अभिप्राय

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २००८ बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे तर ते वाचण्याची आम्हाला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हाला इथे जरूर कळवा.
-संपादक मंडळ

प्रतिसाद

ज्यांच्या Browser मधे फ्लॅश प्लगीन V 10 होते त्याना तारांकीत विभाग ऐकण्यात अडचण येत होती. तो प्रश्न आता सोडवला आहे.

नमस्कार..

सायुरी यान्चा "निहोन नो र्योरी" हा लेख वाचला.
जपानमधे सोबा आणि उदोन या दोन गोष्टीन्वर बरेच शाकाहारी जगत आहेत..
मान्साहार अगदिच काही वर्ज्य नसला, "सहसा शाकाहारीच बरे" असे म्हणणारेच अधिक..

जपान्यान्ना आजकाल सामिष असल्याशिवाय चालत नसल्याने, या सोबा-उदोन वर काही डुक्कर वगैरे
भुरभुरले गेले असण्याचा चान्स जास्ती.. पण तसे असल्यास तिथल्या माणसाला "निकु नुकि दे" म्हणायच,
की ते डुक्कर वगैरे काढुन टाकतात... :-)

बाकी, लेखाची सचित्र आणि मुद्देसुद मान्डणी एकदम जपानी लिखाणातल्या सारखीच वाटली.
छान!!! असेच लिहीत रहा!

धन्यवाद,
रुयाम

रुयामसान,
प्रतिसादासाठी धन्यवाद!

प्रिन्ट आउट कशि काढता येईल?

सायुरी म्हणाली तसा अंक सुरुवातीपासून वाचायला घेतला आणि केतन दंडारे हे नाव दिसलं. डॉ. मधुकर दंडारे आणि डॉ. कुंदा मधुकर दंडारे, औरंगाबाद, ही प्राध्यापकद्वयी सध्या कुठे असते? आमचे सौदी वाळवंटातले हे जुने, जिवाभावाचे दोस्त जर या दिवाळी अंकामुळे पुन्हा भेटले तर आम्ही वाळवंटात आत्ता दिवाळी साजरी करू. शिवाय या अंकाला लाख लाख आशीर्वाद तर देऊच.
क्षमा करा. हा खरा प्रतिसाद नव्हता. ही प्रतिक्षिप्त क्रिया होती.
अंक व्यवस्थित वाचून झाल्याझाल्या प्रतिसाद देईनच.

शुभांगी गोखलेंच्या आवाजात सुनिताबाईंचं पत्र ऐकणं हा एक प्रसन्न अनुभव आहे. फार आवडलं
~~~~~~~~~

फारच छान निवड आहे. अमृता सुभाषचं वाचनही मस्त जिवंत वाटतं. आता हेही पुस्तक जी पुस्तकं वाचायची आहेत त्या यादीत जमा झालं. कधी वाचून होणार हे सगळं कोण जाणे?

मातीकामाचा व्हिडीओ बघून प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद.

दिवआलि अन्क खुप चअन अअहे

खूप सुन्दर अन हर्उद्य आहे.एका नवीन संस्कुतीशी समरस होण्याचा हा प्रयत्न अन नन्तर त्याच्याशी एकअरूप होणे खूप छान पणे दाखविले आहे.
उत्तम

सर्वेपि सुखिनो सन्तु सर्वे सन्तु निरमयह सर्वे भद्राणि पशन्तु मा कश्चिद दुखमाप्नुयात

पालि,

तुझा लेख छान आहे, खुप बरे वाटले. अगदी सद्य परिस्थिती लिहीली आहेस तु. मन भरुन आले. खरच हल्ली असेच चालले आहे.आई-वडिलांकडे पहायला मुलांना वेळच नाही. त्यातुन सुन चांगली असेल तर बरे, नाहीतर काहीखरे नाही.
तु सुचवल्याप्रमाणे तरुण पिढीला हे अंजन फार चांगले, कारण त्यांना वाटते की, आम्हांला त्याची जरुर पडणार नाही. पण हा भ्रम आहे. आता ताकद असते म्हणुन असे बोलतात. मी सुध्दा हा अनुभव पाहीला आहे. कसे वागतात ते आपल्या जन्म दात्याशी तुझा लेखाचा चांगला उपयोग होवो ही परमेश्वराजवळ प्रार्थना
रजनी

प्रथम संपुर्ण मायबोली टीम चे अतिशय आभार कि त्यानि हा सुन्दर वाचनिय खजिना उपलब्ध करुन दिल्याबद्दल!!..

सायुरिंचा हा लेख खरोखर खुप interesting आणि माहितिपुर्ण आहे...
मला स्वताला जपान मधे येउन १ वर्षे झाले..आणि माझ्यासारख्या शाकाहारी लोकांसाठी ही माहिती खरोखर उपयुक्त आहे..

जपानी लोक काहिही खातात हे माहिती होते, पण घोड्याचे कच्चे मांस खातात हे म्हण्जे भयन्कर आहे :)
anyways..असेच लिहित जा....keep it up !!

- केदार जोशी.
तोक्यो जपान.

नमस्कार,

आपला अन्क खुपच चान्गला आहे. माझे वदिलान्चे २५० दिवालि अन्का मधुन कविता येत असतात. आपल्या अन्क मधुन देखिल आलि असेल. तरि जर राहुन गेलि असेल तर क्रुपया सम्पर्क करन्यासाथि आपला पत्ता दयावा. अथवा ९८५०९६९००६ फोन करावा.
माझे वदिल मराथि चित्रपत मधे मराथि गानि लिहितात. अत्ता पर्यन्त ५० चित्रपत मधे गानि लिहिलि आहेत.

अतिशय उत्तम मान्डणी आणी सर्वच लेख अप्रतिम!