अभिप्राय

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २००९बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा.
-संपादक मंडळ

प्रतिसाद

घाईघाईत सगळे भाग चाळले. नयनरम्य! अतिशय देखणा अंक. आता रात्र जागवावी लागणार :-)

फ आणि क्ष दोघांचेही लेख वाचून काढले आज. सुंदर माहिती, अतिशय अभ्यासपूर्ण लेखन.
शक्य तितक्या चित्रकारांच्या चित्रांचे दुवे पण देता आले असते तर आणखीन मजा आली असती.

शुभ दीपावली सगळ्यांना!

अतीव सुंदर दिसतोय अंक! मुखपृष्ठ छान! ले-आउट प्रचंड आवडले... आणि आतला खजिना तर शब्दांच्या पलिकडला! संपादक मंडळाचे व प्रशासनाचे मनःपूर्वक अभिनंदन इतका सुरेख अंक काढल्याबद्दल!

दिवाळीच्या शुभेच्छा!

संपादक मंडळाचे अभिनंदन! आता खरंच दिवाळी आली! :)
नीलू, मु़खपृष्ठ छान आहे. अभिनंदन.

हो मी पण घाईघाईन चाळले. ले आउट मस्त. रात्री आरामात वाचणार.

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! माबोचा दिवाळी अंक वाचण्याचे हे माझे पहिलेच वर्ष! सध्या तरी वरवर चाळला.छान वाटतोय.आता निवांतपणे वाचणार.

संपादक मंडळ , लेखक, अर्टिस्ट आणि मदत समिती चं अभिनंदन !!
सही दिसतोय अंक, संवाद मधे अजय अतुल ची मुलाखत्...जबरीच !!!

अरे वा! नुसताच चाळलाय. पण सुरेखच दिसतोय. संपादक मंडळ, लेखक, लेखिका, सादरकर्ते, अंकाला हातभार लावणार्‍यांचं, आणि मुख्य म्हणजे मायबोली आणि अ‍ॅडमीन चे आभार.

इतकं काही खच्चून भरलं आहे वाचण्याजोगं की कुठून सुरुवात करावी ते कळतच नाहीये.
इतका दर्जेदार अंक आम्हा सर्वांना दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

मस्त जमलाय फराळ... नुसत्या वासानंच तोंडाला पाणी सुटावं असा... आता पुरवून पुरवून चाखणार...
नंदिनीचा ग्रामीण पत्रकारितेवरचा लेख विदारक! मागे एकदा एका नामांकित इंग्रजी वर्तमानपत्राने मनोहर जोशींच्या मुलासंबंधीची एक बातमी छापून त्यामध्ये मुरली मनोहर जोशींचा फोटो टाकला होता...
मनोहर जोशींचा मुलगा!!! (पत्रकारितेत प्रवेश करताच पोलिटिकल रिपोर्टिंगसाठी `सुटणार्‍या' एक्स्प्रेस्स पत्रकारितेचा परिणाम)
दिवाळीच्या शुभेच्छा!

मी पण फक्त चाळला अंक..

मुखपृष्ट मस्तच..

संपादकीयही छान... मायबोलीच्या गेल्या सर्व अंकांचा थोडक्यात घेतलेला आढावा आवडला...

एकुणात हाही अंक वैविध्यतेने नटलेला असावा हे प्रथमदर्शनी पहाताच जाणवले.. निवांत वाचताना खूप मजा येणार असं दिसतय.. तेव्हा दिवाळी अंकांच्या अंतरंगाबाबतचे अभिप्राय नंतर अंक वाचुन झाल्यावर..

श्रेयनामावलीतील सर्वांचे मायबोलीच्या या देखण्या दिवाळी अंकाबद्दल मनःपूर्वक आभार.. :)

दिवाळी अंक चाळला. संपादकांचे, लेखकांचेही अभिनंदन.
वाचून अभिप्राय लिहितो.

-दिलीप बिरुटे

ओह! एकदम प्रसन्न वाटले अंक बघून..! :)
नितांतसुंदर अंकाबद्दल संपादक अन श्रेयनामावलीतल्या सार्‍यांचे अभिनंदन, तसेच आभारही. :)

आता मस्त एकेक करून वाचतो अन प्रतिक्रिया देतो.

मस्त वाटलं इतका सुंदर दिवाळी अंक पाहून! निवांत वाचणार आहे.
धन्यवाद व अभिनंदन!

सगळ्यांना शुभ दीपावली !
प्रथमदर्शनी अंक खूप देखणा दिसतोय.. सध्या नुसताच चाळलाय पण लवकरच पूर्ण वाचेन.

सर्व 'मायबोली'करांना दिवाळीच्या 'हार्दिक शुभेच्छा'...

आल्या-आल्या 'दिवाळी अंक' चाळुन बघितला... एकदम 'फ्रेश' वाटलं...

जस-जसं वाचन होत जाईल त्या प्रमाणे 'प्रतिक्रिया' देत जाईन...

जीव ओवाळून टाकावा इतका इतका सुंदर दिवाळी अंक झाला आहे. फक्त चित्र वगैरेचं नाहीतर आत डोकावून पाहिले तर हे वाचू की ते वाचू असे झाले आहे. मी टुलिपचा सिमितावरचा लेख वाचला आणि खरचं अगदी उमाळे देत देत हा अभिप्राय लिहित आहे.. टुलिप अफलातून गं!!!!!!

अंक नुसताच चाळला. खूपच देखणा झाला आहे. पूर्ण वाचून झाला की पुन्हा अभिप्राय देईनच
संपादक मंडळ आणि इतर संबंधितांचे अभिनंदन !!

संपादक मंडळ आणि श्रेयनामावलीतील सर्वांचे आणि लेखक्/कवी/कलाकारांचे अभिनंदन, आणि दिवाळीच्या शुभेच्छा!

बर्‍याच वाचनीय गोष्टी दिसत आहेत. जसे वाचून होईल तश्या प्रतिक्रिया देइनच.

सर्वात पहिले म्हणजे अतिशय सुंदर मुखपृष्ठ, आणि प्रत्येक सदराला बदलणारे वरचे चित्र ही कल्पना आणि ती चित्रे/छायाचित्रे सुद्धा मस्त आहेत.

लै भारी! एक नंबर! :)

सर्व कारभारी मंडळाचे अभिनंदन अन धन्यवाद!

जय महाराष्ट्र!!! जय हिंद!

अतिशय देखणा दिवाळी अंक! करोगे याद तो, किल्ला, सुशीलाकाकू आणि तत्सम, छायाचित्रण अवघड नाही हे लेख प्रथम वाचून काढले - अतिशय आवडले. पूर्ण अंक पुरवून पुरवून वाचेनच. संपादक मंडळाचे अभिनंदन!

नुसताच चाळला. सवडीनं अभिप्राय नोंदवते.

अंक भरदार. वाचतो आहे...
वा. सलग बैठक मारली (उगाच आपलं, दुसरं काही काम नव्हतंच).
चांगला अंक. काही लेखन खरोखर कसदार.

फर्स्ट इंप्रेशन एकदम फंटाष्टिक...

आता सवडीनी वाचीन...

वा वा सुंदर दिसतोय अंक. आता निवांत वाचेन. संपादक मंडळाचे अभिनंदन !!!

~~~~ शुभ दिपावली ~~~~

सर्व 'मायबोली'करांना दिवाळीच्या 'हार्दिक शुभेच्छा'.

प्रथमदर्शनी दिवाळी अंक सुंदर वाटतो आहे. आता फक्त चाळला आहे.

वरील सर्वांशी सहमत.. अतिशय सुंदर दिवाळी अंक..

फार सुंदर झाला आहे अंक. काय वाचू आणि काय नको असं झालंय.
नीलू, अभिनंदन गो बायो!! मुखपृष्ठ अगदी दृष्ट काढावी इतकं सुरेख झालंय.

अप्रतिम अंकाबद्दल संपादक मंडळाचे आभार.
प्रत्येक सदरागणिक बदलत जाणार्‍या प्रकाशचित्रांची कल्पना झकासच! प्रकाशचित्रं क्लास.
नुसताच चाळलाय,सवडीने वाचुन अभिप्राय नोंदवेन.

पहिला मान टण्याचा. गड आला पण.... नाटक बसवण्याचे खूप किस्से वाचलेले असतात पण यासम हाच !! लई लई हसलो. विशेषतः पळता 'काय भ्याडांनो' ऐवजी 'पळता काय भाड्यांनो ..' हे तर लै भारी ....