबत जास्त प्रयत्न करायला हवेत्.त्यासाठी सावरकरांचा आदर्श ठेवायला हवा.
सगळ्यात पहिल्यांदी शिवाजी महाराजांवरचा लेख वाचला.खुप आवडला.बरीच नवी माहीती दिलेली आहे.औरंगजेब्,अकबर ५०% कर आकारत होते ,त्यामानानी शिवाजी महाराजांचा कर कमी होता. शिवाय मुघलांची जमिन मोजण्याची पध्दत दोरीवर आधारीत होती ज्यामध्दे फसवणुक होत असे.
मंजुद्,कथा चांगली आहे.केदार्,टन्या यांच्या कथाही छान आहेत्.स्वाती आंबोळेंची कथाही भारी आहे. अशिगला काय म्हणायचय कळल नाही.

----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

सिंड्रेला आणि दाद यांनी लिहिलेलं व्यक्तिचित्रण आवडलं....

श्यामली, गिरी, आशु डी, घाटपांडे, सायो, रूपा, शिंडीबाय, फारेंड, केदारजोशी, श्रद्धा,
तुम्हा सगळ्यांचे आभार. लेख चांगला झालाय त्याचं कारण केवळ आणि केवळ मिळालेल्या शेलक्या अनुभवांना जातं.. :)
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

मर्मबंध अर्थात कविता विभाग...
१. नेमस्त - या एकाच कवितेवर मी ४ निबंध लिहेन. पण वैभव जे थोडक्या मोजक्या शब्दात म्हणतोय त्याच्या अंशानेही ते निबंधात उतरणार नाही. कविता अप्रतिम. मी पाठच करून ठेवतेय. जिथे तिथे ओळी टाकून.. माझ्या मित्राची आहे म्हणत मिरवायला... :)
पण एक problem आहे. साला ही कविता वाचल्यावर बाकी सगळं बाद वाटतंय. ही कविता सगळ्यात शेवटी ठेवायला हवी होती राव!!
२. काही बिघडत नाही - काय लिहिणार रे बाबा!! मस्तच मस्त!
३. शब्दस्फटिक - वा छान रे पिक्या. शेवटी आपण गुलमोहर भरत बसतो ते कशासाठी
'माझ्या नावचं अदृष्ट आभाळ
क्षणभर साकारण्यासाठी....'
हो ना!!
४. अलविदा - प्रवाहिका.. छानच. 'बेधडक साहसी सुखे' क्या बात है.. फारच करेक्ट शब्द आहेत.
५. रे ही सर पावसाची - दुसर्‍या ओळीत 'साजणाची' ऐवजी 'सजणाची' केलं तर लय जास्ती सांभाळली जाईल का? बाकी कविता छान. हळदीकुंकू संदर्भ आवडला.
६. चंद्र तारे खूप झाले - ठिक आहे कविता. कल्पना छान पण व्यक्तता फारशी आवडली नाही. 'आणि सिरीयल्सचा आत्मा असलेल्या,
छद्मीपणावर लिही' याचा संदर्भ काय?
७. अजूनही भेटेन कदाचित - नक्की काय म्हणायचंय ते कळलं नाही. 'ती' जी दूर आहे तिची याचना तर दिसतेय पण बघ एकदा अजूनही भेटेन कदाचित अशी अकडही आहे. I am confused! ती यायला हवीये की नाही?
८. आपण सारे नापास - कविता चांगली आहे. समाधानाचा पेपरची कल्पना आवडली. पण नैराश्याचं उदात्तीकरण वाटतंय. ते पटत नाही. आपल्या आयुष्यातल्या घडून गेलेल्या आणि राहून गेलेल्या बहुतांशी घटनांना, इच्छांना आपणच जबाबदार असतो. एखाद्या गोष्टीच्या मागे धावूनही घडलं नाही म्हणून वाईट वाटणं ठिक पण गणितं बांधत चौकटीत आयुष्य बांधून मग त्यातून आलेल्या निराशेला मखरात बसवणं मला तरी पटत नाही. हे माझं मत. तुमचं तुमच्यापाशी.
९. अपूर्ण - छान आहे कविता. फक्त
'कधी कधी असं होतं
राहते एखादी कविता 'अपूर्ण'च'
इथेच संपवायला हवी होती. पुढचं
'जसं राहून गेलंय आपलं नातं
जसं... राहून गेलंय आपलं नातं!'
याची गरज नव्हती. हे चमच्याने भरवल्यासारखं वाटतं.
१०. ती - जास्त शब्दांकित आणि गूढ करायचा सोस.
११. मायेची सय - खूपच वैयक्तिक अनुभव आहे गं. पाणी आलं डोळ्यात.
'आई, तू जन्मोजन्मींची कुबेर..'
आणि
'माझं इवलंसं आभाळ समृद्ध करायला,
अशीच येशील ना?'
अगदी अगदी!!
१२. मन कूकर कूकर - वा मस्त की रे. मन फ्रीजर फ्रीजर
'आत आत गोठलेले
थेंब कुठल्या क्षणांचे
कुठे कुठे दाटलेले'
अगदी अगदी

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

त. टी. - ही केवळ माझी मते आहेत. जागतिक किंवा वैश्विक सत्य नाही. इतरांची मते वेगळी असू शकतात. माझी किंवा इतरांची मते कोणतीच चूक वा बरोबर नाहीत. कुणाला या मतांचा राग येत असेल तर येवो त्याला मी काही करू शकत नाही. पण उगाच वैयक्तिक टिका म्हणून ढोल वाजवत फिरू नका.

रुनी, मातीकामाचा व्हिडिओ मस्तच आहे. बघून शिकावंसं वाटायला लागलंय. कुठे शिकते आहेस?

आख्यान -
चिठ्ठी - फार आवडली.. शाळेच्या दिवसात परत गेल्यासारखं वाटलं.. गोड!!
दिसामाजी काहीतरी - कथा छान आहे.. पण स्टेशनवर पोहोचायच्या आधीचा भाग थोडा जास्त वाटतो..
..
स्पंदन :
आज दिनांक - साजिर्‍या, काय लिहिलंयस रे तू!! मनाच्या आत खोल खोल काहीतरी जाणवत राहिलं कितीतरी वेळ.. त्या भावना शब्दांच्या चिमटीत पकडायला खूप कसब लागते.. तुझी डायरी एकदा पळवीन म्हणते.. म्हणजे असलं भारी खूप खूप वाचायला मिळेल.. :)
...
मर्मबंध :
नेमस्त ,काही बिघडत नाही - काय बोलू!! शब्द अपुरे.. तोंडपाठ करुन ठेवण्याजोग्या..
अलविदा - आवडली.
मन कूकर कूकर - मस्त मस्त!! खरीखुरी!!
मायेची सय - डोळ्यांत पाणी आलं..
किलबिल :
बाप्पा, तुला पेंटिंगला केवढा मोठ्ठा पेपर! - कसं सुचतं इतकं गोडगोड तुम्हाला सत्यजित !! मस्त..
माकडाचा मोबाइल - काढू छान फोटो... हे हे हे!! आवडली.
*~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~*
समाधानाच्या तेलात राहो सुखाची वात, आनंदाच्या ज्योती लावू .. करू दीपोत्सवाला सुरुवात!
:)

बढिया

फ, चित्र नेहमीप्रमाणे अप्रतीम आहे पण त्यावरचं वर्णन प्रचंड आवडलं. त्या वर्णनात एक ताकत जाणवते वाचताना.

अज्जुका, अगदी तळमळीने लिहिला आहे विषय. पुर्णपणे अनुमोदन!

केदार, मस्त जमला आहे लेख. माहितीपुर्ण!

सगळाच अंक मस्त आहे, मुखपृष्ट पण छान.
'फक्त वाचण्याचा' असा जो भाग होता त्यातले आवडलेले -
स्पंदन- गुलजार, आज दिनांक, स्वच्छता, डिगूकाका, बच्चन
आख्यान - निरीक्षक, भोवरे, दिसामाजी
कविता - नेमस्त, काही बिघडत नाही, मन कूकर
अनुभूती (अजून सगळं पाहीलं नाहीये) - मातीकाम
मिश्कीली - बैल कमाई
किलबिल- सगळेच मस्त - बापा (पेंटिंग), खडीसाखर, मोबाईल आणि चित्रं
स्थिंत्यंतर - चंपक, सुपरमॉम, चिनूक्स

कधि कधि फान्ट निट दिसतात कधि कधि नाहि दिसत. प्लिज बघावे.
बाकि अन्क खुप सुन्दर झाला आहे.

दिपा

सर्वप्रथम या अंकाच्या निर्मितीला हातभार लावणार्‍या सर्वांचे मनपुर्वक अभिनंदन!
खुपच सुंदर बनलाय हा अंक....

अजुन पुर्ण वाचलेला नाहिये....
वाचलेल्यातील चिठ्ठी आणि दिसामाजी काहीतरी अप्रतिम....
नेमस्त, शब्दस्फटिक आणि मायेची सर खुप आवडल्या....
बाकीचे अजुन वाचुन व्हायचेय (सुट्टी संपून ऑफिसला गेल्यावरच सगळ वाचुन काढायला निवांत वेळ मिळेल बहुतेक ;) )

बी प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
अज्जुका, तुझ्याही 'खरपूस' प्रतिसादाबद्दल धन्यवाद..... (मी काही तुझ्यासारखं माझ्या लेखनाचा उहापोह नको वगैरे म्हणणार नाही :दिवा: )

हितगुजचा दिवाळी अंक (२००८) चाळला, थोडा वाचला (पुरवून पुरवून वाचतोय). खरोखरच अप्रतिम अंक काढला आहे. विशेषत: डॉ. कर्वे, चित्रे दांपत्य आणि श्रीधर फडके यांच्या मुलाखती सुंदर आहेत (डॉ. कर्वे यांची मुलाखत ज्ञानवर्धक आहे, ती सर्वदूर पोहोचली पाहिजे.) . कैक जुन्या प्रस्थापित दिवाळी अंकापेक्षा दर्जेदार आणि सकस साहित्याने समृद्ध आहे. परदेशात इतका सुंदर अंक वाचायला मिळाला हे भाग्यच.

पुन्हा सर्व संपादकांचे आणि हा अंक वाचनीय करणार्‍या सर्व साहित्यिकांचे मनपूर्वक अभिनंदन.

>>(मी काही तुझ्यासारखं माझ्या लेखनाचा उहापोह नको वगैरे म्हणणार नाही :दिवा: )<<
आपण दोन गोष्टींची गल्लत करताय. ठिके तुमची मर्जी.

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

slarti-कथा छान आहे.मला 'वामन परत न आला'ची आठवण झाली.sanghamitra,pama-कथा ठिक आहेत.
shraddhak -भारी कथा लिहिली आहे.माझ्यामते सगळ्यात चांगली.आधी 'मिट्टी के रंग' मधल्या एका कथेसारखी वाटली पण नंतर धक्कादायक झाली.

----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

कथा सर्वच आवडल्या. चिठ्ठी, प्लँचेट, निरिक्षक, दिसामाजि, भोवरे छानच. महाद्याचं कलाट ही कथा हळुवारपणे उलगडत नेणे - हे आवडले.
स्पंदनमधील लेख एक झाकावा आणि दुसरा काढावा असे! व्यक्तीचित्रणे पुन्हापुन्हा वाचली. ऍपल पिकींग, आज दिनांक, गुलजार सुंदर! उभं जाळतं ऊन, ठसठसणारा कोपरा हे लेख विचारास भाग पाडणारे. सायुरी आणि सायोनारा, अनोख्या खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडविल्याबद्दल धन्यवाद! शिवाजी महाराज, दिवाळी, फाईव्ह सिटीस माहीतीपूर्ण. क्रिकेट आणि बच्चन हे लेख म्हणजे पंख्यांना अगदी मेजवानीच..
आशुडी, सलाम पोचला गं. मुंबईच्या पावसात होणार्‍या हालाला वाचा फोडलीस. पावसामुळे अडकणे सवयीचे होते मलाही.. लोकल सुरु व्हायची वाट, भोवतालचा अंधार आणि टोचणार्‍या नजरांचा त्रास.. या सर्वांतून न गेलेली मुंबईकर स्त्री क्वचित असेल. कुठे मदत मिळते कुठे मदतीचा बहाणा.. पण तरी त्या दिव्याला सामोर्‍या जाण्याच्या धैर्याला सलाम माझाही..
स्वच्छतेच्या बैलाला हा अतिशय महत्वपूर्ण लेख. या समस्येची गंभीरपणे दखल घेतली जाऊन, कधीतरी हा लेख स्थित्यंतरे मध्ये मोडेल - अश्या सुवर्णक्षणाच्या प्रतिक्षेत..
मिश्किलीमध्ये महाप्रवास आणि ठरविले अनंते आवडलेत.

आज्जुका, आशु, स्वरूप.. धन्यवाद दोस्तांनो!

अप्रतिम अप्रतिम अंक! वेळ मिळाला तसा, आधी नुस्ता चाळला....
आता एकेक भाग वाचत खर्‍या अर्थाने दिवाळी साजरी करतेय.
आभिनंदन! संपादक आणि त्याना मदत करणार्‍या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. अतीव देखणा अंक आहे. मुखपृष्ठ वेगळं. संपादकीय पासून सगळं वाचनीय दिसतय. त्यात आजच्या दिनचर्येतली "तपश्चर्या" किती नेमकी टिपलीये!
आख्यान - चकली सोबत चावलं.... आपलं वाचलं!
मंजूडे, प्लँचेट खासय. मला आमच्या लहानपणीची आठवण झाली. कथा सुरेखच.
केदार, शेवटचा पुरावा सुरेख उलगडलीये. आवडली.
टण्या(का तान्या रे?), म्हाद्याचं कलाट- भावानुवाद..... सुरेख.
आस्चिग - हे नक्कीच एक झक्कास कथानक आहे.... पण अगदी खर सांगायचं तर त्याच्या मांडणीमुळे असेल कदाचित... पण निसटल्यासारखं वाटतय. शंकराचार्यांचे पुढे "शंकर" झालाय की, टाइपो आहे....
स्वाती, भोवरे... अप्रतिम. किती आतूर असतो नाही माणूस..... घडल्या-न घडल्याची जबाबदारी शिरावर घ्यायला.... आवडलीच
स्लार्ती- निरिक्षक! मस्तच. त्यातल तो टर्न तर बेफाम आहे.
सन्मे, चिठ्ठे- लंपनच्या सारखं काहीतरी चौदातरी मॅड करणारं काहीतरी हुळहुळणारं, मोरपिसाचं वाचल्यासारखं वाटतय.... इतकं मस्तय!
पमा, सम- अतिशय भिडली ही कथा. तिच्यातल्या सहजपणामुळे. म्हटलं तर एकदम नाट्यमय करू शकली असतीस. त्यातलं एक वाक्यं मात्रं घर करून राहिलं काल वाचल्यापासून अजूनपर्यंत... "वैदेही, तुझ्याबरोबर मी खरंच पवित्र होऊन जातो".... सुरेख!
श्रद्धा, दिसामाजी काहीतरी- चटका लावणारी कथा आहे... वेग, ओघ, मांडणी सगळच जुळून आलेलं.... सुर्रेख जमलीये, जियो!

-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया

आत्ताच अंक पाहतोय.
अंक देखणा आहेच आतलं सारण देखील उत्तम असेल ह्यात वाद नाही. :)
जस जस वाचुन होइल तशी प्रतिक्रिया लिहिनच.
****************

आशू, तुझा स्पंदन मधील लेख प्रचंड आवडला. ब्रिटिश नंदी ती कविता मनात घर करून गेली.

स्पंदन मधील सर्वच लेख वाचताना माझ्या काळजाची स्पंदन वाढवत आहेत असे जाणवले.

अज्जुके, तू तुझा लेख फक्त मायबोलिपर्यंत सिमित न ठेवता सकाळ/लोकसत्ता/म.टा. यांना पाठवावा असे मला वाटते. कारन हा एक सामाजिक प्रश्न आहे. तो अनेकांपर्यंत पोचला पाहिजे. तुझ्या लेखाला एक जबरदस्त धार आहे.

यंदा मायबोलीचा online दिवाळी अंक वाचुन झाल्यावरच इतर अंक हातात घ्यायचे ठरवीले. मोठया उत्सुकतेने अंक उघडला. मुखपृष्ठ अतिशय सुंदर, सुरुवात गोड व्हावी असे वाटुन मिश्किली या सदरात घुसलो. आणि चाफा यांनी लिहीलेली कथा वाचण्यास सुरुवात केली. दिवाळी अंकात या विषयावर विनोदी लेखन हा प्रकार काही मला झेपला नाही. हा लेख तुमच्या रंगीबेरंगी किंवा गुलमोहर मध्ये चालला असता. शाळेत असताना वाचलेले 'बाबल्या चितेवरुन पळाला' आठवले. पण त्यावेळी उसळलेले हास्याचे कारंजे तुमचा लेख वाचताना आटुन गेले. दिवाळीच्या दिवशी आपण हे काय वाचतोय ? असा प्रश्न मनात येउन वाचन मध्येच थांबवीले आणि किलबिलकडे वळलो.
माझे असे वैयक्तिक मत आहे की दिवाळी अंकामध्ये तरी अश्या विषयांवरील विनोदी लेखांकडे गंभीरपणे पाहा. (काय करणार ? कारण आजही पिक्चर किंवा सिरियल मध्ये जरी कुणी मेल्याचा सीन आला तर आमच्या घरात ताबडतोब चॅनेल बदलले जाते)
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

http://www.esakal.com/esakal/10312008/Specialnews103B0675C4.htm मायबोली दिवाळी अंकाची सकाळ वर बातमी.

adm-चांगला लेख आहे.पण या शहरांबद्दल बहुतांश जनतेला माहीती आहे.त्यामुळे जरा माहीती नसलेली शहर घेतली असती तर बर झाल असत.
sandeep_chitre-बच्चनवरचा लेख जबरदस्त आहे.मी माझ्या मित्रांनाही लिंक पाठवली आहे लेख वाचायला.
ajjuka -फारशी चर्चिली न गेलेली समस्या चांगल्या पध्दतीने मांडली आहे.पण याबद्दल काही होईल असे वाटत नाही.आधी ३३%आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत्.मग ते मिळाले की याबद्दल काहीतरी होउ शकेल्.पण पाणी न पिणे आरोग्यास चांगले नाही.
aashu_D-लेख चांगला आहे
chinoox-दिवाळीच्या माहीतीबद्दल धन्यवाद.
sayuri-लोक शाकाहारी लोकांना परदेशी जाताना उगाचच जास्तच घाबरवुन सोडतात्.त्यामुळे अस्सल शाकाहारी असुनही मी पहिल्या वर्षी चिकन खायला सुरुवात केली.मग इस्कॉनचे लोक भेटले आणि मग आता ४ वर्ष परत पुर्ण शाकाहारी झालोय्.भारताबाहेर जाताना शाकाहारी माणसाने इस्कॉनशी संपर्क साधावा कारण ते पुर्ण शाकाहारी असतात आणि जगातल्या जवळ जवळ सगळ्या शहरांमधे त्यांची सेंटर्स आहेत.

----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

खूपचं देखणा, सुबक, सुंदर झालाय अंक..
अजून वाचायला सुरुवात केली नाहीये..पण एकूण संग्रह छान वाटतोय..

या सुंदर अंकासाठी परीश्रम घेतलेल्यांचे अभिनंदन आणि मनःपूर्वक धन्यवाद..

केवढा देखणा अंक आहे..!!!!

अतिशय देखणा झालाय अंक!! पल्लि, सुरेख लिहिले आहेस, वाचताना डोळे भरुन आले..

माझ्या ब्राउजर मधे हेम्स ची कविता दिसतच नव्हती आधी. आता दिसू लागली.
मनमुराद - तशीही मी हेम्सची पंखी आहे. कविता मस्तच. आणि शेवटाला 'मी...' एवढंच म्हणून अडकून जाणं... घसा कोंडला बाय माझा!!
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

वैभव जोशींची 'पुन्हा घेतली मी भरारी वगैरे' ही गझल फारच मस्त आहे... फार आवडली मला...

>>आधी ३३%आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत्.मग ते मिळाले की याबद्दल काहीतरी होउ शकेल्.पण पाणी न पिणे आरोग्यास चांगले नाही.<<
तुला खरंच वाटतं ३३% आरक्षणाने हा प्रॉब्लेम सुटेल? मला शंका आहेत म्हणून विचारतेय.

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home